6
1 तठून निधीसन तो आपला देश मा उना आणि तेना शिष्य तेना मांगे उनात | 2 शब्बाथ ना दिन तो प्राथना घर मा प्रवचन देवाले लागणा; आणि गैरा लोक आयकिसन आचर्य चकित हुईनात आणि सांगाले लागनात येले ह्या गोष्टी कोठून इग्यात ? आणि हइ कोणती बुध्दी शे जी तेले दियेल शे ? आणि कसा पराक्रम ना काम येणा हात कन होतस ? 3 काय हवू तोच सुतार नई जो मरयेना पुत्र आणि याकोब योसे यहूदा आणि शिमोन ना भावू तो हवूच शे ना ? आणि तेन्या बहिणी आठे आपलाबरोबर शेतस ना ? असा त्या तेना बारामा अळखळनात. 4 येशू नि तेसले सांग कि संदेष्टा आपला देश आणि आपला परिवार आणि आपला घर ले सोळीसन आणि कोठे बी सनमान भेटत नई | 5 आणि तो तठे कोणता पराक्रम ना काम नई करी सकना फक्त थोळाच आजारीस वर हात ठीसन तेसले बरा करा || 6 आणि तेनी तेसणा अविस्वास वर आश्चर्य करा आणि चारीकळला गावस मा प्रवचन देत फिरणा. 7 आणि तो बाराझनसले आपला जोळे बलाईसन तेसले दोन दोन धाळाले लागणा; आणि तेसले दृष्ट आत्मा वर अधिकार दिधा | 8 आणि तेनी तेसले आदन्या दिधी | कि रस्तासाठे काळी सोळीसन आखो काय बी नको लेयज्यात; नई त भाकर नई झोयणा नई त खिसामा पैसा| 9 पण जोळा घाला आणि दोन दोन अंगरखे घालू नका | 10 आणि तेनी तेसले सांग; जठे कोडे तुमी कोणता घरमा उतरशात त जठलगून तठून तुमी निघशात तठलगुण तेनामाच राहा | 11 ज्या ठिकाण ना लोक तुमना स्वीकार करणार नईत आणि तुमनी नई आयकावत तठून जातांना आपला तयपायसनी धुई तठेच झाळी टाका कारान कि तेसणा वर साक्ष होवो | 12 आणि तेसनी जाईसन प्रवचन सांगा कि पश्चताप करा | 13 आणि गैरा दृष्ट आत्मासले काळा आणि गैरा आजारीसवर तेल लाईसन तेसले बरा करा | 14 आणि हेरोद राजानि तेनी बारामा आईका कारण कि तेना नाव पसरी जायेल होता आणि तेनी सांग कि योहान बाप्तिस्मा देणार मृत्यू मधून परत जीवित हुईजायेल शे येणासाठे एनाशी ह्या पराक्रम ना काम होतस | 15 आणि दुसरासनी सांग हवू एलिया शे पण दुसरासनी सांग संदेष्टा नईत संदेष्टास पैकी कोणा एक ना सारखा शे | 16 हेरोद नि हय आयकिसन सांग ज्या योहान ना डोक मी कापाले लायेल होता तोच जिंदा हुईजायेल शे | 17 हेरोद नि स्वता आपला भावू फिलीप्प नि बायको हेरोदिया ना साठे जेनाशी तेनी लगन करेल होता लोकसले धाळीसन योहान ले धरीसन बंदिशाळामा जखळीसन ठीयेल होता | 18 कारण कि योहान नि हेरोद ले सागेल होता कि आपला भावू नि बायको ले ठेवण तुले विहित[वळत] नई| 19 येनासाठे हेरोदिया तेना शी व्देशभाव ठेवत होती आणि हय देखत होती कि तेना वध कराय टाकू पण असा नई हुईसकना | 20 कारण कि हेरोद योहान ले धर्मी आणि पवित्र माणूस समजीसन तेले भ्यात होता आणि तेले वाचाळी ठेयेल होता आणि तेनी गोष्टी आयकिसन गैरा घाबरीजात होता पण ख़ुशी मा आयकत होता | 21 आणि एक सोई ना दिन उना जव हेरोद नि आपला जन्म दिन मा आपला प्रधान आणि सरदार आणि गलील ना मोठ्ठा लोकसले मेजवानी करी | 22 आणि त्याच हेरोदिया नि पोर मधमा उणी आणि नाचीसन हेरोद ले आणि तेना संगे बसणारसले खुश करा; तव राजा नि पोर ले सांग तुले जे पाहिजे ते मांग मी तुले दिसू | 23 आणि तिना शी शेपथ खादी कि मी आपला आधा राज्य लगून जे काही तू मना पासून मंगाशी मी तुले दिसू | 24 तिनी बाहेर जायीसन आपली माय ले विचार कि मी काय मांगू ? ती सांगणी योहान बाप्तिस्मा देणार ना डोक | 25 ती लगेच राजा जोळे मधमा उणी आणि तेनाशी विनंती करी; कि तू मले योहान बाप्तिस्मा देणार ना डोक मले एक ताठ मा मांगाळी दे | 26 तव राजा गैरा उदास हुईग्या पण आपली शपत मुळे आणि संगे बसनारस मुळे तेले नई सांगता उन नई| 27 आणि राजानी लगेच एक शिपाहिले आदन्या दिसन धाळा कि तेन डोक कापी