9
1 आणि तेनी तेसले सांग; मि तुमले खरज सांगस कि ज्या आठे उभा शेतस तेसणा मधून कोणी कोणी असा शेतस कि जठ लगून देव ना राज्यले पराक्रम संगे एयेल देखतस नई तठ लगून मोत ना अनुभव येणार नई 2 साहा दिन नंतर येशू नि पेत्र आणि याकोब आणि योहान ले संगे लीना आणि एककळे उच्चा पहाळ वर लीग्या; आणि तेस्ना समोर तेना रूप बदली ग्या | 3 आणि तेना कपळा असा चमकाले लागनात आणि जास्त धव्या हुईनात कि धरतीवर कोणीच तितला धव्या नई करू सकस | 4 आणि तेसले मोशेसंगे एलिया दिखना; आणि त्या येशू संगे गोष्टी करत होतात | 5 येणा वर पेत्र नि येशू ले सांग; गुरुजी आमन आठे राहाण चांगल शे: एना साठे आम्ही तीन मंडप करूत; एक तुनासाठे एक मोशेसाठे आणि एक एलिया साठे | 6 कारण कि तो नई समजत होता कि काय उत्तर दिवू; एना साठे कि त्या गैरा भ्याई जायेल होतात | 7 तव एक मेघ ईसन तेसले झाकी लीधा आणि त्या मेघ मधून एक शब्द निघणा कि हवू मना प्रिय पुत्र शे ; तेनी आयका | 8 तव तेसनी एकाएकी चारीसकळे नजर टाकी आणि येशुले सोळीसन आपला संगे कोलेच नई देख || 9 डोंगर वरून उतरतांना तेनी तेसले आदन्या दिधी कि जठ लगून माणूस ना पुत्र मरण मधून जिंदा ना हुईजावो तठलगून जे काही तुमी देखेल शेत ते कोले सांगज्यात नका | 10 तेस्नी ह्या गोष्टले ध्यान मा ठेव; आणि आपसा मा विवाद कराले लागनात कि मरा मधून जिंदा होवाना म्हणजे काय अर्थ शे ? 11 आणि तेस्नी तेले विचार शास्री काब सांगतस कि एलिया ना पहिले येवाना निच्चीत शे ? 12 तेनी तेसले उत्तर दिधा कि एलिया खरज पहिले ईसन सगळ काही सुदारीन पण माणूस ना पुत्र ना बारामा हय काब लिखेल शे कि तो गैरा दु:ख भोगीन आणि तुच्छ माईन ? 13 पण मी तुमले सांगस कि एलिया ईजायेल शे आणि जस तेना विषय लिखेल शे तेस्नी जे काही वाटण तेना संगे करणात || 14 जव तो शिष्यास जोळे उना त देखणा कि तेस्ना चारीस कळे गैरी गर्दी जमा शे आणि शास्त्री तेसणा संगे संवाद करी राय्नात | 15 आणि तेले देखताच सगळा गैरा चकित हुईनात आणि तेना कळे पयत जायसन तेले नमस्कार करणात | 16 तेनी तेसले विचार; तुमी एसना संगे काय संवाद करी राय्नात ? 17 गर्दी मधून एक नि तेले उत्तर दिधा कि गुरुजी मी आपला पुत्र ले जेनामा मुक्का आत्मा घुशेल शे तुना कळे लयेल होता | 18 जठे कोठे ती तेले धरस तठेच उपटी देस: आणि तो तोंड मा फेस लईएस आणि दात कडकडा खास आणि [सुकत]क्षीण होस: आणि मनी तुना शिष्यासले सांगा कि त्या तेले काळी टाकोत पण त्या काळी सकनात नई | 19 हय आयकिसन तेनी तेसले उत्तर दिसन सांग : ''ओ विस्वासहीन लोक मी कठ लगून तुमना संगे राहासू ? आणि कठ लगून तुमनि सहन करसू ? तेले मना कळे लया | 20 तव त्या तेले तेना कळे लइ उनात : आणि जव तेनी तेले देखा त त्या आत्मा नि लगेच तेले पीई टाक; आणि तो जमीन वर पळणा आणि तोंडमा फेस लयीसन लोळाले लागणा. 21 तेनी तेना बाप ले विचार; एनि हयी स्थिती कवय पासून शे ? तेनी सांग बाळतपण पासून. 22 तेनी तेले मारा साठे कव विस्तवमा आणि कव पाणी मा पाळा; पण तू कदि काही करीसकस त आम्हणावर करुणा करीसन आम्हले साहाय्य कर. 23 येशू नि तेले सांग; कदि तू करी सकस ? हय काय गोष्ट शे विस्वास करणार साठे सगळ काही हुई सकस | 24 पोऱ्या ना बाप लगेच रावन्या करी करी सांगणा; ओ गुरुजी मी विस्वास करस मना अविश्वास ले काळी टाकाले मले साहाय्य कर | 25 जव येशू नि देख कि लोक पयत ईसन गर्दी करीराय्नात त तेनी दृष्ट आत्मा ले हय सांगीसन धमकावा ; कि ओ मुक्की आणि बहिरी आत्मा मी तुले आद्न्या देस तेना मधून निघीजा आणि तेनामा परत कधीच घुसजो नको | 26 तव तो आराया मारत; आणि तेले गैरा पियीसन निघी गई; आणि पोऱ्या मरेल सारखा हुईग्या आठलगून कि गैरा लोक सांगाले लागनात कि तो मरी ग्या | 27 पण येशू नि तेना हात धरीसन तेले उठाळना आणि तो उभा हुईग्या | 28 जव तो घरमा उना त तेना शिष्यसनी एकांत मा तेले विचार आमी तेले कसकाय नई काळी सकनुत ? 