MARK
मरकुस
1
1 देव ना पुत्र येशू ख्रिस्त ना सुवार्ता नि सुरुवात| 2 जस यशया भविष्यवक्ता ना पुस्तक मा लिखेल शे कि देखमी आपला दूतले तुना पुळे धाळसजो तुना साठे रस्ता सुधारीन | 3 पहाळ मा एक हाकामारणार ना शब्द आयकू ईराय्ना कि प्रभू ना रस्ता तयार कराआणि तेना सळक शिधा करा | 4 योहान उनाजो पहाळ मा बाप्तिस्मा देस आणि पापसना मापी साठे मनफिरावाना बाप्तिस्मा ना संदेस देत होता | 5 आणि सगळा यहुदी देश ना आणि यरुशलेम ना सगळा राहणार निघीसन तेना जोळे ग्यात आणि आपला पापसले मानिसन यरदन नदी मा तेनाकळून बाप्तिस्मा लीधा | 6 योहान उटना केसस्ना ना कपळा घालत होता आणि आपला कमर वर कातळी ना पट्टा बांधी ह्राये आणि किळा-मकुळां आणि मद खाया करत होता| 7 आणि हय संदेश देत होता कि मना नंतर जो येणार शे जो मनातून शक्तिमान(समर्थी) शे; मी हय लायक नई कि ढूकिसन तेना जोळासना बंद सोळू| 8 मनि त तुमले पाणी कन बाप्तिस्मा दियेल शे पण तो तुमले पवित्र आत्मा कण बाप्तिस्मा दिन || 9 त्या दिनस्मा येशू नि गलील ना नासरत तून ईसन यरदन मा योहान कळून बाप्तिस्मा लीधा | 10 आणि जव तो पाणीमधून निधीसन वरे उना तव चालू तेनी आकाश ले उधळत आणि आत्मा ले कबुतर ना सारखा आपला वर उतरता देखा | 11 आणि हय आकाशवाणी हुयनी कि तू मना प्रिय पुत्र शेतुनाशी मी आनंदित(ख़ुशी) शे || 12 तव आत्मा नि चालू तेले पहाळ कळे धाळा | 13 आणि पहाळ मा चाळीस दिन लगून भूत नि तेनी परीक्षा करी; आणि तो पशु-पक्षीस संगे राय्ना; आणि स्वर्ग दूत तेनी सेवा करत रायनात || 14 योहान ना धराई जावा नंतर येशू नि गलील मा ईसन परमेश्वर ना राज्य ना सुवार्ता गाजाळी | 15 आणि सांग वेळ(टाइम) पुरा हुईना शे आणि परमेश्वर ना राज्य जोळे ईजायेल शे; पच्चताप करा आणि सुभ संदेश वर विस्वास करा || 16 गलील समुद्र ना तठ वर जातांना तेनी शिमोन आणि तेना भावू अन्द्रियास ले समुद्र मा जाय टाकतांना देखा; कारण कि त्या मासोया होतात | 17 आणि येशू नि तेसले सांग; मना मांगे ईपळा; मी तुमले मानससले धरणार बनावसू | 18 त्या चालुमा जायासले टाकीसन तेना मांगे चाली दिनात | 19 आणि काही पुळे जायसन तेनी जब्दी ना पुत्र याकुब आणि तेना भावू योहान ले नाव वर जायासले सुधारतांना देखा | 20 तेनी लगेच तेसले बलाव; आणि तो आपला बाप जब्दी ले मजूर ना संगे नाव वर सोळीसन तेना मांगे चालंना ग्यात || 21 आणि त्या कफरनहूम मा उनात आणि तो लगेच शब्बाथ [शनिवार] ना दिन सभा ना घर मा जयीसन प्रवचन सांगाले लागणा | 22 आणि लोक तेना प्रवचन सी चकित हुईनात; कारण कि तो तेसले शास्त्री सारखा नई; पण अधिकारी सारखा प्रवचन सांगत होता | 23 आणि त्याच वेळी(टाइम) ले तेसना सभा ना घर मा एक माणूस होता जेमा एक द्रुष्ट आत्मा होती | 24 तेनी जोरमा सांगाओ येशू नासरेथ आम्ले तुमना तून काय काम ? मी तुले वयखस तू कोण शे ? परमेश्वर ना पवित्र पुत्र ! 