1 Thessalonians
1 थिस्सलुनीकियों
1
1 पौल आणि सिल्वान आणि तीमथ्यस्ना कळून थेस्सलनिकाकरांससनी मंडळी ना नाव, जो आमना बाप देव आणि प्रभू येशु ख्रिस्त मा शे | 2 आमी आपली प्रार्थनास्मा तुमले आठवण करत आणि कायम तुमी सगळास्ना बारामा देव ले धन्यवाद देतस || 3 आणि आपला देव आणि बाप समोर तुमना विश्वास ना काम, आणि प्रेम ना कष्ट, आणि आमना प्रभू येशू ख्रिस्त मा आशा नि धीर ले घळीघळी आठवण करतस | 4 आणि ओ भावूसहोण, देव ना प्रेमय लोकसहोण आमले माहिती शे, कि तुमी निवाळे शेतस | 5 कारण कि आमनि सुवार्ता तुमनाच जोळे नई फक्त वचन माच आणि सामर्थ आणि पावित्र आत्मा, आणि मोठा निश्चय कन पोचेल शे; जस तुमले माहिती शे, कि आमी तुमना साठे तुमना मा कसा बनी जायेल होतुत | 6 आणि तुमी मोठा क्लेश मा पवित्र आत्मा नि ख़ुशी संगे वचन ले मानिसन आमनी आणि प्रभू नि सारखी चाल चालले लागनात | 7 आठ लगुन कि मासेदोनिया आणि अखया ना सर्वा विस्वासीस साठे तुमी आदर्श बना | 8 कारण कि तुमना आठून नईत फक्त मासेदोनिया आणि अखया मा प्रभू ना वचन आयकाळामा उना, पण तुमना विस्वास्नी जो देव वर शे, हरेक जागा वर अशी गोष्ट पसरी जायेल शे, कि आमले सांगानीच गरज नई | 9 कारण कि त्या स्वताच आमना बारामा सांगतस कि तुमना जोळे आमन एन कस हुईन; आणि तुमी कसा मूर्तीस कळून देव कळे फाकनात एनासाठे कि जिंदा आणि खरा देव नि सेवा करोत| 10 आणि तेना पुत्र नि स्वर्ग वरून येवानी वाट देखत राहा जिले तेनी मरेल मधून जीवाळेल होत म्हणजे - येशू नि, जो आमले एनारा राग पासून वाचाळीन ||