8
1 एना नंतर तो नगर नगर आणि गाव गाव प्रवचन सांगत आणि देव राज्य ना सुवार्ता आयकाळत फिराले लागणा | 2 आणि त्या बारा तेना संगे होतात: आणि कितल्याक स्रिया बी ज्या दृष्टआत्मा कण आणि आजारस कण सोळायेल होत्या आणि त्या ह्या शेतस मरिया जी मगदलिनी सांगावत होती जेना मधून सात दृष्टआत्मा निघेल होत्या | 3 हेरोद ना भंडारी खोजा नि बायको योअन्ना आणि सुसन्ना आणि गैरया आखो स्रिया : ह्या त आपली संपत्ती कण तेनी सेवा करत होती || 4 जव मोठी गर्दी एकत्र हुईनी आणि नगर नगर ना लोक तेना कळे येत होतातत तेनी दाखला मा सांग | 5 कि एक पेरणार बी पेराले निघणा; पेरतांना काही बी रस्ता ना तठ वर पळणा आणि चेनदाई ग्या आणि आकाश ना पक्षी तेले खाई ग्यात | 6 आणि काही खळकस वर पळणा आणि उगाणा पण माटी नई भेटा मुळे सुकी ग्या | 7 काही झाळीस्ना मधमा पळणा आणि झाळी संगे संगे वाळीसन तेले दाबी लिध | 8 आणि काही चांगली जमीन वर पळणा शंबर पट फय लयना; हय सांगीसन तेनी जोर मा सांग ; जेना आयकाना कान होत तो आयाकी लेवो || 9 तेनी शिष्यस्ले विचार कि हवू दाखला काय शे? तेनी सांग; 10 तुमले देव ना राज्य ना भेदस्नि समज दियेल शे पण दुसरास्ले दाखलास्मा आयकाळा मा येस एनासाठे कि त्या देखीसन बी नई देखोत आणि आयकतांना बी नई समजोत| 11 दाखला हवू शे; बी त देव ना वचन शे | 12 रस्ता ना काठ वरला त्या शेतस जेस्नी आयक; त शैतान इसन तेस्ना मन मधून वचन उचली लीजास कदी असा नई होवो कि त्या विश्वास करीसन तारण लीलेवोत | 13 खळकस वरला त्या शेतस कि जव आयकतस त ख़ुशी मा वचन ले लिलेतस पण जळ नई धरा मुळे त्या थोळा टाईम लगून विश्वास ठेवतस आणि परीक्षा ना टाईम वर टइ जातस | 14 ज्या झाळीस्मा मा पळणा त त्या शेतस पण होता होता चिंता आणि धन आणि जीवन ना सुख विलास मा फशी जातस आणि तेस्ना फय नई पिकत | 15 पण चांगली जमीन वारला त्या शेतस ज्या वचन आयकीसन चांगल्या आणि उत्तम मन मा समाईसन ठेवतस आणि धीर धरीसन फय लयतस || 16 कोणी दिवा ले भांडा खाले नई लपाळत आणि नई त खाट खाले लपाळस पण दिवटी वर ठेवस कि मधमा येनारसले उजाया भेटो | 17 काहीच लपेल नई जे प्रगट नई हुवाव; आणि नई त काय गुप्त शे जे वयखायनार नई आणि प्रगट नई होवो| 18 एनासाठे सावधान राहा कि तुमी कोणत्या प्रकारे आयकतस? कारण कि जेना कळे शे तेले देवामा इन; आणि जेना कळे नई शे तेना पासून ते बी लेवाय जाईन जेले तो आपला समजस || 19 तेनी माय आणि तेना भावू तेना जोळे उनात पण गर्दी मुळे तेले भेटू नई सकनात | 20 आणि तेले सांगा मा उन कि तुनी माय आणि तुना भावू बाहेर उभा रायसन तुले भेटाना देखीराय्नात | 21 तेनी तेना उत्तर मा तेसले सांग; कि मना माय आणि मना भावू ह्याच शेतस ज्या देव ना वचन आयकतस आणि मानतस || 22 नंतर तो आणि तेना शिष्य नाव वर चळनात आणि तेनी तेस्ले सांग; कि या समुद्र ना त्या पार जावूत: त तेस्नी नाव सोळी टाकी | 23 पण जव नाव चालीराय्नी त तो जपी ग्या: आणि समुद्र वर आंधी उणीआणि नाव पाणी भराले लागणी अनि त्या धोका मा होतात| 24 त तेस्नी जोळे ईसन तेले जागाळ नात आणि सांग; गुरुजी! गुरुजी! आम्ही नाश हुई चालनुत: तव तेनी उठीसन आंद्गी ले आणि पाणी ना लाठास्ले धमकाव आणि त्या थांबी ग्यात आणि शांती हुई गी | 25 आणि तेनी तेसले सांग; तुमना विश्वास कोठे होता? पण त्या भ्याई गयात आणि चकित हुईसन आपसा मा सांगाले लागनात हवू कोण शे ? जो अंडी आणि पाणी ले बी आज्ञा देस आणि त्या तेनी आयकतस || 26 नंतर त्या गीरासेनी ना देश मा भिळनात जो त्या पार गालील ना सोमोर शे | 27 जव तो तठ वर उतर ना त त्या नगर ना एक माणूस तेले भेटणा जेना मा दृष्टआत्मा होती आणि गैरा दीनस पासून नई त कापळा घालत होता आणि नई त घर मा रात होता पण मसान खाई मा राहात होता | 28 तो येशू ले देखीसन वोरळ ना आणि तेना समोर पळीसन जोर मा सांग; ओ परतपर देव ना पुत्र येशू मले तुना शी काय काम ! मी