25 येशू नि तेले जोरमा सांगचूप राह्य;आणि तेना मधून निघी जा | 26 तव दृष्ट आत्मा तेले मुर्घळीसनआणि मोठा शब्द मा वरळीसन तेना मधून निघी गई | 27 एनावर सगळा लोक आचर्य करत आपसा मा विवाद कराले लागणात कि हय काय गोष्ट शे ?हय त कोणता नवा प्रवचन शे ! तो अधिकार ना संगे दृष्ट आत्मासले बी आदन्या देस आणि त्या तेनी आदन्या मानतस | 28 त तेना नाव लगेच गलील ना आंगे पांगे ना सगळा देश मा बठ्ठा जागावर वर पसरी ग्या || 29 आणि तो लगेच आराधना घर मधून निघीसनयाकोब आणि योहान ना संगे शामोन आण अन्द्रीयास ना घर उनात | 30 आणि शामोन नि सासू ज्वारमा भेलायेल होती आणि तेस्नी लगेच तिना बारामा तेले सांगा | 31 तव तेनी जोळे जायसन तेना हात धारीसन तेले उठाळ ना आणि तेना ज्वार तेना वरून उतरी ग्या आणि ती तेसनी पौनचारी कारले लागी गयी|| 32 संज्याकाय ना वेळ [टाइम] वर जवय दिन डुबी गया तव लोक सगळा आजारीसले आणि तेसले जेसनामा दृष्ट आत्मा होतात तेना जोळे लयनात | 33 आणि सगळा नगर दरवाजावर एकत्र हुयना | 34 आणि तेनी गैरासले ज्या आलग-आलग प्रकारणा आजार पासून दुखी होतात बरा करात ;आणि गैरा दृष्ट आत्मासले काळा ; आणि दृष्टआत्मासले बोलू नई दिधा कारण कि त्या तेले वयखत होतात|| 35 आणि झपाटामा दिन निघाणा गैरा पैलेतो उठीसन निघणा आणि एक जंगली जागावर ग्या आणि तठे प्राथना कराले लागणा| 36 तव शामोन आणि तेना साती तेले शोधाले ग्यात | 37 जव तो भेटणातव तेनी सांगा; कि सगळा लोक तुले शोधी राय्नात| 38 तेनी तेसले सांग या; आम्ही आखो कथा आंगे पांगे ना वस्तीसमा जावूतकि मी तठे बी प्रवचन सांगू कारण कि मी येनाच साठे निघेल शे | 39 त तो सगळा गलील मा तेसना सभासमा जाय जायसन प्रवचन सांगत आणि दृष्ट आत्मासले काळत राय्ना || 40 आणि एक कोळी तेना जोळे ईसन तेनाशी विनंती करी आणि तेना समोर गुळगा टेकीसन तेले सांग कदी तुले वाटस त मले बरा करी टाकशी| 41 तेनी तेनावर दया करीसन हात पुळे करा आणि तेले हात लायिसन सांग; मले वाटस कि तू शुध्द हुईजावो| 42 आणि लगेच तेना कोळ जातराय्ना आणि तो शुध्द हुईग्या| 43 तव तेनी तेले जताळीसन लगेच धाळी दिधा | 44 आणि तेले सांग देख कोले कायबी नको सांगजो पण जायसन खुदले याजकसले दाखाळआणि आपला शुध्द हुवाना बारामा जेकाय मुसा नि ठरायेल शे तेले अर्पण कर कि तेनावर साक्ष होवोत| 45 पण तो बाहेर जायसन हय गोष्टले गैरा सांगाले आणि अठलगून पसाराले लागणा कि येशू परत उघळपणे [डायरेक] नगर मा नई जायसकना पण बाहेर जंगली जागा मा राय्ना; आणि चारी कळून लोक तेना कळे ईजराय्नतात||