6
1 ओ पोरसहोण, प्रभू मा आपला माय बाप ना आदन्या कारी बना, कारण कि हय बर शे | 2 आपला माय बाप ना आदर कर[ हय पहिली आदन्या शे, जेना संगे शेप्पत बी शे] | 3 कि तून बर होवो, आणि तू धरती वर गैर दिन जिंदा राहो | 4 आणि ओ पोरस वालाहोण आपला पोरस्ले राग नका येवाळा पण प्रभू नि शिक्षा, आणि चेतावणी देत, तेस्ना पयन पोसण करत राहा || 5 ओ दाससहोण, ज्या लोक शरीर प्रमाणे तुमना मालक शेतस, आपली मन नि सरळता कण भ्यात, आणि कापत, जसा ख्रिस्त नि, तशीच तेस्नी बी आदन्या मना | 6 आणि मानसस्ले खुश करणारस सारखा दाखाळा साठे सेवा नका करज्यात, पण ख्रिस्त ना दास सारखा मन पासून देव नि ईच्छा वर चाला | 7 आणि त्या सेवा ले मानसस सारखी नई, पण प्रभू नि समजीसन सुईछा कन करा| 8 कारण कि तुमले माहिती शे, कि जो कोणी जस चांगल काम करीन, तो दास का नई होवो, कि स्वातंत्र; प्रभू पासून तसच भेटीन | 9 आणि ओ मालकसहोण, तुमी बी धमक्या सोळिसन तेसणा संगे तसाच व्यवहार करा, कारण कि माहिती शे, कि तेसणा आणि तुमना दान ना मालक स्वर्ग मा शे, आणि तो कोण पक्षपात नई करत | 10 निदान, प्रभू मा आणि तेनी शक्ती मा शक्तिशाली बना| 11 देव ना पुरा शास्त्रबांधी ल्या; कि तुमी शैतान नि युक्तीस पुळे उभा राही सकोत | 12 कारण कि आमन हय मालयुध्द, रक्त आणि मास कण नई, पण प्रधान आणि अधिकारीसंगे, आणि ह्या संसार ना अधिपतीस कण, आणि त्या दृष्टआत्मिक सेनास संगे शे जी आकाश मा शे | 13 एनासाठे देव ना पुरा शास्त्रबांधी ल्या, कि तुमी वाईट दिनस्मा सामना करी सकोत, आणि सगळ काही पूर करीसन सरळ उभा राही सकोत | 14 त सत्य कण आपली कमर बांधीसन, आणि धार्मीक्ता नि झीलम घालीसन | 15 आणि पायस्मा मेय नि सुवार्ता नि तयारी ना जुता घालीसन| 16 आणि त्या सर्वा संगे विश्वास नि ढाल लिसन सरळ राहा जेना कण तुनी त्या दृष्ट ना सगळा पेटता बानस्ले मालवू सकोत | 17 आणि तारणरुपी शीरस्त्राण, आणि आत्मा नि तलवार जी देव ना वचन शे, ली ल्या | 18 आणि हर वेळ आणि हर प्रकारे आत्मा मा प्रार्थना, आणि विनंती करत राहा, आणि एनाच साठे जाग्या राहा, कि सगळा पवित्र लोकस्ना साठे कायम विनंती करत राहा | 19 आणि मना साठे बी, कि मले बोलाना टाईम[वेळ] असा ध्रुळ वचन देवामा येवो, कि मी हिम्मत कण सुवार्ता ना गुज[भेद] सांगी सकू जेना साठे मी बेळ्यास्मा बांधाये राजदूत शे | 20 आणि हय बी कि मी तेना बारा मा जस मले पाहिजे हिम्मत कण बोलू || 21 आणि तुखिक जो प्रिय भावू आणि प्रभू मा विश्वास योग्य सेवक शे तुमले सगळ्या गोष्टी सांगीन, कि तुमी बी मनी दशा जाणोत कि मी कसा राहास | 22 तेले मी तुमना जोळे एनाच साठे धाळेल शे, कि तुमी आमनी दशा जानीत, आणि तो तुमना मनस्ले शांती देवो || 23 देव बाप आणि प्रभू येशू ख्रिस्त ना कळून भावूस्ले शांती आणि विश्वास सहित प्रेम भेटो | 24 जो आमना प्रभू येशू ख्रिस्त संगे खरा प्रेम करस, त्या सगळास्वर कृपा होत राहो ||