2
1 आणि ज्या प्रकारे त्या लोकस्मा खोटा भविष्यवक्ता होतात त्याच प्रकारे तुना मा बी खोटा शिक्षक होतीन, ज्या नाश करणार पाखंडी मते गुप्तपणा मा प्रचार मा लयतीन आणि त्या मालक ना जेनी तेसले ईकत लीयेल शे नकार करतीन आणि स्वता ले लवकर विनाश मा टाकी देतीन | 2 आणि गैराच झन तेसणा सारखा कामातुर पणा करतीन, जेस्ना मुळे सत्य ना रस्ता नि निंदा करामा ईन | 3 आणि त्या लोभ साठे वाईट गोष्टी सांगीसन तुमले आपला फायदा ना कारण बनावतीन, आणि जी दंड नि आदन्या तेसणा वर पहिले पासून हुई जायेल शे, तेना एवा मा काहीच उशीर नई, आणि तेसणा विनाश डुलक्या खात नई | 4 कारण कि जव देव नि त्या देवदूतस्ले जेस्नी पाप कर नई सोळ, पण नरक मा धाळीसन अंधार कुंडा मा टाकी दिधा, एनासाठे कि न्याय ना दिन लगून बंदी राहो | 5 आणि पहिला युग ना संसार ले बी नई सोळ, पण भक्तिहीन संसार वर महा जलप्रलय धाळीसन धर्म ना प्रचारक नोहा संगे आठ व्यक्तीस्ले वाचाळी लिध | 6 आणि सदोम आणि गोमरा ना नगर ले विनाश ना असा दंड दिधा, कि तेसले भस्म करीसन राक करी टाक एनासाठे कि त्या एणारी भक्तिहीन लोकस्नी शिक्षा साठे एक उधारण बनो | 7 आणि द्गार्मी लुथ ले जो अधर्मी ना अशुद्ध वागणा वरून गैरा दुखी होता सुटका दिधी | 8 [ कारण कि तो धर्मी तेसणा मधमा राहतांना, आणि तेस्ना अधर्म ना कामस्ले देखी देखीसन, आणि आयकी आयकिसन, दररोज आपला खरा मन ले पिळीत करत होता ] | 9 त प्रभू ना भक्त ले परीक्षा मधून काळी लेन आणि अधिर्मीस्ले न्याय ना दिन लगून दंड नि दशा मा ठेवान बी माहिती शे | 10 विशेष करीसन तेसले ज्या अमंगळपणा ना वासना कण देहोप भोग ना मांगे लागनार आणि अधिकार ले तुच्छ मानतस: त्या उध्दट, स्वच्छंदी, उच्चां पद वालास्ले बर वाईट सांगा पासून नई भ्यातस | 11 तरी बी देवदूत ज्या शक्ती आणि सामर्थ मा तेसणा तून मोठा शेतस, प्रभू समोर तेसले बरा वाईट सांगीसन दोष नई लावतस | 12 पण ह्या लोक बिगर बुद्धी ना पक्षीस्ना बराबर शेतस, ज्या धराई जावाना आणि नाश हुई जावाना साठे उत्तप्न हुयेल शेतस; आणि ज्या गोष्टी माहितीच नई, तेसणा बारामा दुसरास्ले बर वाईट सांगतस, त्या आपलीच सळनमा स्वताच सळीजातीन | 13 दुसरास्न वाईट कराना बदला मा तेस्नच वाईट हुईन: तेसले दिन दुफार विलास करण चांगल वाटस; हय कलंक आणि दोष शे- जव त्या तुमना संगे खातस- पीतस, त आपला कळून प्रेम भोज करीसन विलास करतस | 14 त्याच डोयास्मा व्यभिचारणी बसेल शे, आणि त्या पाप करा बिगर राहू सकत नईत: त्या चंचल मन वालास्ले फुसलाई लेतस; तेस्ना मन ले फुसलावा ना आभ्यास हुई जायेल शे, त्या संताप ना पोर शेतस | 15 त्या सरळ रस्ता वरून दूर चालना जायेल शेतस, आणि बौराम ना पुत्र बलाम ना रस्ता वर चालू लागेल शेतस; जेनी अधर्म नि मजुरी ले चांगली समज | 16 पण तेना अपराध ना बारामा उल्लांघन देवामा एयेल शे, आठ लगून कि मुक्क गाढव मनुष्य वाणी कन त्या भविष्यवक्ता ना एळापणा ले थांबाळ | 17 ह्या लोक जलश्युन्य झरा आणि वाद्य कण उळाये धुकय शेत, तेसणा साठे कायम न अंधकार ठरामा एयेल शे | 18 त्या व्यर्थ गर्व न्या गोष्टी करी करीसन लबाळी ना कामस व्दारे, त्या लोकस्ले शारीरिक ईच्छास्मा फसाळी लेतस, ज्या भ्रम होतात आते निघीच रायणात | 19 त्या तेसले मुक्त होवानी शेपप्त त देतस, पण स्वताच भ्रष्ट ना दास शेतस, कारण कि जो माणूस जेना पासून हारी जायेल शे, तो तेना दास बनी जास | 20 आणि जव त्या प्रभू आणि तारणार येशू ख्रिस्त नि वयख मुळे संसार ना नाना प्रकार न्या अशुधता पासून वाची निघनात, आणि नंतर तेसणा मा फसीसन हारी ग्यात, त तेस्नी मांगली दशा पहिली पासून बी वाईट हुई जायेल शे | 21 कारण कि धर्म ना रस्ता वर नई समजनच तेसणा साठे एना तून बर होत, कि तेले वयखीसन, त्या पवित्र आदन्या पासून फिरी जातस, जी तेसले सोपामा एएल होती | तेस्ना वर हय म्हण चांगल बठस 22 कि कुत्रा आपला ओकेल कळे आणि धुयेल डूक्करणी किचळ मा लोया साठे परत चालनी जास ||