16
1 नंतर नि मंदिर मा कोले जोरमा त्या साती देवदूतस संगे हय सांगतांना आयक कि या, देव ना राग ना साती वाट्या पृथ्वी वर ओती द्या | 2 त पहिला नि जायसन आपली वाटी ओती टाकी| आणि त्या मानसस्वर जेसना वर पशु नि छाप होती, आणि ज्या त्या मूर्ती नि पूजा करत होतात, एक प्रकार ना वाईट आणि दृष्ट रोग नि धाळ पळणी | 3 आणि दुसरा नि आपली वाटी समुद्र वर ओती टाकी आणि तो मरेलस्ना रक्त बनी ग्या, आणि समुद्र मधला हरेक जीवधारी मरी ग्या || 4 आणि तिसरा नि आपली वाटी नदीस्मा, आणि पाणी ना झरास्वर ओती टाकी, आणि त्या रक्त बनी ग्यात | 5 आणि मी पाणी ना देवदूत ले हय सांगतांना आयक, कि ओ पवित्र, जो शे, आणि जो होता, तू न्यायी शे आणि तुनी हवू न्याय करा | 6 कारण कि तेस्नी पवित्र लोकस्ले, आणि भविष्यवक्तास्ना रक्त वाव्हाळेल होतात, आणि तुनी तेसले रक्त पाज; कारण कि त्या ह्याच योग्य शेतस | 7 नंतर मी वेदी कळून हवू शब्द आयकनु, कि हा ओ सर्वसत्ताधारी प्रभू देव, तुना निर्णय सत्य आणि नितीना शेतस | 8 आणि चौथा नि आपली वाटी सूर्य वर ओती टाकी, आणि तेले मानासस्ले विस्तो कन करपी टाकाले अधिकार देवा मा उना | 9 आणि माणूस कळक उन मुळे करपी ग्यात, आणि देव ना नाव नि जेले ह्या पिळास्वर अधिकार शे, निंदा करी आणि तेना गौरव करा साठे पश्चताप नई कर | 10 आणि पाचवा नि आपली वाटी त्या पशु ना आसन वर ओती टाकी आणि तेना राज्य वर अंधार हुई ग्या; आणि लोक पिळा मुळे आपली आपली जीप जीप चावाले लागनात | 11 आणि आपली पिळा आणि फुनष्यास मुले स्वर्ग ना देव नि नंदा करी; आणि आपला आपला कामस पासून पश्चताप नई कर | 12 आणि साहावा नि आपली वाटी मोठी नदी मा फरात वर ओती टाकी आणि तेना पाणी सुखी ग्या कि पूर्व दिशा ना राजास साठे रस्ता तयार हुई जावो | 13 आणि मी त्या अजगर ना तोंड मधून, आणि त्या पशु ना तोंड मधून आणि त्या खोटा संदेष्टा ना तोंड मधून तीन अशुद्ध आत्मास्ले बेडूकस्ना सारखा निघतांना देख| 14 ह्या चिन्ह दाखाळ नार दृष्ट आत्मा शे, जी पुरा संसार ना राजस कळे निघीसन एनासाठे जास, कि तेस्ने सर्वसत्ताधारी देव ना त्या मोठा दिन नि लळाई साठे एकत्र करो | 15 देख, मी चोर सारखा एस, धन्य शे तो, जो जागत ऱ्हास, आणि आपला कपळास्नि राखोई करस, कि नागा नई फिरो, आणि लोक तेना नागपण नई देखोत | 16 आणि तेस्नी तेसले त्या जागा वर एकत्र कर, जो इब्री भाषा मा हर्मगीदोन म्हणावस | 17 आणि सातवा नि आपली वाटी वारा वर ओती टाकी, आणि मंदिर ना आसन वरून जोर मा हवू शब्द हुईना, कि हुईग्या | 18 नंतर विजा, आणि ध्वनी, आणि गर्जना,आणि एक असा भूमिकंप हुईना, कि जव पासून माणूस नि उत्पत्ती पृथ्वी हुयनी, तव पासून असा मोठा भूमिकंप नई हुयेल होता | 19 आणि त्या मोठा नगर ना तीन तुकळा हुईग्यात, आणि जाती जाती ना नगर पळी ग्यात, आणि मोठा बाबेल नि आठवण देव कळे करा मा उणी, कि तो आपला राग नि द्राक्षारासना प्याला तिले पाजो | 20 आणि प्रत्येक बेटे आपली जागा वरून टईग्यात; आणि डोंगरस्ना पत्ताच नई लागणा | 21 आणि आकाश मधून मानसस्वर सुमारे एक मन वजन ना मोठा गारा पाळनात, आणि एनाच साठे कि हय विपत्ती गैरी भारी होती, लोकस्नी गारास्नि विपत्ती मुळे देव नि निंदा करी |