4
1 हे स्वामी,आपला आपला दास ना बरोबर न्याय आणि चांगला चांगला व्यवहार करा,हाई समजी सन कि तुमना भी एक स्वामी स्वर्ग मा शे || 2 प्रार्थना करत राहा,आणि धन्यवाद ना संगे तेना मा जगृत राहा | 3 आणि एना संगे संगे आमना साठे भी प्रार्थना करत राहा,कि देव आमना साठे वचन आयकावान असा दरवाजा उघाडो,कि आमी ख्रिस्त ना तो भेद ना वर्णन करी शकू जेना कारण मी कैद माशे | 4 आणि तेले असा प्रकट करू;जसा माले करान चांगल वाटस | 5 वेळ ले बहुमल्य समजीसन बाहेरनास्ना संगे बुद्धिमान शी वागणूक करा | 6 तुमना वचन सर्वदा कृपा सहित आणि सयाना होवो,कि तुमले प्रत्येक मनुष्य ले चांगला रिती शी उत्तर देवाले ईजावो || 7 प्रिय भाऊ आणि विश्वासयोग्य सेवक,तुखिकुस जो प्रभू मा मना सहकर्मी शे, मना सर्व गोष्टी तुमले सांगी दिन | 8 तेले मिनी एनासाठे तुमना कडे धाडी रायनू,कि तुमले आमनि दशा माहित होई जावो आणि तो तुमना हृदय ले शांती देवो | 9 आणि तेना संगे उनेसिमुस ले भी धाडेल शे जो विश्वासयोग्य आणि प्रिय भाऊ आणि तुमनामधुनच शे,हाऊ तुमले आडली सर्वी गोष्ट सांगी दिन || 10 अरिस्तर्खुस जो मना संगे कैदी शे,आणि मार्क जो बरनबा ना भाऊ लागस ( जेना विषय मा तुमले आज्ञा भेटनी कि जर तो तुमना कडे येवो,तर तेनाशी चांगला प्रकारे व्यवहार करजा | ) 11 आणि येशू जो युस्तूस सांगामा एस,तुमले नमस्कार सांगतस | खतना करेल लोक मधून फक्त याच देव ना राज्य ना साठे मना सहकर्मी आणि आणि मनी शांती ना कारण राहेल शे | 12 ईपफ्रास जो तुमना मधून शे,आणि ख्रिस्त येशू ना दास शे,तुमले नमस्कार सांगस आणि सर्वदा तुमना साठे प्रार्थना मा प्रयत्न करस, कारण तुमी सिद्ध होईसन पूर्ण विश्वास ना संगे देव नि इच्छा वर स्थिर राहा | 13 मी तेना साक्ष शे,कि तो तुमना साठे आणि लौदिकीया आणि हियरापुलीसवाला साठे मोठा यत्न करस | 14 प्रिय वैध्य लुक आनी देमास ना तुमले नमस्कार | 15 लौदिकीया ना भाऊसले आणि नुमफास आणि तेसणा घर नि मंडळी ले नमस्कार सांगज्यात | 16 आणि जव ते पत्र तुमना आठे वाचाई जास,तर अस करा कि लौदिकीया नि मंडळी माभी वाचामा येवो,आणि तो पत्र जे लौदिकीया तून इन तेले तुमी भी वाचज्यात | 17 मंग अर्खीपूस ले सांगज्यात जी सेवा तुले प्रभू मा सोपेल शे,तेले सावधानी पूर्वक पूर्ण करजो || 18 मि पौल ना आपला हात वर लिखेल ना नमस्कार | मनी जंजीर ले स्मरण ठेवज्यात;तुमना वर कृपा होत राहो | आमीन ||