5
1 जव गर्दी तेना वर पळी जात होती आणि देव ना वचन आयकत होती आणि तो गनेसरेत समुद्र ना तठवर उभा होता त अस हुईन | 2 कि तेनी समुद्र ना तठवर दोन नाव लागेल देखणा आणि मासोया तेसणा वरून उतरीसन जाया धुई राय्नतात | 3 त्या नावस मधून एक वर जी शिमोन नि होती चळीसन तेनी तेना शी विनंती करी कि तठवरून थोळासा दूर ली चाल तव तो बठीसन लोकसले नाव वरून प्रवचन सांगाले लागणा | 4 जव तो गोष्टी करी लीना त शिमोन ले सांग खोल कळे ली चाल आणि मासा धराले आपल्या जाया टाका | 5 शिमोन तेले उत्तर दिधा कि गुरुजी आम्ही पुरी रात कष्ट करनुत आणि काहीच नई धारत; तरी बी तुना सांगावरून जाय ताकसू | 6 जव तेस्नी अस कर त गैरा मासा घेरी लयनात आणि तेसन्या जाया फाटाले लागण्यात | 7 एनावर तेस्नी आपला साथिसले ज्या दुसरी नाव वर होतात इशारा करा कि इसन आम्हनी मदत करा: आणि तेस्नी इसन दोनी नाव आठलगून भारी लीनात कि त्या बुळाले लागण्यात | 8 हय देखीसन शिमोन पेत्र येशू ना पाय वर पळणा आणि सांग; प्रभू मना पासून चालना जा कारण कि मी पापी माणूस शे | 9 कारण कि इतल्या मासा धराइ जावावर तेले आणि तेना साथिसले गैरा आश्चर्य हुईन | 10 आणि आणि तसाच जब्दी ना पुत्र याकोब आणि योहान ले बी ज्या शिमोन ना भागीदार होतात आश्चर्य हुईनात : तव येशू नि शिमोन ले सांग भ्यावू नको: आते पासून तू मानसस ले जीन्दां धरशिन | 11 आणि त्या नावसले तठवर लइ उनात आणि सगळ काही सोळीसन तेना मांगे चालू लागनात || 12 जव तो एक नगर मा होता त दिखा तठे कुष्ट रोग कन भरेल एक माणूस होता आणि तो येशू ले देखीसन पालथा पळना आणि विनंती करी; कि प्रभू कदी तुनी इच्छा हुईन त मले शुध्द करी सकस | 13 तेनी हात पुळे करीसन तेले हात लाव आणि सांग मनी इच्छा शे कि तू शुध्द हुईजा: आणि तेना कुष्ट लगेच चालना ग्या | 14 तव तेनी तेले जताळ कि कोले बीई नको सांगजो पण जाईसन स्वता ले याजक ले दाव आणि आपला शुद्ध होवाना बारामा जे काही मोशे नि चळावा ठरायेल शे तेले चळाव; कि तेसणा वर साक्षी होवो | 15 पण तेन्या गोष्टी आखो पसरत ग्यात आणि गर्दीन गर्दी तेनि आयका साठे एकत्र हुईनी | 16 पण तो जंगल मा आलग जाईसन प्राथना करत होता|| 17 आणि एक दिन अस हुईन कि तो प्रवचन सांगीराय्नता आणि परुशी आणि शास्राध्यापक तठे बठेल होतात ज्या गालील आणि याहुदिया ना सगळा गाव तून आणि यरुशलेम मधून एयेल होतात; आणि बरा करा साठे प्रभू नि सामर्थ तेना सांगे होती | 18 आणि देखा काही लोक एक माणूस ले जो पक्षघाती होता खाट वर लयणात आणि त्या तेले मधमा लीजावाना आणि येशू समोर थेवाना उपाय देखीराय्नतात | 19 आणि जव गर्दी मुळे तेले मधमा नई सकनात त तेस्नी घर वर चळीसन आणि बाजसुद्धा कवूल दूरकरीसन तेले खाटसंगे मधमा येशू ना समोर उतारी टाक | 20 तेनी तेस्ना विस्वास देखीसन तेले सांग; ओ माणूस तुना पाप माप हुईनात | 21 तव शास्त्री आणि परुशी वाटावाघ करू लागनात कि हवू कोण शे जो देव नि चेष्टा[निंदा] करस ? देव ले सोळीसन कोण पापसनी क्षमा करी सकस ? 