3
1 लोकस्ले आठवण देवाळ, कि सत्ता आणि अधिकारीस्ना आधीन राहोत, आणि तेस्नी आदन्या मानोत, आणि प्रेतेक चांगला कामस साठे तयार राहा| 2 कोणीच निंदा नका करा;झागळा करणार नका व्हा: पण सौम्य स्वभाव ना बना, आणि सर्वा मानसस संगे नम्र पणे राहो | 3 कारण कि आमी बी पहिले, बिगर बुद्धी ना, आणि आदन्या नई मानणार, आणि बयकेल, वेगवेगळा प्रकार ना वासनस्ना आणि विलास ना दास्यत्व मा होतुत, आणि दृष्टपणा, हेवा करा मा जीवन घालावनार होतुत, आणि घृणित होतुत, आणि एक दुसरा वर व्देष करत होतुत| 4 पण जव आमना तारणार देव नि कृपा, आणि मानसस्वर तेना प्रेम प्रगट हुईनी | 5 त तेनी आमन तारण कर: आणि ह्या धर्म ना कामस कन नई, ज्या आमी स्वात करेल शेतस, पण आपली दया प्रमाणे, नवा जल्म नि जागा, आणि पवित्र आत्मा नि आमले नवा बनावा ना व्दारे हुईन | 6 जेले तेनी आमना तारणार येशू ख्रिस्त ना व्दारे आमना वर विपुलते कण ओत | 7 जेना कन आमी तेनि कृपा कन धर्मी ठरीसन, कायम ना जीवन नि आशा ना प्रमाणे वारीस बनोत | 8 हय गोष्ट खरज शे, आणि मले माहिती शे, कि तू ह्या गोष्टीस्ना बारामा धृढता कन बोलो ह्यासाठे की जेस्नी देव वर विश्वास ठीयेल शे, त्या चांगला चांगला कामस्मा लागी रावाना ध्यान ठेवोत: ह्या गोष्टी चांगल्या, आणि मानसस्ना साठे फायदा न्या शेतस | 9 पण येळास्ना वाद, आणि वंशावळ्या,बैर विरोध, आणि त्या झगळास पासून, ज्या नियमशास्त्र ना बारामा दूर राहा; कारण कि त्या निरुपयोगी आणि व्यर्थ शेतस | 10 कोणता तटपाळनार माणूस ले एक दोन दार समजाळी सन तेना पासून दूर राहा | 11 हय समजी सन कि असा माणूस बिगळी जायेल शे, आणि स्वता ले दोषी ठराई सन पाप करत राहास || 12 जव मी तुना जोळे अर्तमाले नईत तुखीकाले धाळू, त मना जोळे निकपलीसस्मा येवाना लवकर करजो: कारण कि मी तठेच हिवाया जावाळाना निश्चय करेल शे | 13 जेना शास्त्री आणि अपुल्लो ले लवकर करीसन पुळे पौचाळी दे, आणि देख, कि तेसले कोणतीच वस्तू नि कमी नको होवाले पाहिजे | 14 आणि आमना लोक बी गरजस्ले पुरा करा साठे चांगला कामस्मा लागेल राहाणा सिखोत एनासाठे कि निष्फय नई राव्हो | 15 मना सगळा जोलीदारस्ना आणि ज्या विश्वास मुळे आमना संगे प्रेम ठेवतस, तेसले नमस्कार|| तुमी सगळा स्वर कृपा होत राहो||