3
1 तर तुमी ख्रिस्त ना संगे जिवंत करामा उनात,तर स्वर्गीय वस्तू नि शोध मा राहा,जडे ख्रिस्त वर्तमान शे आणि देव ना उजवा बाजू बठेल शे | 2 पृथ्वी वर नि नई पण स्वर्गीय वस्तू वर ध्यान लावा | 3 कारण तुमी तर मरी ग्यात,आणि तुमन जीवन ख्रिस्त ना संगे देव मा दपेल शे | 4 जव ख्रिस्त जो आमना जीवन शे,प्रकट होईन,तव तुमी भी तेन संगे महिमा सहित प्रकट करामा येईन || 5 एनासाठे आपला त्या अंग ले मारी टाका,जे पृथ्वी वर शे,मणजे व्यभिचार,अशुद्धता,दुष्कामना,वाईट लालसा आणि लोभ ले जी मूर्ती पुजा बरोबर शे | 6 याच कारण देव ना प्रकोप आज्ञा नई माननारास्वर पडस | 7 आणि तुमी भी, या वाईट पनामा जीवन जीत होते,तर येणाच नुसार चालत होतात | 8 पण आते तुमी भी या सर्वा ले मणजे क्रोध, रोष, गैरभाव, निंदा आणि तोंड वर गाया देवान सर्व सोडी द्या | 9 एक दुसराशी खोट नका बोला,कारण तुमनी जून मनुष्यत्व ले तेना काम बरोबर उतारी दियेल शे | 10 आणि एक नवीन मनुष्यत्व ले घाली लीयेल शे जो आपला सृजनहार ना स्वरूप ना नुसार ज्ञान प्राप्त करा नासाठे नवीन बनत जास| 11 तेना मा नई तर युनानी रायना, नई यहुदी, नई खातना, नई खतानारहित, नई जंगली, नई स्कुती,नई दास आणि स्वतंत्र :फक्त ख्रिस्त सर्व काही आणि सर्वा मा शे | 12 एनासाठे देव ना निवाडेल ना सारखा जो पवित्र आणि प्रिय शे,मोठी करुणा, आणि चांगलेपण,आणि दीनता,आणि नम्रता, आणि सहनशीलता धारण करा | 13 आणि जर कोणाले कोणावर दोष देवाना काही कारण हो, तर एक दुसरा नि सहन करील्या,आणि एक दुसराना अपराध क्षमा करा:जसा प्रभू नि तुमना अपराध क्षमा करणा,तसाच तुमी भी करा | 14 आणि या सर्वा ना वरे प्रेम ना जो सिद्धता ना कटिबंध शे बांधी ल्या | 15 आणि ख्रिस्त नि शांती जेना साठे तुमी एक देह होईसन बलायेल भी शे,तुमना हृद्य मा राज्य करो, आणि तुमी धन्यवादी बनी राहा | 16 ख्रिस्त ना चन ले आपला हृदय मा जास्त प्रकारे बसू द्या;आणि सिद्ध ज्ञान सहित एक दुसराले सिखाळा, आणि चेतावा,आणि आपला आपला मन मा कृपा ना संगे देव ना साठे भजन आणि स्तुतिगान आणि आत्मिक गीत म्हणा | 17 आणि वचन शी व काम शी जे काही भी करशान सर्व प्रभू येशू ना नाव वर करा,आणि तेना द्वारे देव बाप ना धन्यवाद करा || 18 हे नवरी,जसा प्रभू मा उचित शे,तसाच आपला आपला नवरा ना आधीन राहा | 19 हे नवरा,आपली आपली नवरी शी प्रेम ठेवा,आणि तेसणा शी कठोरता नका करा | 20 हे पोरसहोण,सर्व गोष्टी मा आपला आपला माय-बाप नि आज्ञा ना पालन करा,कारण प्रभू एनाशी खुश होस | 21 हे पोरसवाला,आपला पोरस्ले त्रास नका देवू,अस नई होवाव कि तेसनि हिम्मत तुटी जावो | 22 हे सेंवको,ज्या शरीर ना नुसार तुमना स्वामी शे,सर्व गोष्टी न पालन करा,मनुष्य ले खुश करणारा सारख नई,पण मन नि सिधाई आणि देव ना भय शी | 23 आणि जे काही तुमी करतस,तन मन शी करा,हाई समजीसन कि मनुष्य ना साठे नई पण प्रभू साठे करतस | 24 कारण तुमले माहित शे कि तुमले येना बदले प्रभू कडून मिरास भेटीन:तुमी प्रभू ख्रिस्त नि सेवा करत राहा | 25 कार्न जो वाईट करस,तेले आपल वाईट न फय भेटीन;तडे कोणाच पक्षपात नई ||