लयोत | 28 तेनी बंदिशाळा मा जायीसन तेना डोक कापा आणि एक ताठ मा ठेयीसन लयना आणि पोर ले दिधा आणि पोर नि आपली माय ले दिधा | 29 हय आयकीसन योहान ना शिष्य उनात आणि तेना धळ ले उचलीसन कबर मा ठेवा || 30 प्रेषितनि येशू ना जोळे एकत्र हुईनात जे काही तेसनी कर आणि शिकाळेल होत सगळ तेले सांगी टाक | 31 तेनी तेसले सांग; कि अरण्यस्थली एकांत मा ईसन थोळा आराम करा कारण कि गैरा लोक येनजान करत होतात आणि तेसले खावानी बी सवळ भेटत नई होती | 32 एनासाठे त्या नाव वर चळीसन सुनसान जागावर आलग चालना ग्यात | 33 गैरा झनसनी तेसले जातांना देखीसन वैखीलीधा आणि सगळा नगर मा एकत्र हुईसन तठे पायदळ पयनात आणि तेसणा तून पहिले पोचीग्यात | 34 तेनी उतरी सन मोठ्ठी गर्दी देखी आणि तेसणा वर दया करी कारण कि त्या ज्या मेड्यासले मेंडपाळ नई तेसणा सारखा त्या होतात आणि तो तेसले गैर्या गोष्टी शिकाळाले लागी ग्या | 35 जव दिन ढई ग्या त तेना शिष्य तेनाजोळे ईसन सांगाले लागनात हय सुनसान जागा शे आणि दिन गैरा ढई जायेल शे | 36 तेसले धाळी दे कि त्या चारीसकल्ला गावस्मा आणि वस्तीसमा जाईसन आपला साठे काही खावाले विकत लेवोत | 37 तेनी तेसले उत्तर दिधा; कि तुम्मीच तेसले खावाले द्या: तेसनी तेले सांग; काय आह्मी पन्नास रुपयांनी भाकरी विकत लीवूत आणि तेसले खावाळूत ? 38 तेनी तेसले सांग; जायीसन देखा तुमनापा कितल्या भाकरी शेतस ? तेसनि मालूम करीसन सांग; पाच आणि दोन मासा बी | 39 तव तेनी तेसले आदन्या दिधी कि सगळा लोकसले हिरवा गवत वर पंक्तीपंक्ती कण बसाळी द्या | 40 त्या शंभर शंभर आणि पन्नास पन्नास करीसन पंक्तीपंक्ती मा बठी ग्यात | 41 आणि तो त्या पाच भाकरी आणि दोन मासासले लीधा आणि स्वर्ग कळे देखीसन आशीर्वाद दिधा आणि भाकरी मोळी मोळीसन शिष्यासले देत ग्या कि त्या लोकसले वाळोत आणि त्या दोन मासा बी त्या सगळासमा वाटी टाकात | 42 आणि सगळा खायीसन तृप्त हुईग्यात| 43 आणि तेस्नी तुकळा तुकळा बारा डालक्या भारीसन उचलात आणि काही मासासना बी | 44 जेस्नी भाकऱ्या खादात त्या पाच हजार मानस होतात || 45 तव तेनी लगेच आपला शिष्यासले नाव वर चळाव कि त्या तेना तून पहिले त्या पार बेथसैदा ले चालना जावोत जठलगून कि तो लोकसले वाट लावस | 46 आणि तेसले धाळीसन पहाळ वर प्राथना कराले ग्या | 47 आणि जव संज्याकाय हुयनी त नाव समुद्र ना मधमा होती आणि तो एखटा जमीन वर होता | 48 आणि जव तेनी देख कि त्या वाल्ही मारत मारत हैराण हुईजायेल शेतसकारण कि हवा तेसणा समोरून होती नंतर सुमारे रात ना चौथा पहरले तो समुद्र वर चालत चालत तेसणा कळे उना; आणि तेसणातून पुळे निघी जावाना देखीराय्न्ता | 49 पण तेसनी तेले समुद्र वर चालतांना देखीसन समज कि भूत शे आणि ओरळाले लागनात कारण कि सगळा तेले देखीसन घाबरी जायेल होतात | 50 पण तेनी लगेच तेसना बराबर बोलाले लागणा आणि सांग; घाळस बांधा: मी शे; भिऊ नका | 51 तव तो तेसणा कळे नाव वर उना आणि वारा थामी गी : आणि त्या गैरा आचर्य कराले लागनात | 52 कारण कि त्या भाकरीस ना विषय मा समगजेल नई होतात पण तेसणा मन कठोर हुईजायेल होतात || 53 आणि त्या त्यापार उतरीसन गनेसरेत मा पोचणात आणि मचवा बांधीसन ठेवा | 54 आणि जव त्या नाव वरून उतरणात त लोक लगेच तेले वयखीसन | 55 आंगे पांगे ना सगळा देश मा पयनात आणि आजारीसले खाटसवर टाकिसन जठे जठे मालूम पळण कि तो शे तठे तठे लेत फिरणात | 56 आणि जठे कोठे तो गावस नगरस का वस्तीसमा जात होता त लोक आजारीसले बजारसमा ठीयसन तेना शी विनंती करत होतात कि तो तेसले आपला वस्त्र ना गोंड्याले फक्त हात लाऊ दे : आणि जीतला तेले हात लावत होतात सगळा बरा हुई जात होतात |