11
1 जव त्या यरुशलेम जवळना जैतून पहाळ जवळ बेथफगे आणि बेथानी ना जोळे उनात त तेनी आपला शिष्यास मधून दोन ले हय सांगीसन धाळ | 2 कि आपला समोरला गाव मा जा आणि तेमा भिळताच जेना वर कोणी माणूस बसेल नई असा शिंगरू तुम्हले बांधेल भेटीन तेले सोळी लया. 3 कदि कोणी तुमले विचारीन कि हय काब करतस ? त सांगज्यात्त कि प्रभूले एनि गरज शे; आणि लगेच तो तेले परत धाळी दिन | 4 तेस्नी जायसन त्या शिगरूले दरवाजाना बाहेर रस्तावर भांदेल देखनात आणि सोळाले लागनात| 5 आणि तेसणा मधून ज्या तठे उभा होतात कोणी कोणी सांगाले लागनात कि हय काय करीराय्नात शिंगरूले काब सोळीराय्नात ? 6 जस येशू नि सांगेल होत तसच तेस्नी तेसले सांगी टाक; तव लोकस्नी तेसले जावू दिध | 7 आणि तेस्नी शिगरुले येशू जोळे लयसन तेनावर आपला कपळा टाकनात आणि तो तेनावर बठीग्या | 8 आणि गैरा झनस्नी आपला कपळा रस्तावर आथरनात आणि दुसरासनी वावरस मधून डंघा तोळी तोळीसन पसारी टाका | 9 आणि ज्या तेना पुळे पुळे आणि मांगे मांगे चालीराय्नतात गजर करीसन सांगीराय्नतात 'होसान्ना प्रभुना नावना येणार धन्यावादित हो;' 10 आम्हना बाप दावीद ना राज्य जो इराय्ना शे धन्यवादित हो: आकाश मा होसन्ना || 11 आणि तो यरुशलेम मा भिळीसन मंदिर मा उना आणि चारीसकळे सगळा वस्तुसले देखावर संजाकाय हुईनी तव तो आपला बारा शीष्यास संगे बेथानिमा चालना ग्या | 12 दुसरा दिन जव त्या बेथानी मधून निघनात त तेले भूक लागणी | 13 आणि तो दुरून अंजीर ना एक हिरवागार झाळ देखीसन जोळे ग्या कि काही तरी तेनावरून भेटीन: पण पानसले सोळीसन काहीच भेटन नई; कारण कि अंजीर ना हंगाम एयेल नई होता. 14 एनावर तेनी तेले सांग आते पासून कोणीच तुना फय नई खावो| आणि तेना शिष्य आयकीराय्नतात || 15 नंतर त्या यरुशलेमा उनात आणि तो मंदिर मा ग्या; आणि तठे ज्या क्रयविक्रय करीराय्नतात तेसले बाहेर काळाले लागणा आणि सराफाना चौरंग आणि कबुतर इकनारस्ना बैठक तेनी पालथ्या करीटाकात . 16 आणि मंदिर मधून कोलेबी कोणताच भांडा लीजावू नई दिधा | 17 आणि प्रवचन सांगत तेसले सांग काय हय नई लिखेल शे कि मना घर सर्वा जातीस साठे प्रार्थना ना घर सांगाईन ? पण तुमी तेले 'लुटनारस नि गुहा' बनाई टाकेल शे. 18 हय आयकीसन मुख्य याजक आणि शास्त्री तेनि घात करू असी संदि देखीराय्न्तात; कारण कि त्या तेले भ्यात होतात एनासाठे कि सगळा लोक तेना प्रवचन वरून थक्क हुईजात होतात || 19 आण संजाकाय हुईतात त्या नगर ना बाहेर चालना ग्यात | 20 मंग झापट मा जव त्या तथाईन जात होतात त त्या अंजीर ना झाळ ले मुयस लगून सुकेल देखनात | 21 पेत्र ले ती गोष्ट याद इगई आणि तेनी तेले सांग गुरुजी देख हवू अंजीर ना झाळ जेले तुनी श्राप दियेल होता सुकी जायेल शे | 22 येशू नि तेले उत्तर दिधा कि देववर विश्वास ठेवा | 23 मी तुमले खरज सांगस कि जो कोणी हवू डोंगर ले सांगीन; कि तू उपळी जाआणि समुद्र मा जाईसन पळ आणि आपला मन मा संशय नई धरतपण विश्वास करोत कि जे सांगस ते हुईजाईन त तेना साठे तेच हुईन | 24 एनासाठे मी तुमले सांगस कि जे काही तूमी प्राथना करीसन मांगशात त विश्वास करील्या कि तुमले भेटी ग्या आणि तुमना साठे हुइजाइन | 25 आणि जव कदी तुमी उभा रायसन प्राथना करतसकदि तुमना मन मा कोना विषमा काही वाईट त क्षमा करा: एनासाठे कि तुमना स्वर्गमधला बाप बी तुमना अपराधस्नी क्षमा करो || 26 [आणि कदी तुमी क्षमा नई कराव त तुमना बाप बी जो स्वर्ग मा शे तुमना अपराध नि क्षमा नई कराव |] 27 त्या परत यरुशलेम मा उनात आणि जव तो मंदिर मा फिरीरायन्ता त मुख्य याजक आणि शास्त्री आणि वळिल तेना कळे ईसन विचाराले लागनात. 28 कि तू हय काम कोणा अधिकार कन करस ? आणि हवू अधिकार तुले कोणी दियेल शे कि तू ह्या काम करो ? 29 येशू नि तेसले सांग: मी बी तुमले एक गोष्ट विचारस; मले उत्तर द्या: तव मी तुमके सांगसू कि ह्या काम कोणा अधिकार कन करस | 30 योहान ना बाप्तिस्मा स्वर्गपासून होता कि मानसस पासून होता ? मले उत्तर द्या | 31 तव त्या आपसा मा विवाद कराले लागनात कि कदि आम्ही सांगसुत स्वर्गपासून होता त तो सांगीन त तुमी तेनावर विश्वास काब नई ठेवा ? 32 आणि कदी आमी सांगसुत कि मानसस पासून त लोकस्नि भीती होती कारण कि सगळासले माहिती शे कि योहान खरज संदेष्टा होता. 33 त तेस्नी येशू ले उत्तर दिधा कि आमले नई मालूम : येशु नि तेसले सांग मी बी तुमले नई सांगत कि हय काम कोणा अधिकार कण करस ||