Revelation
प्रकाशित वाक्य
1
1 येशू ख्रिस्त ना प्रकटीकरन जो तेले देव नि एनासाठे दिधा, कि आपला दासले त्या गोष्टी जेसले लवकर होण अवश्य शे,दाखाळो; आणि तेनी आपला देवदूत ले धाळीसन तेना द्वारे आपला दास योहान ले दाखाळ | 2 जेनी देव ना वचन आणि येशू ख्रिस्त नि साक्षी, मणजे जे काही तेनी देखेल होत तेनी साक्षी दिधी | 3 धन्य शे तो जो या भविष्यवाणी ना वचन ले वाचस, आणि त्या ज्या आयकतस आणि तेना मा लिखेल गोष्ट ले मानतस, कारण वेळ जवळ इजाएल शे || 4 योहान ना कडून आशिया नि सात मंडळीसना नाव : तेना कडून जो भी शे,आणि जो होता, आणि जो येणारा शे, आणि त्या सात आत्मा कडून,ज्या तेना सिंहासन ना समोर शे | 5 आणि येशू ख्रिस्त कडून, जो विश्वासयोग्य साक्षी आणि मरेल मधून जिंदा होणारा मधून पयला शे आणि पृथ्वी ना राजासना अधिकारी शे,तुमले दया आणि शांती भेटत राहो: आणि जो आमनाशी प्रेम ठेवस, आणि जेनी आपला रक्त ना द्वारा आमले पाप शी सोडायेल शे | 6 आणि आमले एक राज्य आणि आमना बाप देव ना साठे याजक भी बनावी टाक; तेनीच महिमा आणि पराक्रम युगाणयुग राहो | आमेन || 7 देखा, तो ढगस संगे येणार शे;आणि हरेक डोया तेले देखीन,पण जेसनि तठे हात लायेल होता त्या बी तेले देखतीन, आणि पृथ्वी ना सर्व कुल तेना मुळे छातिले मारतीन | हां | आमेन || 8 प्रभू देव तो जो शे, आणि जो होता, आणि जो येणारा शे; जो सर्वशक्तिमान शे; हाई सांगस,कि मीच अल्फा आणि ओमेगा शे, || 9 मी योहान जो तुमना भाऊ, आणि येशू ना क्लेश, आणि राज्य आणि धीरज मा तुमना सहभागी शे, देव ना वचन, आणि येशू नि साक्ष ना कारण पतमुस नाव टापू मा होता | 10 कि मी प्रभू ना दिन आत्मा मा ई गया,आणि आपला मांगे तुरही ना सारखा मोठा शब्द हाई सांगतांना आयक | 11 कि जे काही तू देखस,तेले पुस्तक मा लीखीसन सात हि मंडळीस कडे धाळीदे,मनजे इफिसुस आणि स्मुरना, आणि पिरगमून, आणि थूआतीरा,आणि सरदिस, आणि फीलेदिलफिया, आणि लौदिकीया मा | 12 आणि मिनी तेले जो मनाशी बोलत होता; देखा साठे आपल तोंड फिराव; आणि मांगे फिरीसन मिनी सोना ना सात दिवट देखनु | 13 आणि त्या दिवट ना मधमा मनुष्य ना पुत्र सारखा एक पुरुष ले देखनू, जो पाय लोंग कपडा घालेल आणि छाती वर सुंदर फटुका बांधेल होता | 14 तेना डोक आणि केस चमकदार उन आखो पाथा सारखा होता, आणि तेना डोया आग नि ज्वाला ना सारखा होती | 15 आणि तेना पाय उत्तम पितय ना सारखा होतात ज्या समजा भट्टी मा तपाळेल शे, आणि तेना शब्द गैरा पाणी ना आवाज सारख होता | 16 आणि तो आपला उजवा हात मा सात तारा लीयेल होता,आणि तेना तोंड मधून शुद्ध दोनधारी तलवार निघत होती, आणि तेना तोंडी आस प्रज्वलित होत, जसा सूर्य कडक उन मा चमकस | 17 जव मिनी तेले देख, तर तेना पायवर मरेल सारखा पडीगया आणि तेनी मनावर डावखोऱ्या हात मना वर ठेविसन सांगणा, कि घाबरू नको, मी पयले आणि आखरी आणि जिवंत शे | 18 मी मरी जाएल होतु, आणि आते देख; मी युगानयुग जिवंत शे; आणि मृत्यू आणि आधोलोक ना किल्ल्या मनाच कडे शे | 19 एनासाठे ज्या गोष्टी तुनी देखेल शे, आणि ज्या गोष्टी हुई रायनी; आणि जी येणा नंतर जी होणार शे,त्या सर्वासले लीखिले | 20 मणजे त्या सात तारा ना भेद जेले तुनी मना उजवा हात मा देखेल होता,आणि त्या सात सोना ना दिवट ना भेद :त्या सात तारा सात हि मंडळी ना दूत शे, आणि त्या सात दिवट सात मंडळी शे ||