15
1 मंग पहात होताच लगेच मुख्य याजक वळिल धारी आणि शास्त्रीस नि आखो सर्व न्यायसभा नि निर्णय करीसन येशू ले बांधाळ आणि तेले ली जाईसन पिलात ना हात मा सोपी टाक | 2 आणि पिलात नि तेले विचार काय तू यहुदीसना राजा शे ? तेनी तेले उत्तर दिधा; कि तू आपला आपच सांगीराय्ना | 3 आणि मुख्य याजक तेना वर गैरा गोष्टीसना आरोप लाईराय्नतात | 4 पिलात नि तेले परत विचार काय तू काही उत्तर नई देत देख ह्या तुनावर कितल्या गोष्टीसना आरोप लावतस ? 5 येशू नि परत काही उत्तर नई दिधा; आठ लगून कि पिलात ले गैरा आचर्य हुयना|| 6 आणि तो त्या सन मा कोले एक बंदिमा टाकेल ले जेले त्या निवाळतस तेसणा साठे सोळी टाकत होता | 7 आणि बरब्बा नाव ना एक माणूस त्या बंडखोऱ्यास बरोबर बंदी मा होता जेस्नी बंडामा खून करेल होता | 8 आणि गर्दी वरे जाईसन तेनाशी विनंती कराले लागणी कि जसा तू आम्हना साठे करत ईयेल शे तसच कर | 9 पिलात नि तेसले हय उत्तर दिधाकाय तुमनी ईछ्या शेकि मी तुमना साठे यहुदी ना राजा ले सोळी दिवू ? 10 कारण कि तो समजत होता कि मुख्य याजकस नि तेले हेवाकण धरायेल होत | 11 पण मुख्य याजकस नि लोकसले जताळ कि त्या बरब्बा लेच तेसणा साठे सोळी देवो | 12 हाय आयकिसन पिलात नि तेस्नाशी परत विचार; त जेले तुमी यहुदी ना राजा सांगतस तेले मी काय करू? त्या परत वरळनात कि तेले वधस्तंभवर चळाई टाक | 13 पिलात नि तेसले सांग ; काबएनी काय वाईट करेल शे ? 14 पण त्या आखो वरळनात कि तेले वधस्तंभ वर चळाई टाक | 15 तव पिलात नि गर्दी ले खुश करानी ईच्छा कन बरब्बा ले तेसणा साठे सोळी टाकणा आणि येशू ले फटका मारीसन सोपी टाक कि वधस्तंभ वर चाळइ टाकोत | 16 आणि शिपाही तेले किला ना मधला आंगण मा लीग्यात जेले प्रीटोरीयुन सांगामा येस आणि सगळी पलटण ले बलाई लयनात | 17 आणि तेस्नी तेले जांभा[बैजन] वस्त्र घाला आणि काटासना मुकुट गुफिसन तेना डोकावर ठेवा | 18 आणि हय सांगीसन तेले नमस्कार कराले लागनात कि ओ यहुदिसना राजा नमस्कार ! 19 आणि त्या तेना डोका वर वेतकण मारत होतात आणि तेना वर थुकत आणि गुळगा टेकीसन तेले प्रणाम करत राय्नात | 20 आणि जव त्या तेनी निंदा करीलीनात त तेनावरून जांभा वस्त्र काळीसन तेनाच कपळा घालात; आणि आते तेले वधस्तंभ वर चळावा साठे बाहेर ली ग्यात || 21 आणि अलेक्षांद्र आणि रुफ ना बाप शिमोन नाव ना एक कुरनेकर माणूस जो गाव तून ईराय्न्ता तीकळून निघणा ; तेस्नी तेले {बेकार} मा धर कि तेना वधस्तंभ उचली चालो | 22 आणि त्या तेले गुलगुथा नाव जागावर जेना अर्थ कवटी नि जागा शे लायनात | 23 आणि तेले बोळ कालायेल द्राक्षरस देवाले लागनात पण तेनी नई लिध | 24 जाव तेस्नी तेले वधस्तंभवर चळाव आणि तेना वस्त्रवर चिठ्या टाकीसन कि कोले काय भेटो तेसले वाटी लिधा | 25 आणि