10
1 मंग मी नि एक आजून बली देवदूत ले ढग ताणत स्वर्ग्तून उतरतांना देख, तेना डोका वर मेघधनुष्य होता, आणि तेना तोंड सूर्य सारखा आणि तेना पाय आग ना खंबा सारखा होता | 2 आणि तेना हात मा एक धाकली उघाळेल पुस्तक होती, तेनी आपला उजवा पाय समुद्र वर, आणि डावखोऱ्या पाय पृथ्वी वर ठेवेल होता | 3 आणि असा मोठा शब्द मा बोमलना, जसा सिंह दाहाळस; आणि जव तो बोमलना तर गर्जन ना सात शब्द आयकू उनात | 4 आणि जव गर्जन ना सातही शब्द आयकाय ग्यात, तव मी लिखत होतो, आणि मिनी स्वर्ग तून हाई शब्द आयक, कि ज्या गोष्टी गर्जन ना त्या सात शब्द शी आयकेल शे, तेसले गुप्त ठेव, आणि लिखू नको | 5 आणि ज्या देदूत ले मिनी समुद्र आणि पृथ्वी वर उभा देखेल होतु,; तेनी आपला उजवा हात स्वर्ग कडे उचला | 6 आणि जो युगानयुग जिवंत राहीन, आणि जेनी स्वर्ग ले आणि जे काही तेना मा शे, आणि पृथ्वी ले आणि जे काही तेनावर शे,आणि समुद्र ले आणि जे काही तेना मा शे तेले रचना तेनीच शेप्पत खाइसन सांगणा, आते तर आजून उशिरा नई होवाव | 7 पण सातवा देवदूत ना शब्द देवाना दिन मा जव तो तुरही फुंका वर राहीन, तर देव ना गुप्त मनोरथ त्या सुसमाचार ना नुसार जो तेनी आपला दास संदेष्टा ले दिधा पूर्ण होईन | 8 आणि जे शब्द करणारा ले मिनी स्वर्ग मधून बोलतांना आयक, तो आजून मना संगे बोलू लागणा; कि जा जो देवदूत समुद्र आणि पृथ्वी वर उभा शे, तेना हात मधली उघळेल पुस्तक लीले | 9 आणि मिनी देवदूत कडे जाईसन सांग, हाई धाकली पुस्तक माले दिदे; आणि तेनी माले सांग हाई लीजाय, आणि हाई तुना पेट कडू तर ठेवीन, पण तुना तोंड मा मोवाय सारखी गोड लागिन | 10 तर मी ती धाकली पुस्तक त्या देवदूत ना हात शी लिसन खाई ग्या, ती मना तोंड मा मोवाय सारखी गोड तर लागणी,पण जव मी तिले खाई ग्या,तर मना पेट कडू होई ग्या | 11 तर माले हाई सांगामा उन, कि माले गैरा लोक, आणि जाती, आणि भाषा, आणि राजास वर, आजून भविष्यवाणी करणी पडीन ||