3
1 आणि तो प्रार्थना घर मा परत ग्या; आणि तठे एक माणूस होता जेना हात सुकी जायेल होता | 2 आणि त्या तेना वर दोष लावा साठे टपिसन बसेल होतात कि देखू शब्बाथ ना दिन तो तेले बरा करस कि नई | 3 तेनी सुखेल हात वाला माणूसले सांग; मधमा उभा हुईजा| 4 आणि तेसले सांग; काय शब्बाथ दिन बरा करान योग्य शे का वाईट कराण जीवले वाचाळाना का माराणा? पण त्या चूप राय्नात | 5 आणि तेनी तेसणा मनसनि कठोरता वर उदास हुईसन तेसले राग मा चारी कळे देखणा आणि त्या माणूस ले सांग आपला हात पुळेकर तेनी पुळेकरा आणि तेना हात चांगला हुईग्या | 6 तव फरीसी बाहेर जाईसन लगेच हेरोदिस संगे तेना विरोध मा योजना कराले लागनात कि तेले कसकाय नाश करुत || 7 आणि येशू तेना शिष्यस संगे समुद्र कळे चालना ग्या: आणि गलील मधून एक मोठी गरदी तेना मांगे चालु लागणी | 8 आणि यहुदी आणि यरुशलेम ईदुमि तून आणि यरदन ना पार आणि सूर आणि सैदा ना आंगे पांगे तून एक मोठी गरदी हय आय्कीसन कि तो कसा चमत्कार ना काम करस तेना जोळे उणी| 9 आणि तेनी तेना शिष्यसले सांग गरदी मुळे एक धाकली नाव मना साठे तयार ठेवजात कारण कि त्या मले दाबी ना देवोत | 10 कारण कि तो गैरा झनसले बरा करेल होता; येणा साठे जितला लोक रोगी होतात तेले हात लावासाठे तेनावर पळी जात होतात | 11 आणि दृष्ट आत्मा बी जव तेले देखत होती; त तेना पुळे पळी जात होती आनि बोमलीसन सांगत होती कि तू परमेश्वर ना पुत्र शे | 12 आणि तेनी तेसले गैरा जताळा कि मले समोर नको लयज्यात || 13 नंतर तो पहाळ वर चळी ग्या आणि ज्या तेले आवळतस तेसले तेनी तेना कळे बलाव; आणि त्या तेना कळे ईपळनात| 14 तव तेनी बारा मानससले नेम कि त्या तेना संगे संगे राहोत आणि तो तेसले धाळोत कि त्या सुवार्ता सांगोत| 15 आणि दृष्ट आत्मासले काळाना अधिकार ठेवोत | 16 आणि त्या ह्या शेतस: शमोन जेना नाव तेनी पेत्र ठेवा | 17 आणि जब्दी ना पुत्र याकोब आणि याकोब ना भाऊ योहान जेना नाव तेनी बेनेरेगेशम्हणजे गर्जन ना पुत्र ठेवा| 18 अंद्रीया फिलिप्प बर्थलमय मत्तय थोमा अल्फिना पुत्र याकोब तद्दय शिमोन कानानी 19 आणि तेले (येशुले) धरावणार यहूदा ईस्कर्योत असा तेस्ना नाव होतात. 20 नंतर तो एक घर मा उना तव परत लोक ईतला जमनात कि तेले भाकर खावाले बी वेळ(टाईम) भेटत नई होता. 21 जव तेना परिवार वाला हय आयकनात त तेले धराले निघनात; कारण कि सांगत होतात कि तो शुद्धीवर नई शे | 22 आणि शास्री ज्या यरुशलेम मघुन एयेल होतात हय सांगत होतात कि तेना मा भूत शे आखो हय बी कि तो दृष्टआत्मा ना अधिकारी नि मदत कण दृष्टआत्मासले काळस | 23 आणि तो तेसले जोळे बलायसन तेसनासी दाखलास मा सांगाले लागणा; भूत काब बर भूत ले काळी सकीन? 24 आणि कधी कोणता राज्य मा फुट पळीरायनी त तो राज्य कसा काय उभा राहुसकस? 25 आणि कोणता घर मा फुट पळीरायनी त तो घर कसकाय उभा रायसकस? 26 आणि भूत खुदनाच विरोधी हुईसन आपला माच फुट पाळीन त तो कसासाठे टिकू सकीन ? तेनि त समाप्ती हुईजास | 27 पण कोणी माणूस कोणता बी ताखत वाला माणूस ना घर घुसिसन तेना माल लुटी नई सकत जठलगून कि तो पहिले त्या ताखत वालाले बांधी नई लेत; आणि तव तेना घर ले लुटी लीन | 28 मी तुमले खरज सांगस कि मानुसना पुत्रसना सगळा पाप आणि दुर्भाषण ज्या त्या करतस माप कराय जाईन | 29 पण जो कोणी अवित्रआत्मा ना बारामा दुर्भाषण करीन तो कधी बी माप नई करायनार : पन तो कायम राय्णार पाप ना गुन्हागार ठराय जास | 30 कारण कि त्या हय सांगत होतात कि तेमा दृष्टआत्मा शे || 31 आणि तेनी माय आणि तेना भाऊ उनात आणि बाहेर उभारायसन तेले बलावा | 32 आणि गर्दी तेना आंगे पांगे बसेल होती आणि तेस्नी तेले सांग; देख तुनी माय आणि तुना भाऊ बाहेर तुले धुंडीराय्नात | 33 तेनी तेसले उत्तर दिधा कि मनी माय आणि मना भाऊ कोण शेतस? 34 आणि तेस्नावर ज्या तेना आंगे पांगे बसेल होतात देखीसन सांग देखा मनि माय आणि मना भाऊ ह्या शेतस | 35 कारण कि ज्या कोणी परमेश्वर नि ईछाप्रमाणे चालतस त्याच मना भाऊ आणि बहिण आणि माय शे|