पहर दिन चाळेल होता जव तेस्नी तेले वधस्तंभवर चळाव | 26 आणि तेना दोष आरोप ना लेख तेना वरे लावामा उना कि '' यहुदिसना राजा '' | 27 आणि तेस्नी तेना सांगे दोन लुटारु एक तेना उजवी कळे आणि एक तेना डाखोऱ्या कळे वधस्तंभवर चळावा | 28 [तव पवित्र शास्त्र ना तो वचन नि तो अपराधीस संगे मोजायना पूर हुयन | 29 आणि रस्ता मा जाणार डोक हालाई हालाई सन आणि हय सांगीसन तेनी निंदा करत होतात कि व्हा !मन्दिर ले पाळणार आणि तीन दिन मा बांधणार! वधस्तंभवर वरून उतरीसन स्वता ले वाचाळीले | 30 ह्याच प्रकारे मुख्य याजक बी शास्त्री संगे 31 आपसा मा थट्टाकण सांगत होतात; कि एनी दुसरासले वाचाळ आणि स्वता ले नई वाचाळी सकत | 32 इस्राएलना राजा ख्रिस्त आते वधस्तंभवरून उतरी ये कि आम्ही देखीसन विस्वास करूत : आणि ज्या तेना संगे वधस्तंभवर चळायेल होतात त्या बी तेनी निंदा करत होतात || 33 आणि दुफार होवावर सगळा देश मा आंधार पळीग्या; आणि तिसरा पहर लगून राय्ना | 34 तिसरा पहर येशू नि मोठा शब्द मा आराया मारीसन इलोई इलोई लमा शबकतनी ? जेना अर्थ शे ; मना देव मना देव तुनी मळे काब सोळी टाक ? 35 ज्या जोळे उभा होतात तेसणा मधून कितलासनी हय आयकीसन सांग: देखाहवू एलीयाले बलाइराय्ना | 36 आणि एक नि पयीसन स्पंज आंबेमा[सिरके] बुळावा आणि वेतवर ठीईसन तेले चुसाळ ; आणि सांग थाम्मी जा देखा कि एलिया तेले उताराले येस कि नई | 37 तव येशू नि मोठा शब्द मा वरळीसन जीव सोळी टाका | 38 आणि मंदिर ना परदा वरून त खाले लगून फाटीसन दोन तुकळा हुई ग्या | 39 जो जमादार तेना समोर उभा होता जव तेले अस वरळीसन जीव सोळतांना देख त तेनी सांग खरज हवू माणूस देव ना पुत्र होता | 40 कइक स्त्रीया बी दुरून देखी राय्न्तात : तेसणा मा मरिया मग्दाली आणि याकोब नि आणि योसे नि माय मरिया आणि सलोमे होती | 41 जव तो गालील मा होता त ह्या तेना नागे चालू लागत होत्या आणि तेनी सेवाकायम करत होत्या; आखो बी गैऱ्या स्त्रीया होत्यात || 42 जव संज्याकाय हुईगी त एनासाठे तयारी दिन होता जो सब्बाथ ना एक दिन पहिले हुस | 43 अरीमथाई ना राहाणार योसेफ उना जो प्रतिष्ठित मंत्री आणि स्वता बी देवना राज्य ना रस्ता देखी राय्न्ता; तो हिम्मत धरीसन पिलात कळे ग्या आणि येशू न शरीर मांग | 44 पिलात ले नवल वाटण कि तो इतला लवकर मरी ग्या; आणि जमादार ले बलाईसन विचार कि काय तेले मरेल थोळा टाईम हुईना ? 45 त जव जमादार कळून हाल माहित करी लीधा त शरीर योसेफ ले देवाळी टाकी | 46 तव तेनी एक बारीक [पातळ] चादर ईकत लिधी आणि शरीर ले उतारीसन तेले चादर मा गुंडाळ आणि एक कबर मा जी दघळस मा खोदायेल होती ठेवा आणि कबर ना दरवाजा वर दघळ लोटी टाक | 47 आणि मग्दालीया मरिया आणि योसेफ नि माय मरिया देखीरायन्ति कि तो कोठे ठेवायेल शे ||