22 येशू नि तेसणा मन ना गोष्टी समजीसन तेसले सांगणा कि तुमी आपला मन मा काय चेष्टा करी ऱ्हायनात ? 23 सरळ काय शे ? काय हय सांगण कि तुना पाप माप हुईनात नै त हय सांगण कि उठ आणि चाल फिर ? 24 पण एनासाठे कि तुमी समजा कि माणूस ना पुत्र ले पृथ्वी वर पाप क्षमा कराना बी अधिकार शे ( तेनी त्या पक्षघाती ले सांग ) मी तुले सांगस उठ आणि आपली खाट उचलीसन आपला घर चालना जा | 25 तो लगेच तेस्ना समोर उठाना आणि जेना वर तो पळेल होता तेले उचलीसन देव नि स्तुती करत आपला घर चालना ग्या | 26 तव सगळा चकित हुईनात आणि देव नि महिमा कराले लागनात आणि गैरा भ्याय भ्यायसन सांगाले लागनात कि आम्हनी आल्गच गोष्ट देखेल शे || 27 आणि एना नंतर तो बाहेरग्या आणि लेवी नाव ना जकात लेणार ले जकात नाकावर बठेल देखणा आणि तेले सांगणा मना मांगे चालू लाग | 28 तव तो सगळ काही सोळीसन उठना आणि तेना मांगे चालू लागणा | 29 आणि लेवी नि आपला घर मा तेना साठे मोठी मेजवानी करी; आणि जकातदारस्नि आणि दुसरास्नि ज्या तेना संगे जेवण कराले बठेल होतात एक मोठी गर्दी होती | 30 आणि परुशी आणि तेस्ना शास्त्री तेना शिष्यसले हय सांगीसन कुरकुर कराले लागनात कि तुमी जकात लेणार संगे आणि पापीस संगे काब खातस पीतस ? 31 येशू नि तेसले उत्तर दिधा; कि वैद्य चांगलास साठे नई पण आजारीस साठे शे | 32 मी धर्मीसले नई पण पापीस ले पश्ताप करा साठे बलावाले एयेल शे | 33 आणि तेस्नी तेले सांग योहान ना शिष्य त घळी घळी उपास ठेवतस आणि प्राथना कऱ्या करतस आणि तसाच परुशीस ना बी आणि तुना शिष्य त खातस पीतस ! 34 येशू नि तेसले सांग काय तुमी वरातीस पासून जठ लगून नवरदेव तेसणां संगे ऱ्हास उपास कराले लावशात ? 35 पण त्या दिन येतीनजेस्ना मा नवर देव तेसणा पासून आल्लग करामा इन तव त्या दीनस मा उपास करतीन | 36 तेनी एक आखो दाखला बी तेसले सांग; कि कोणी माणूस नवा कपळा मधून फाळीसन जुना कपळा मा थिग्गय नई लावत नई त नवा फाटी जाईन आणि तो थिग्गय जुना मा वळाव बी नई | 37 आणि कोणी नवा द्राक्ष रस जुना माठ मा नई ठेवस नई त नवा द्राक्षरस माठसले फोळीसन व्हाईजाईन आणि माठ बी नष्ट हुई जातीन | 38 पण नवा द्राक्षरस नवा माठस्मा भराले पाहिजे | 39 कोणी माणूस जुना द्राक्षरस पिसन नवा नई देखत कारण कि तो सांगस कि जुनाच चांगला शे ||