10
1 तव तो तठून उठीसन यहुदियाना सिमावरला प्रांतमा यार्देन ना त्या पार उना आणि गर्दी तेना जोळे परत एकत्र हुईगी आणि तो आपली चालप्रमाने तेसले प्रवचन सांगले लागणा | 2 तव परुशींनी तेना जोळे ईसन तेनी परीक्षा कराले तेले विचार काय हय योग्य शेका कि माणूस आपली बायको ले सोळी देवो ? 3 तेनी तेसले उत्तर दिधा कि मोशे नि तुमले काय आदन्या दियेल शे ? 4 तेस्नी सांग मोशे नि सूटपत्र लीखाले आणि सोळानी आदन्या दियेल शे | 5 येशू नि तेसले सांग कि तुमना मननी कठोरता मुळे तेनी तुमना साठे हय आदन्या लिखी | 6 पण जगना सुरुवात पासून देव नि नरनारी म्हणीसन तेसले बनायेल शे 7 एनासाठे माणूस आपला माय-बाप तून आलग हुईसन आपली बायको संगे राहीन | 8 आणि त्या दोनी एकदेह होतीन एनासाठे त्या आते दोन नई पण एकदेह शेत | 9 एनासाठे जेले परमेश्वर नि जोळेल शे तेले मानुष आल्लग नका करज्यात | 10 आणि घर मा शिष्यसनी एना बारामा तेले परत विचार | 11 तेनी तेसले सांग जो कोणी आपली बायको ले सोळीसन दुसरी संगे लग्न करीन त तो पहिली ना विरुध्द मा व्यभिचार करस | 12 आणि कदी बायको आपला नवराले सोळीसन दुसरा संगे लग्न करस त ती व्यभिचार करस || 13 नंतर लोक पोरसले तेनाकळे लयाले लागनात कि तो तेसणा वर हात ठेवो पण शिष्यासनी तेसले धमकि दावी | 14 येशूले हय देखिसन वाईट वाटण आणि तेसले सांग पोरसले मना कळे ईवू द्या आणि तेसले मना नका करा कारण कि देव ना राज्य एसनाच सारखासना शे | 15 मी तुमले खरज सांगस कि जो कोणी देव ना राज्य ले पोरस्ना सारखा स्वीकार करनार नई तो तेना मा कदीच प्रवेश करू सकाव नई | 16 आणि तो तेसले मांडीवर लीना आणि तेसणा वर हात ठेईसन तेसले आशीर्वाद दिना . 17 आणि जव तो निघीसन रस्तावर जाईराय्नाता त एक माणूस तेना जोळे पयत उना आणि तेना पुळे गुळगा टेकीसन तेले विच्यारना उत्तम गुरुजी सार्वकालिक जीवन लेवासाठे मी काय करू? 18 येशू नि तेले सांग तू मले उत्तम काब सांगस? कोणीच उत्तम नई फक्त एकच म्हणजे देव | 19 तुले आदन्या माहिती शेतस; मनुष्यहत्या करजो नको व्यभिचार करजो नको चोरी करजो नको खोटी साक्ष देईजो नको ठकवू नको आपला माय-बाप ना मान ठेवजो. 20 तेनी तेले सांग गुरुजी ह्या सगळासले मी लहानपणा पासून पायत एयेल शे. 21 येशू नि तेना कळे देखीसन तेनावर प्रीती करी आणि तेले सांग तुनामा एक गोष्ट नि कमी शे; जा जे काही तुना कळे शे तेले विकीसन गरीबसले दे आणि तुले स्वर्ग मा धन भेटीन आणि इसन मना मांगे चालू लाग | 22 हय गोष्ट आयकिसन तेना तोंडउतरी ग्या आणि तो कष्टी हुईसन चालना ग्या कारण कि तो गैरा मालदार होता | 23 येशू नि चारीस कळे देखीसन आपला शिष्यसले सांग मालदारसले देव ना राज्य मा प्रवेश कराण कितल कठीण शे ! 24 शिष्य तेनि गोष्ट वरून थक्क हुईग्यात एनावर येशू नि तेसले परत तेसले सांग पोरसहोण जो धनवर विश्वास ठेवस तेस्नासाठे देव ना राज्य मा प्रवेश करान कितल कठीण शे | 25 देव ना राज्य मा मालदार जावा पेक्षा उटले सुईना भोकसा मधून निघी जान सोप शे. 26 त्या गैराच आचर्य चकित हुईसन तेस्नातेस्ना मा सांगाले लागनात त कोणा तारण हुईसकस ? 27 येशू तेसणा कळे देखीसन सांगणा मानससकण त हय नई होवू सकाव; पण देवले सर्व काही साध्य शे कारण कि देवकण सगळ काही होवू सकस 28 पेत्र तेले सांगाले लागणा देख आम्ही त सगळ काही सोळीसन तुना मांगे चालीपळेल शेतस | 29 येशू नि सांग मी तुमले खरज सांगसकि असा कोणी नई जेनी मनासाठे आणि सुवार्तासाठे घर भाऊ बहीण माय बाप पोर आणि वावर सोळेल शेतस | 30 आणि आते ह्या सांप्रतकाळ मा शंभरपट घर भाऊ बहिणी माया पोर आणि वावर एसनाबरोबर पाठलाग आणि येणार युगमा सार्वकालिक जीवन भेटापासून राहाव नई . 