3
1 आणि सरदीस नि मंडळी ना दूत ले हाई लिख, कि जेना कडे देव ना सात आत्मा आणि सात तारा शे,हाई सांगस, कि मी तुना काम ले जाणस,कि तू जिवंत सांगावस, पण, मरेल शे | 2 जागृत राहा, आणि त्या वस्तूसले जी बाकी राई जाएल शे,आणि जी नष्ट होणार होती, तेसले दृढ कर; कारण मिनी तुना कोणताच काम ले आपला देव ना जवळ पूर्ण नई देख | 3 तर सावध रहा, कि तुनी कोणत्या प्रकारे शिक्षा प्राप्त करणा आणि आयकेल होता, आणि तेना मा बनी रायना, आणि मन पश्चाताप कर: आणि जर तू जागृत नई राहावं, तर मी चोर सारखा ईजासू आणि तू कधीच नई जानु शकाव, कि कोणत्या घळी तुनावर ईजासू | 4 पण हा, सरदीस मा तुना आठे काही असा लोक शे, जेस्नी आपलां आपला कपडा अशुद्ध नई करणात, त्या मना सांगे फिरतीन कारण त्या याच योग्य शे | 5 जो विजयी होस,तेले याच प्रकारे श्वेत कपडा घालामा ईन, आणि मी तेन नाव जीवन नि पुस्तक मधून कोणत्याच प्रकारे नई कापाव,पण तेना नाव आपला बाप आणि तेना दुतस ना समोर मानी लीसू | 6 जेना कान शे, तो आयकी ले कि आत्मा मंडळीस ले काय सांगस || 7 आणि फिलेदिलफिया नि मंडळी ले हाई लिख, कि जो पवित्र आणि सत्य शे, आणि जो दाऊद कुंज ठेवस, जेले उगाडेल ले कोणी बंद नई करु शकस आणि बंद करेल ले कोणी उगाडू नई शकस, हाई तो सांगस कि | 8 माले तुना काम माहित शे,( देख, मिनी तुना समोर एक दरवाजा उगाडेल शे, जेले कोणी बंद नई करू शकस, )कि तुनी सामर्थ्य थोडासा शे, आणि तुनी मना वचन ना पालन करेल शे आणि मना नाव ना नकार नई करणा | 9 देख, मी शैतान ना त्या सभावालास ले तुना वश मा करी देसू ज्या यहुदी बनिसन बठेल शे,पण नई शे,पण खोट बोलतस देख मी असा करसू,कि त्या इसन तुना पाय मा दंडवत करतीन, आणि हाई जानिलेतीन,कि मिनी तुनाशी प्रेम ठेवेल शे | 10 तुनी मना धीरज ना वचन ले धरेल शे, एनासाठे मिभी तुले परीक्षा ना वेळी वाचाळीसंन ठेवसू, ज्या पृथ्वीवर राहणारास ले पारखा ना साठे सर्व संसार वर येणारा शे | 11 मी लवकर येणार शे, जे काही तुना कळे शे, तेले धरी ठेव, कि कोणी तुना मुकुट हिसकाय नई लेवो | 12 जो विजयी होईन, तेले मी आपला देव ना मंदिर मा एक खंबा बनावसू, आणि तो कधी बाहेर नई निघावं; आणि मी आपला देव ना नाव, आपला देव ना नगर, मणजे नवीन येरुशलेम न नाव,जे मना देव ना कळून स्वर्ग वरून उतरणार शे आणि आपल नवीन नाव तना वर लिखसू | 13 जेना कान शे, तो आयकी लेवोकी आत्मा मण्डली स ले काय सांगस || 14 आणि लौदिकीया नि मंडळी ना दुतस ले हाई लिख, कि, जो आमेन, आणि विश्वायोग्य, आणि खरा साक्ष शे, आणि दे नि सृष्टी ना मुल कारण शे, तो हाई सांगस | 15 कि माले तुना काम माहित शे कि तू नई तर थंडा शे आणि नई गरम : चांगल होत कि तू थंडा व गरम रायता | 16 तर येणा साठे तू कोमट शे, आणि नई थंडा शे आणि नई गरम, मी तुले आपला तोंड मधून ओकावर शे,| 17 तू जे सांगस, कि मी मालदार शे, आणि मालदार होई जायेल शे, आणि माले कोणतीच वस्तू नि कमी नई शे, आणि हाई नई माहित शे, कि तू अभागा आणि तुच्छ आणि गरीब आणि आंधळा, आणि नागा शे | 18 एनासाठे मी तुले सम्मती देस, कि आग मा तयायेल सोन मना पासून विकत लेवो, कि मालदार होई जावो, आणि श्वेत कपडा ली ल्या कि घालीसन तुले नागापन नि लाज नई येवो; आणि आपला डोया मा लावा साठे सुरमा ले, कि तू देखू लागो | 19 मी जेना जेनाशी प्रेम ठेवस, त्या सर्वासले उलाहना आणि ताडना देस कि, एनासाठे डोकगर्म होवो, आणि मन फिराव | 20 देख, मी दरवाजा वर उभा राहीसन वाजाळस; जर कोणी मना शब्द आयकिसान दरवाजा उघाडीन, तर मी तेनाकळे मधमा इसन जेवण करसू, आणि तो मना संगे | 21 जो विजयी होईन, मी तेले आपला संगे सिंहासन वर बठावसू, जसा मिभी विजयी होईसन आपला बाप ना संगे तेना सिंहासन वर बसी ग्या | 22 जेना कान शे तो आयकी ले कि आत्मा मंडळीस ले काय सांगस ||