17
1 सहा दीनना नंतर येशुनी पतरस आणि याकुब आणि तेना भाऊ योहानले तेना संगे लई उना आणि तेसले एकांतमा एक उंच डोंगर वर लिसन ग्या | 2 तडे तेसना समोर त्याचा रुपांतर होयना आणि तेना चेहरा सूर्य सारखा चमकणा आणि तेना कपडा सारखा उजाय होय ग्यात | 3 आणि मुसा आणि एलियास तेना संगे बोलतांना दिखनात | 4 आणि ऐनावर पतरसनी येशुले सांग .हे प्रभू आमना आडे थांबान उचित शे जर तुनी इच्छा आशीन मी आडे तीन मड्प करस .एक तुना साठे एक मुसा साठे आणि एक एलियाससाठे | 5 तो बोलत होता आणि एक पांढरा वादळनी तेसले झाकी लिध .आणि त्या वादळ मा हाई शब्द निघण हावू मना प्रियं पोरगा शे जेनावर मी आनंदी शे सर्वा ऐना आयक | 6 शिष्य हाई आयकीसन तोंडवर पदी ग्यात आणि गैरा भ्याय ग्यात | 7 येशू जवळ इसन तेसले स्पर्श करणा आणि सांगणा भ्यावू नका | 8 जवय तेसनी आपला डोया उघाडा तवय येशुले सोडीसन कोनलेज नई देख | 9 जवय त्या डोंगर वरून उतरत होतात तवय येशुनी तेसले हाई आज्ञा दिधा जड्लोंग माणूसना पोरगा मरेल मधून नई जिवंत होस जे काही तुमी देखेल शे कोणाले नका सांगा | 10 ऐना वर तेना शिष्यनी विचार मग शास्त्रीले काबर सांगतस कि एलियास पयले येवाले आवश्यक शे | 11 तेनी उत्तर दिधा एलियास पक्का इन आणि सर्व काही सुधारीन | 12 पण मी तुमले सांगस कि ऐलीयास इजायेल शे आणि लोक्सनी तेले नई ओयख पण जसा विचार करा तसाच तेना संगे होयना हाई रीतीमा माणूसना पोरगा भी तेसना हात तून दु:ख उचलीन | 13 तवय शिष्य समजनात कि त्याने आमना योहान बाप्तीसमा देणारा विषय मा सांग | 14 जवय ते गर्दी जवळ पोले लागू लागनात| 15 हे प्रभू मना पोरगा वर द्या कर कारण तो फेपरेकरी होताआणि तो गैरा दु:ख सहन करस आणि घडी-घडी आग मा पडीजास आणि घडी-घडी पानिमा पडीजास | 16 मी तेले तुना शिष्य कडे लयेल शे पण त्या तेले चांगला नई करू शकतस | 17 येशुनी उत्तर दिधा हे अविश्वासी आणि कुटील लोक मी कधी पर्यंत तुमना संगे राहास कड लोंग तुमले सहन करसू तेले आडे मन कडे लया | 18 तवय येशुनी वाईट आत्माले धमकावणा आणि तेनामधून निघून गेली आणि पोरग त्याच क्षणी चांगला व्होयगा | 19 तवय शिष्य एकांतमा येशू कडे जाईसन सांगणात आमी तेले काबर नई कडू शकनात || 20 तेनी तेसले सांग आपला विश्वास कमीना कारण मी तुमले खर-खर सांगस जर तुमना विश्वास राईनना दाना एवढा भी रायनात या डोंगरले सांगू शकशान आडून निघीसन तडे चालना जायत तो चालना जाईनआणि कोणतीही गोष्ट तुमना साठे अशक्य नई राहावं | 21 पण है जाती बिगर प्रार्थना आणि उपवास ना नई निघस | 22 जवय त्या गलील मा होतात येशुनी तेले सांग माणूसना पोरगा माणूसनं हात धरावामा इन | 23 त्या तेले मार टाकतीन आणि तो तिसरा दिन पसरत जिवंत होईन ऐनावर त्या गैरा नाराज होयनात | 24 जवय त्या कफराहून मा ग्यात तर मंदीरना कर लेनासनी पतरसना जोडे इसन विचार काय तुमना गुरु मंदीरना कर नई देत | 25 तेनी सांग हा देस जवय तो घरमा उनात येशुनी तेले विचाराना पयले तेले सांग हे शिमोन तू काय विचार करतोस पृथ्वीना राजा वसुली आणि कर कोणाकडून लेतस आपला पोरगास कडून कि पराया कडूनशे | 26 पतरसनी तेले सांग पराया कडून येशुनी तेले सांग पराया वाची ग्या | 27 तरी भी आमी तेले ठोकर नई खावाडत .तू समुद्रना किनारावर जाईसन बसी टाक आणि जो मासा पयले निघीन तेले तेना तोंड खोलावर तुले एक शिक्का भेटीन तेले लिसन मना आणि तुना बदलामा दे ताकजो |