7
1 जव तो सगळ्या गोष्टी आयकाळी दिना त कफर्णहुम मा उना | 2 आणि कोणी अधिकारी ना एक चाकर जो तेना प्रिय होता आजार कण मरणा होता | 3 तेनी येशू नि चर्चा आयकीसन यहुदिया ना कितलाक वरिष्ठस्ले तेले हय विनंती कराले तेना कळे धाळना कि इसन मना चाकर ले बरा कर | 4 त्या येशू जोळे इसन तेले विनंती करीसन सांगाले लागनात कि तो ईतला योग्य शे कि तेना साठे हय करो | 5 कारण कि तो आम्हना जातीसले प्रेम करस आणि तेनीच आम्हना प्राथनाघर ले बनायेल शे | 6 येशू तेसणा संगे संगे चालना पण जव तो घर पासून दूर नई होता त सुबेदार नि तेना कळे कितलाक मित्रस व्दारे सांगीसन धाळ कि प्रभू दुख नको उचलू कारण कि मी ह्या योग्य नई कि तू मन घर मा येवो | 7 एनासाठे मी स्वता ले ह्या योग्य बी नई समजणा कि तुना जोळे येवू पण वचनच सांगी दे त मना चाकर बरा हुई जाईन | 8 मी बी पराधीन माणूस शे; आणि शिपाई मना हात मा शे आणि जव एक ले सांगस जा त तो जास; आणि दुसरा ले सांगस कि ये त एस; आणि आपला कोणी चाकर ले कि हय कर त तो तेले करस | 9 हय आयकीसन येशु चकित हुईना आणि तेनी तोंड फिरायसन त्या गर्दी ले जी तेना मांगे ईराय्णती सांग मी तुमले सांगस कि मनी ईस्राइल मा बी असा विश्वास नई देख | 10 आणि धाळेल लोकस्नि घर ईसन त्या चाकर ले चागला देखनात || 11 थोळा दीनस मा तो नाईन नाव ना एक नगर मा ग्या आणि तेना शिष्य आणि मोठी गर्दी तेना सांगे जाई राय्न्ती | 12 जव तो नगर ना दरवाजा जवळ पोहोच ना त देखा लोक एक मुर्दा ले बाहेर ली जाई राय्नतात; जो आपली माय ना आखटा पोऱ्या होता आणि ती विधवा होती: आणि नगर ना गैरा लोक तेना संगे होतात | 13 तिले देखीसन प्रभू ले दया उणी आणि तिले सांगणा; रळू नको | 14 तव तो जोळे ईसन अर्ति ले हात लाव; आणि उचलणार थांबी ग्यात तव तेनी सांग; ओ जवान मी तुले सांगस उठ | 15 तव तो मरेल उठी बठना आणि बोलाले लागणा: आणि तेनी तेले तेनी माय ले सोपी दिना | 16 एनावरून सगळासमा भीती ईगी; आणि त्या देव नि महिमा करत सांगाले लागनात कि आम्हना मधमा एक मोठा भविष्यवक्ता उठेल शे आणि देव नि आपला लोकस वर कृपा करेल शे | 17 आणि तेना बारामा ह्या सगळ्या गोष्टी यहुदिया आणि अंगे पांगे ना सगळा देशस्मा पसरी गी || 18 आणि योहान ले तेना शिष्यस्नि ह्या सगळ्या गोष्टीस्ना संदेश दिनात | 19 तव योहान नि आपला शिष्यस मधून दोन ले बलाई सन प्रभू जोळे हय विचाराले धाळना; कि काय येणार तूच शे कि आम्ही कोणी दुसरा ना रस्ता देखुत ? 20 तेस्नी तेना कळे ईसन सांग योहान बाप्तिस्मा देणार नि आम्हले तुना जोळे हय विचाराले धाळेल शे काय येणार तूच शे कि आम्ही दुसरा ना रस्ता देखुत ? 21 त्याच घळी तेनी गैरास्ले आजारसआणि पीळास आणि दृष्टआत्मास पासून सोळाव; आणि गैरा अंधास्ले दृष्टी दिधी | 22 आणि तेनी तेसले सांग; जे काही तुम्नी देख आणि आयकेल शेत जायसन योहान ले सांगी द्या; कि अंधा देखतस लंगळा चालतस फिरतस कोळी शुध्द कराय राय्नात बहिरा आयकी राय्नात मरेल जिंदा करामा ईराय्नात; आणि गरीबसले सुवार्ता आयकाळा मा येस | 23 आणि धन्य शेतस त्या ज्या मना मुळे ठेस नई खावोत || 24 जव योहान ना धाळेल लोक चाली दिनात त येशू योहान ना बारमा लोकस्ले सांगाले लागणा; तुमी जंगल मा काय देखाले जायेल होतात? काय वारा कन हालता काळी ले ? 