17
1 आणि ज्या सात देवदूतस कळे त्या सात वाट्या होत्यात, तेना मधून एक नि ईसन मले हय सांग कि अथा ये, कि तुले ती मोठी वेश्या ना दंड दाखाळस, जी गैरा पापिस्वर बठेल शे | 2 जिना संगे पृथ्वी ना राजास्नी व्यभिचार करा, आणि पृथ्वी ना राहाणार तिना व्यभिचार ना जारकर्म रुपी द्राक्षारस कण मस्त हुई जायेल होतात| 3 तव तो मले आत्मा मा डोंगर मा लीग्या, आणि मी किरमिजी रंग ना पशु वर जो निंदा ना नाव मा दपेल होता आणि जेना सात डोका आणि दाहा सिंघ होतात, एक बाई ले बठेल दिखणी | 4 हय बाई जाम्बी, आणि किरमिजी, कपळा घालेल होती, आणि सोने, मूल्यवान रत्ने आणि मोत्ये एस्ना कन सिंगरेल होती, आणि तिना हात मा एक सोनानि वाटी होती जीनामा अमंगळ पदार्थ कन आणि तिना व्यभिचार ना अशुद्ध वस्तूस कन भरेल होती | 5 आणि तिना कपाळ वर हय नाव लिखेल होत, ''मोठी बाबेल, कळवंतीनि आणि पृथ्वी वरणी अमंगलपणा नि माय | 6 आणि मी त्या बाई ले पवित्र लोकस्ना रक्त आणि येशू ना साक्षस्ना रक्त पिवा कन मस्त हुयेल देख आणि तिले देखीसन मी चकित हुईग्या | 7 त्या देवदूत नि मले सांग; तू काब चकित हुईना? मी ह्या बाई, आणि त्या पशु ना, जिना वर ती जाई रायनी, आणि जेना दाहा सिंघ आणि सात डोका शेतस, मले गुज दाखाळस | 8 जो पशु देखी रायना, हवू पहिले त होता, पण आते नई शे, आणि नईत कुंडा मधून निघीसन विनाश मा पळीन, आणि पृथ्वी ना राहणार जेस्ना नाव जग नि उत्पत्ती ना वेळ पासून जीवन नि पुस्तक मा लीखामा नई उनात, पण पशु नि हय दशा देखीसन, कि पहिले होता, आणि आते नई; आणि परत ईजाइन, आश्चर्य करतीन | त्या भूद्धी साठे जेना मा न्यान शे हईच संधी शे, त्या सात डोका सात डोंगर शेत, जेस्ना वर ती बाई बठेल शे | 9 त्या भूद्धी साठे जेना मा न्यान शे हईच संधी शे, त्या सात डोका सात डोंगर शेत, जेस्ना वर ती बाई बठेल शे | 10 आणि त्या सात राजा बी शेत, पाच त हुई जायेल शेतस, आणि एक आते शे; आणि एक आते लगून एयेल नई, आणि जव ईन, त काही वेळ लगून तेन राहाण बी अवश्य शे | 11 आणि जो पशु पहिले होता, आणि आते नई, तो स्वता आठवा शे; आणि त्या सातस मधून उत्पन्न हुयना, आणि विनाश मा पाळणा | 12 आणि ज्या दाहा सिंघ तुनी देखात त्या दाहा राजा शेत; जेस्ले आते लगून राज्य नई भेटन; पण त्या पशु संगे घळी भर साठे राजास सारखा अधिकार भेटीन | 13 ह्या सगळा एक मन होतीन, आणि त्या आपली आपली सामर्थ आणि अधिकार त्या पशु ले देतीन | 14 ह्या कोकरा संगे लढतीन, आणि कोकर तेसणा वर जिकी जाईन; कारण कि तो प्रभूस्ना प्रभू, आणि राजास्ना राजा शे: आणि ज्या बलायेल, आणि निवाळेल, आणि विस्वासी तेना संगे शेत, त्या बी जिकी जातीन | 15 नंतर तेनी मले संग, कि जो पाणी तुनी दिख, जेना वर वेशा बठेल शे, त्या लोक, आणि गर्दी आणि जाती, आणि भाष्या शेतस | 16 आणि ज्या दाहा सिंघ तुनी देख, त्या आणि पशु त्या वेशा वर बैर ठेवतीन, आणि तिले ओसाड आणि नागी करी टाकतीन; आणि तेना मास खाई जातीन, आणि तिले विसतो मा पेटाळी टाकतीन | 17 कारण कि देव तेस्ना मन मा हय टाकीन, कि त्या तेनी ईच्छा पुरी करोत; आणि जठ लगून देव ना वचन पुरा नई हुईजावोत, तठ लगून एक मन हुईसन आपला आपला राज्य पशु ले दिदेवोत | 18 आणि ती बाई, जिले तुनी देखेल शे तो मोठा नगर शे, जो पृथ्वी ना राजास्वर राज्य करस ||