8
1 त्या दिनस्मा जव परत मोठ्ठी गर्दी एकत्र हुयनी आणि तेसणा जोळे काही खावाले नई होत त तेनी तेना शिष्यासले जोळे बलायसन तेसले सांग | 2 मले ह्या गर्दी वर दया येस कारण कि ह्या तीन दिन पासून बराबर मना संगे शेतस आणि तेसणा जोळे काय बी खावाले नई | 3 कदी मी तेसले भुक्या घर धाळी दिवू त रस्ता मा थकीसन राहयजातीन; कारण कि एसना मधून कोणी कोणी दूरतून एयेल शेतस | 4 तेना शिष्यासनी तेले उत्तर दिधा कि आठे पहाळ मा ईतल्या भाकरी कोणी कोठून लईन कि ह्या तृप्त होवोत ? 5 तेनी तेसले विचार; तुमना जोळे कितल्या भाकरी शेतस? तेस्नी सांग सात | 6 तव तेनी लोकसले जमीन वर बसानी आदन्या दिधी आणि त्या सात भाकऱ्या लीधा आणि धन्यवाद करीसन मोळी आणि आपला शिष्यासले देतग्या कि तेसणा समोर ठेवोत आणि तेस्नी लोकस पुळे व्हाळी टाक | 7 तेसणा जोळे थोळ्याश्या धाकल्या मासा बी होतात ; आणि तेनी धन्यवाद करीसन तेसले बी लोकसले पुळे ठेवानि आदन्या दिधी | 8 त त्या खायीसन तृप्त हुईग्यात आणि उरेल तुकळासना सात डालक्या भरीसन उचलनात | 9 आणि लोक चार हजार ना लगभग होतात; तव तेनी तेसले परत धाळा | 10 आणि तो लगेच आपला शिष्यास संगे नाव वर चळीसन दल्मनुथा प्रांत ले चालना ग्या || 11 नंतर परुशी ईसन तेनाशी विवाद कराले लागनात आणि तेनी परीक्षा लेवासाठे तेना पासून आकाश मधून चिन्ह मांगा | 12 तेनी आपली आत्मा मा कन्हून सांग ह्या वेळ [टाईम] ना लोक काब चिन्ह मांगतस ? मी तुमले खरज सांगस कि ह्या वेळ [टाईम] ना लोकसले कोणताच चिन्ह नई देवायणार | 13 आणि तो तेसले सोळीसन परत नाव वर चळी ग्या आणि पार चालना ग्या || 14 शिष्य भाकरी लेवाले विसरी जायेल होतात आणि नाव मा तेसणा जोळे एकच भाकर होती | 15 आणि तेनी तेसले जताळ कि देखा परुशीसना खमीर आणि हेरोदेसना खमीर पासून सावधान राहा | 16 त्या आपसा मा विचार करीसन सांगाले लागनात कि आमना कळे भाकर नई शे | 17 हय वयखीसन येशू नि तेसले सांग; तुमी काब आपसा मा हय विचार करी राय्नात कि आमना जोळे भाकर नई ? काय आते लगून वयखतस नई आणि समजत नई ? काय तुमना मन कठोर हुईजायेल शे ? 18 काय डोया हुईसन बी नई देखतस आणि कान हुईसन बी नई आयकतस ? आणि काय तुमले आठवण नई | 19 कि जव मनि पाच हजार साठे पाच भाकरी मोळेल होती त तुमनी तुकळासना कितल्या डालक्या भरीसन उचलात ? तेस्नी तेले सांग बारा डालक्या | 20 आणि जव चार हजारस साठे सात भाकरी होतात त तुमनी तुकळासना कीतल्या डालक्या भरीसन उचलेल होतात | 21 तेनी तेसले सांग काय तुमी आते लगून नई समजतस ? 22 आणि त्या बेथसैदा मा उनात आणि लोक एक अंधा ले तेना कळे लयी उनात आणि तेनाशी विनंती करी कि तेले हात लावो. 23 तो त्या अंधा ना हात धरीसन तेले गाव ना बाहेर लीग्या आणि तेना डोया मा थुकीसन तेना वर हात ठेवणा आणि तेले विचारणा; '' तुले काही दिखस का? 24 तो वरे देखीसन सांगणा; मले मानससले देखस; त्या मले चालता झाळस सारखा दिखीराय्नात ''| 25 तव तो दुसऱ्यांदा तेना डोया वर हात ठेवात आणि अंधानी निरखीसन देख आणि चांगला हुईग्या आणि सगळ काही स्पष्ट दिखाले लागीग्या. 26 आणि तेनी तेले हय सांगीसन घर धाळ कि ह्या गाव ना मधमा पाय बी नको ठेवजो || 27 येशू आणि तेना शिष्य केसरीया फिलीप्पिना गाव मा चालना ग्यात: आणि रस्ता मा तेनी आपला शिष्यासले विचार कि लोक मले काय सांगतस ? 28 तेस्नी उत्तर दिधा कि योहान बाप्तिस्मा देणार; पण कोणी; एलिया; आणि कोणी कोणी त संदेष्ट्यांपैकी एक बी सांगतस | 29 तेनी तेसले विचार; पण तुमी मले काय सांगतस ? पेत्रनि तेले उत्तर दिधा; तू ख्रिस्त शे | 30 तव तेनी तेसले जताळीसन सांग कि मना बारामा हय कोले बी नका सांगज्यात | 31 आणि तो तेस्ले शिकाळाले लागीग्या माणूस ना पुत्र ना साठे दु:ख भोगणे आणि वळिल मंडळ मुख्य याजक आणि शास्त्रीस कळून नाकाराय जावू आणि मारीटाकाय जावू आणि तीन दिन ना नंतर परत जिंदा हुई जावो | 32 तेनी हय गोष्ट तेसले स्पष्ट सांगी टाकी: एनावर पेत्र तेले आलग लीजाईसन दबाले लागणा | 33 पण तो फिरीसन आपला शिष्यस कळे देख आणि पेत्रले धमकाचीसन सांग; कि अरे शैतान मना समोरून निघीजा; कारण कि तू देव नि गोष्टवर नई पण मानससना गोष्टीसवर मन लावस | 34 तेनी गर्दी ले आपला शिष्यस संगे जोळे बलाईसन तेसले सांग जेले कोले मना मांगे येन शे तो आपल्या आपले नकारीसन आणि आपला वधस्तंभ उचलीसन मना मांगे येवोत. 35 कारण कि जो कोणी आपला जीव वाचाळाना देखस तो तेले दवाळीन पण जो कोणी मना आणि सुवार्ताकरता आपला जीव दावाळीन त तो तेले वाचाळीन | 36 कदि माणूस सगळा जगले जीकीलीन आणि आपाला जीव ना नाश करीलेस तर तेले काय फायदा हुईन ? 37 आणि माणूस आपला जीव ना बदला मा काय दिन ? 38 जो कोणी ह्या व्यभिचारी आणि पापी जातीसमा मनाशी आणि मना गोष्टीसले लाजीन माणूस ना पुत्र बी जव तो पवित्र देवदुतससंगे आपला बाप ना गोरावसंगे ईन तव जेनाशी बी लाजाईन |