25 त मंग काय देखाले जायेल होतात? काय नरम कपळा घालेल माणूस ले ? देखा ज्या कलर वाला कपळा घालतस आणि सुख विलास मा रहातस त्या राज घर मा राहातस | 26 मंग काय देखाले जायेल होतात ? काय कोणी भविष्यवक्ता ले ? हा मी तुमले सांगस पण भविष्यवक्ता तून बी मोठा ले | 27 हवू तोच शे जेना बारामा लिखेल शे कि देख कि मी तुना दूत ले पुळे पुळे धाळस जो तुना पुळे रस्ता सरळ करीन | 28 मी तुमले सांगस ज्या स्रीयास पासून जल्मेल शेतस तेसणा मधून योहान तून मोठा कोणीच नई : पण जो देव ना राज्य मा धाकलास्तून धाकला शे तो तेना तून बी मोठा शे | 29 आणि सगळा साधारण मानस आयकी सन कर लेणारस्नि बी योहान ना बाप्तिस्मा लीसन देव ले खरोखर मानी लीनात | 30 पण परुशी आणि शास्त्री नि तेना पासून बाप्तिस्मा नई लिसन देव नि ईच्छा ले आपला बारामा टाइ दिनात | 31 त मी ह्या लोकस्नी उपमा कसा काय देवू कि त्या कोणा सारखा शेतस ? 32 त्या त्या बाळास सारखा शेतस जो बाजार मा बसे एक दुसराले आराया मारी मारी सन सांगत होतात आम्ही तुमना साठे बासुरी वाजळी आणि तुमी नई नाचनात आम्ही विलाप करनुत आणि तुमी नई रळनात ! 33 कारण कि योहान बाप्तिस्मा देणार नि नई त भाकर खात उना आणि नई त द्राक्षरस पेत उना आणि तुमी सांगतस तेना मा दृष्टआत्मा शे | 34 माणूस ना पुत्र खात पेत एयेल शे; आणि तुमी सांगतस देखा पेटू आणि बेवळा माणूस कर लेणारस्ना आणि पापिस्ना मित्र | 35 पण न्यान आपला सर्वा पोरसस्वर खरा ठरायेल शे || 36 नंतर कोणी परुशी नि तेले विनंती करी कि मना संगे जेवण कर; त तो त्या परुशी ना घर मा जाय सन जेवण कराले बठना | 37 आणि देखा त्या नगर नि एक पापिणी स्री हय आयकिसन कि तो परुशी ना घर मा जेवण कराले बठेल शे संगमरमर ना पात्र मा ईत्र लईनि | 38 आणि तेना पाय जोळे मांगे उभी ह्रायसन रळत तेना पायसले आसास कण भिगाळाले आणि आल्पा डोका ना बालस कण पोसाले लागणी आणि तेना पाय घळी घळी मुक्का लिसन तेसणा वर ईत्र टाक | 39 हय देखीसन तो परुशी जेनि तेले बलायेल होता आपला मन मा विचार कराले लागणा कदी हवू भविष्यवक्ता होता त वयखी लेता कि ती जो तेले हात लाई ह्रायनी ती कोण आणि कशी स्री शे ? कारण कि ती त पापिणी शे | 40 हाय आयकिसन येशू नि तेले उत्तर मा सांग; कि ओ शिमोन मले तुले काय बोलन शे सांग गुरुजी सांग | 41 कोणी एक मालदार ना दोन लेनदार होतात एक पाच शे आणि दुसरा पन्नास दिनार उधार होतात| 42 आणि तेसणा जोळे दवाले काहीच नई रहायन त तेनी दोनीस्ले माप करी टाक: त तेसणा मधून कोण तेले जास्त प्रेम ठेवीन | 43 शिमो नि उत्तर दिध मना समज कण तो जेना तेनी जास्त सोळी दिना : तेनी तेले सांग तुनी चांगला विचार करेल शे | 44 आणि त्या स्रीले आणि फिरीसन तेनी शिमोन ले सांग; काय तू ह्या स्री ले देखिराय्ना ? मी तुना घर मा उना पण तुनी मले पाय धुवा साठे पाणी नई दिना पण इनी मना पाय आसास कण भिगाळा आणि आपला केसस कण पोस ! 45 तुनी मले मुक्का नई दिना पण जव पासून मी एयेल शे तव पासून इनी मना पायसले मुक्का देवाले नई सोळणी | 46 तुनी मना डोका वर तेल नई लाव; पण येनि मना पाय वर ईत्र लायेल शे | 47 एनासाठे मी तुले सांगस ; कि इना पाप ज्या जास्त होतात माप हुईनात कारण इनी गैरा प्रेम कर; पण जेना थोळा माप हुयेल शे तो थोळा प्रेम करस | 48 आणि तेनी स्री ले सांग तुना पाप माप हुईनात | 49 तव ज्या लोक तेना संगे जेवण कराले बठेल होतात त्या आपला आपला मन मा विचार कराले लागनात हवू कोण शे जो पापस्ले बी माप करस ? 50 पण तेनी स्री ले सांग; तुना विश्वास नि तुले वाचाळी लीयेल शे ख़ुशी मा चालनी जा ||