31 पण गैराच ज्या पहिला शेतस मांगे होतीन ; आणि ज्या मांगला शेतस त्या पहिले होतीन || 32 आणि त्या यरुशलेम जातांना रस्ता मा होतात आणि येशू तेसणा पुळे पुळे जाईराय्न्ता: आणि शिष्य आचार्य चकित होतात आणि ज्या तेना मांगे मांगे चालत होतात त्या भ्यायेल होतात तव तो परत त्या बारासले लिसन तेस्ना संगे त्या गोष्टी कराले लागणा जी तेनावर येणार होती | 33 देखा आम्ही यरुशलेम कळे जाईराय्नुत आणि माणूस ना पुत्र मुख्य याजक आणि शास्त्रीसना स्वाधीन करामा येईन आणि त्या तेले मरणदंड ठरावतीन आणि विदेशीसना स्वाधीन करतीन | 34 आणि त्या तेनी थट्टा करतीन आणि तेनावर थुकतीन आणि तेले फटका मारतीन आणि तेना जीव लेतीन; आणि तीन दिन मा तो परत:उठीन . 35 तव जब्दिना पुत्र याकोब आणि योहान तेना जोळे ईसन सांगणात गुरुजी आम्हनी हइ ईछ्या शे कि जे काय आमी तुनापासून मांगसुत त्याप्रमाणे तू आमनासाठे करो | 36 तेनी तेसले सांग तुमनी काय ईछ्या शे कि मी तुमनासाठे करू ? 37 तेस्नी तेले सांग कि आमले हय दे कि तुना वैभवमा आमना मधून एक ले तुना उजवीकळे आणि एक ले डावीकळे बसाळानि कृपा करजो | 38 येशू नि तेसले सांग तुमले नई मालूम कि काय मांगीराय्नात ? जो प्याला मी पिवावर शे काय तुमी पी सकश्यात? आणि जो बाप्तिस्मा मी लेवावर शे काय तुमी ली सकश्यात ? 39 तेस्नी तेले सांग आमना कण बी हुई सकीन: येशू नि तेसले सांग; जो प्याला मी पिवावर शे तुमी पिश्यात; आणि जो बाप्तिस्मा मी लेवावर शे तेले लीश्यात | 40 पण जेस्ना साठे सिध्द करेल शे तेसले सोळिसन आखो कोलेच आपला उजविकळे आणि डाविकळे बसाळाना मना काम नई * | 41 हय आयकिसन दहा जन याकोब आणि योहान वर रागे भरू लागनात . 42 आणि येशू तेसले जोळे बलाईसन तेसले सांग तुमी समजतस कि ज्या विदेशीमा अधिकारी म्हणीसन जे मानायेल शे त्या तेसणा वर प्रभुता चालावतस ; आणि तेसणा मोठा लोक तेसणा वर सत्ता करतस हय तुमले माहित शेका | 43 पण तुमना मा असा नई शे पण जो कोणी तुमनामा मोठा होवाना देखस तो तुमना चाकर [दास] बनो | 44 आणि जो कोणी तूमनामा पहिला होवानी ईछ्या ठेवस तो सर्वासना चाकर [दास] बनो | 45 कारण कि माणूस ना पुत्र बी एनासाठे नई उना कि तेनी सेवा कराय जावो पण एनासाठे उना कि तो खुद सेवा कराले आणि गैरासना खेडणीस्तव आपला जीव देवासाठे उना . 46 आणि त्या यरीहोमा उनात आणि जव तो आणि तेना शिष्य आणि एक मोठी गर्दी यरीहो मधून निघत होती तव तिमय ना पुत्र बार्तीमय एक अंधा भिकारी सळक ना बाजुले बसेल होता. 47 तो हय आयकिसन कि येशू नासरेथकर शे आराया मारीसन सांगाले लागणा; ओ दाविद ना पुत्र येशू मनावर दया कर | 48 गैरासनी तेले दटाव कि शांत राहय म्हणून पण तो जास्त आराया माराले लागी ग्या ओ दावीद ना पुत्र मनावर दया कर | 49 तव येशू उभा राहयसन सांगणा तेले बलावा; आणि लोकसनी त्या अंधा ले बलायसन तेले सांग धीर धर उठ तो तुले बलाई राय्ना | 50 तो आपला लुघळा फेकीसन लगेच उठना आणि येशू जोळे उना | 51 एनावर येशू नि तेले सांग; तुनी काय ईछ्या शे कि मी तुनासाठे करू? अंधा नि येशू ले सांग गुरुजी कि मी देखाले लागी जावू | 52 येशू नि तेले सांग; जा तुना विश्वास नि तुले बरा करी टाकेल शे: आणि तो लगेच देखाले लागणा आणि रस्तावर तेना मांगे चालू लागणा ||