तुले विंनती करस मले दुः नको देवू | 29 कारण कि तो त्या दृष्टआत्मा ले त्या माणूस मधून निघानी आज्ञा दिराय्नाता एनासाठे कि ती तेना वर घळी घळी हाबी हुत होती; कडी लोक तेले सकयस आणि बेळीस कण जरी बानधत तरी बी तो त्या बंधनस्ले तोळी टाकत होता आणि दृष्टआत्मा तेले जंगलस्मा पयाळत फिरत होती | 30 येशू तेले विचार तुना काय नाव शे? तेनी सांग शैन्य; कारण कि गैरया दृष्टआत्मा तेना मा घुसेल होती | 31 आणि तेस्नी तेले विनंती करी कि आम्ले खाड्डा मा जावानि आज्ञा नको देवू | 32 तठे एक डोंगर वर एक डूक्करस्णा गवारा चरीराय्ता त तेस्नी तेले विंनती करी कि कि आम्हले तेसणा मा बसू दे त तेनी तेसले जावू दिधा | 33 तव दृष्टआत्मा तेना मधून निघीसन डूक्करस्मा ग्यात आणि तो गवारा कराळ वरून झळपीसन समुद्र मा जाई पळणा आणि डुबी मरणा| 34 मेंडपाळ हय जे हुयेल होत देखीसन पयनात आणि नगर मा आणि गावस मा जाईसन तेनी सुवार्ता सांगी | 35 आणि लोक हय जे हुयेल होत तेले देखा ले निघनात आणि येशू जोळे ईसन ज्या माणूस मधून दृष्टआत्मा निघेल होती तेले येशू ना पाय जोळे कपळा घालेल आणि शांत बठेल देखीसन भ्याई ग्यात | 36 आणि देखणारस्नि तेस्ले सांग कि तो दृष्टआत्मा कण त्रासेल माणूस कसा बरा हुईना | 37 तव गीरासेनि ना आंगे पांगे ना सागाळा येशू ले विनंती करी कि आम्ह्ना आठून चालना जा; कारण कि तेसणा मा भीती घुशी जायेल होती: त तो नाव चळीसन परती गया| 38 ज्या माणूस मधून दृष्टआत्मा निघेल होती तो तेले विनंती कराले लागणा कि मले आपला सांगे राहू दे पण येशू नि तेले धाळीसन तेले सांग | 39 आपला घर परती जा आणि लोकस्ले सांगी दे कि देव नि तुना साठे कसा मोठा मोठा करेल शे : तो जाईसन पुरा नगर मा प्रचार कराले लागणा कि येशू नि मना साठे कसा मोठा मोठा करात || 40 जव येशू परती राय्न्ता त लोक तेले ख़ुशी मा भेटणात; कारण कि त्या सगळा येशू ना रस्ता देखी राय्न्तात | 41 आणि देखा याईर नाव ना एक माणूस जो प्राथनाघर ना सुबेदार होता उनाआणि येशू ना पाय वर तेले विनंती कराले लागणा कि मना घर चाल | 42 कारण कि तेनी बारा साल नि एकच पोर होती आणि ती मरावर होती: जव तो जाईराय्नाता तव लोक तेना वर पळी जाईराय्नतात || 43 आणि एक स्री नि जिले बारा साल पासून रक्तश्राव होता आणि जी आपली सगळी संपत्ती वैद्यस मांगे खर्च करी टाकेल होती आणि तरी बी कोणा हात घाई बरी नई हुई सकेल होती | 44 मांगून ईसन तेना कपळा ले हात लाव आणि लगेच तिना रक्तस्राव थांबी ग्या | 45 एनावर येशू सांग मले कोणी हात लाव? जव सगळा नकाराले लागनात त पेत्र आणि तेना साथीस्नी तेले सांग; गुरुजी तुले त गर्दी दाबी राय्नी शे आणि तुना वर पळी चालनी शे | 46 पण येशू नि सांग; कोणी मले हात लायेल शे कारण कि मनी वयखी लीयेल शे कि मना मधून सामर्थ निघेल शे | 47 जव स्री नि देख कि लपू नई सकत तव कापत उणी आणि तेना पाय वर पळीसन सर्वा लोकस समोर सांग कि मनी कसा मुळे तुले हात लाव आणि कशी लगेच बरी हुईनी | 48 तेनी तिले सांग बेटा तुना विश्वास नि तुले बारा करेल शे ख़ुशी मा जा || 49 तो हय सांगीच राय्नता कि कोणी प्राथनाघर ना सुबेदार कळून ईसन सांग तुनी पोर मारी गी: गुरुजी ले दुख नको देवू | 50 येशू नि आयकीसन उत्तर दिधा भ्यावू नाव; फक्त विश्वास ठेव; त ती वाची जाईन | 51 घर मा ईसन तेनी पेत्र आणि योहान आणि याकोब आणि पोर ना माय-बाप ले सोळीसन आखो कोले बी आपला संगे मधमा येवू नई दिना | 52 आणि सगळा टीना साठे रळी राय्नतात पण तेनी सांग; रळा नका; ती मरेल नई पण जपी रायनी | 53 त्या हय सामजी सन कि मारी जायेल शे तेनी मजाक कराले लागणात | 54 पण तेनी तेना हात धरा आणि सांग ओ पोर उठ | 55 तव तेना जीव परत उना आणि ती लगेच उठनी; नंतर तेनी आज्ञा दिधी कि तिले काही खावाले द्या| 56 तिना माय-बाप चकित हुईनात पण तेनी तेसले जताळ कि हय जे हुयेल शे कोलेच नका सांगज्यात ||