29 तेनी तेसले सांग कि हय जात प्राथना बिगर दुसरा कोणताच प्रकारे निघत नई || 30 नंतर त्या तठून निघीसन गालील मधून जाईराय्नतात आणि हय कोले मालूम नको पळाले पाहिजे अशी तेनी ईछा होती. 31 कारण कि तो आपला शिष्यसले प्रवचन देत आणि तेसले सांगत होता कि माणूस ना पुत्र माणससना हातमा धराय देवाय जाईन आणि त्या तेले मारी टाकतीन आणि तो मरणा ना तीन दिन नंतर परत:उठीन | 32 पण हय गोष्ट तेसणा समजमा नई उणी आणि त्या तेले विचाराले घाबरत होतात || 33 नंतर त्या कफार्णहुम मा उनात; आणि घर मा ईसन तेनी तेसले विचार रस्ता वर तुमी कोणती गोष्ट वर संवाद करीराय्न्तात ? 34 त्या शांत राय्नात कारण कि रस्ता मा तेस्नी संवाद करेल होतात कि आम्हना मधून मोठा कोण शे ? 35 तव तो बठीसन बारासले बलावना आणि तेसले सांग कदि कोणी मोठा होवाना देखस त सगळास तून धाकला आणि सगळासना चाकर बनाले पाहिजे | 36 आणि तेनी एक पोऱ्या ले लिसन तेसणा मधमा उभा करा आणि तेले मांडीवर लिसन तेसले सांग | 37 जो कोणी मना नाव तून असा पोरस मधून कोले एक ले बी स्वीकारस तो मले स्वीकार करस; आणि जो कोणी मले स्वीकार करस तो मले नई पण मना धाळणार ले स्वीकारस || 38 तव योहान नि तेले सांग गुरुजी आमी एक माणूस ले तुना नाव तून भूत काळतांना देख आणि आमी तेले मना कराले लागनुत कारण कि तो आपला मांगे चालणार नई होता | 39 येशू नि सांग तेले नका मना करा; कारण कि असा कोणी नई कि जो मना नाव तून सामर्थी ना काम करो आणि लवकर मले वायीट सांगो | 40 कारण कि जो आमना विरुध्द मा नई तो आमना कळे शे | 41 जो कोणी तुमले एक प्याला पाणी एनासाठे पेवाले देईन कि तुमी ख्रिस्तना शेतस त मी तुमले खरज सांगस कि तो आपला प्रतीफय कोणताच प्रकारे सोळाव नई | 42 पण जो कोणी ह्या धाकलास मधून मना वर विश्वास करतस कोले बी अळखळनमा टाकीन त तेना साठे चांगल हय शे कि एक मोठी चक्की ना पाट तेना गयामा बांधीसन तेले समुद्रमा टाकि देवोत | 43 कदि तुना हात मले अळखनमा लयस त तेले कापी टाक डून्डां हुईसन जीवन मा प्रवेश करजो तुना साठे एनातून चांगल शे कि दोन हात राहातांना नरक मा त्या अग्निमा टाकाय जावो जी कधीच मालावत नई | 44 [ जठे तेसणा किळा नई मरत आणि विस्तो नई मलावत ] 45 आणि कदी तुना पाय तुले अळखनमा लयस त तेले कापी टाक | लंगळा हुईसन जीवनमा प्रवेश कराणा तुनासाठे एनातून चांगल शे कि दोन पाय राहातांना नरक मा टाकाय जावो | 46 [ जठे तेना किळा नई मरत आणि विस्तो नई मलावत ] 47 आणि कदी तुना डोया तुले अळखन लयस त तेले काळी टाक अकडोया हुईसन देव ना राज्यमा प्रवेश करण तुनासाठे एनातून चांगल शे कि दोन डोया राहतांना तू नरक मा टाकाय जावो | 48 जठे तेस्ना किडा नई मरत आणि विस्तो नई मलावत | 49 कारण कि प्रत्येक माणूस विस्तोमा शुद्ध करायीन | 50 मीठ चांगल पदार्थ शे पण कदी तेना खारटपना चालनाग्या त तेले कसा पासून चवदार बनावशात ? आपलामा मीठ ठेवा आणि एकमेकबरोबर शांतीमा राहा .