12
1 आणि स्वर्ग वर एक मोठा चिन्ह दिखन,मणजे एक बाई जी सूर्य ओडेल होती, आणि चांद तीना पाय खाले होता,आणि टीना डोका वर बारा तारा ना मुकुट होता | 2 आणि ती गर्भवती होयनि, आणि आरोया मारत होती; कारण तिले बायतीन नि वेळ एल होती; आणि ती एक पोरग जन्मणार नि पीडा मा होती | 3 आणि एक आजून चिन्ह स्वर्ग मा दिखन, आणि देखा, एक मोठां लाल अजगर होता जेना सात डोका आणि दहा सिंग होता, आणि तेना डोका वर सात राजमुकुट होतात | 4 आणि तेनी शेपूट नि स्वर्ग ना तारा ना एक तिसरा भाग तानिसन पृथ्वी वर फेंकी दिधा, आणि तो अजगर ती बाई ना समोर जी बायतीन होवावर होती, उभा रायना,कि जव ती पोरग जन्मीन तर तेले खाई जाऊ | 5 आणि तिनी पोरगा ले जन्म दिधा जो लोखंड ना दंड लिसन, सर्व जाती वर राज्य करावर होता, आणि तेना पोरगा एका एक देव ना जवळ,आणि तेना सिंहासन ना जवळ उचलीसन पोहचावा मा उना | 6 आणि ती बाई त्या जंगल मा पयी गयी, जठे देव ना कडून टीना साठे एक जागा तयार करेल होती, कि तडे ती एक हजार दोन साठ दिन लोंग ती पाया मा येवो || 7 मंग स्वर्ग मा लढाई होयनी, मिकाईल आणि तेना देवदूत अजगर शी भांडाले निघनत, आणि अजगर आणि तेसणा दूत तेना शी भांडणात | 8 पण विजयी नई होयनात, आणि स्वर्ग मा तेसणा साठे आजून जागा नई रायनी | 9 आणि तो मोठा अजगर मणजे तोच जुना सांप, जो इबलीस आणि शैतान सांगामा एस, आणि सर्वा संसार ले भळकाव नारा शे, पृथ्वी वर पाळा मा उना; आणि तेना दूत तेना संगे पाडामा उनात | 10 मंग मिनी स्वर्ग वरून हाई मोठा शब्द येतांना आयक, कि आते आमना देव ना तारण, आणि सामर्थ्य, आणि राज्य,आणि तेना ख्रिस्त ना अधिकार प्रकट होएल शे; कारण आमना भाउस वर दोष लावणारा, जो रात दिन आमना देव ना समोर तेना वर दोष लावत होता, पाडांमा उना | 11 आणि त्या मेम्ना ना रक्ता कारण, आणि आपली साक्षि ना वचन ना कारण, तेना वर जयवंत होयनात, आणि तेसनी आपला जीव ले प्रिय नई समजनत नई, आठलोंग कि मृत्यू भी सहन करी लीनत | 12 या कारण, हे स्वर्ग, आणि तेनामा राहणारा खुश होयीजावा; हे पृथ्वी आणि समुद्र, तुमना वर हाय ! कारण शैतान गैरा राग मा तुमना कडे उतरीसन एल शे; कारण माहित शे, कि तेना थोळाच वेळ बाकी शे || 13 आणि जव अजगर नि देख, कि मी पुर्थ्वी वर पाडांमा एल शे, तर ती बाई ले जिने पोरगा ले जन्म दियेल होती त्रास दिधा | 14 आनि ती बाई ले मोठा उकाब ना संगे दोन पंख देवा मा उनात, कि सांप ना समोरून उडीसन जंगल मा त्या ठिकाणी पोहचि जावो, जठे ती एका वेळी, आणि घळी, आणि आधी घळी लोंग पायामा येवा | 15 आणि सांप नि त्या बाई ना मांगे आपला तोंड वर नदी ना सारख पाणी वाहड, कि तिले या नदी वर वाहाळी देवू | 16 पण पृथ्वी नि त्या बाई ले मदत करणी, आणि आपला तोंड उघाडीसन त्या नदी ले जिले अजगर नि आपला तोंड वर वाहाळेल होता, पी लीधा | 17 आणि अजगर बाई वर रागे भरणा, आणि तेना राहेल पोरगा शी जो देव नि आज्ञा ले मानस, आणि येशू नि साक्षी देवावर स्थिर शे, भांडण कराले ग्या | 18 आणि तो समुद्र नि रेत वर जाईसन उभा रायना ||