11
1 नंतर तो कोणत्या जागा वर प्राथना करी राय्नाता: आणि जव तो करी लीयेल होता त तेना शिष्यस मधून एक नि तेले सांग; प्रभू जस योहान नि आपला शिष्यस्ले प्राथना कराले शिकाळ तसाच आम्हले तूबी शिकाळी दे | 2 तेनी तेसले सांग; जव तुमी प्राथना करश्यात त सांगा; बाप तुना नाव पवित्र मानामा येवोतुना राज्य येवो| 3 आम्हनी दिन भर नि भाकर दररोज आम्हले देत जा| 4 आणि आम्हना पापस्ले माप कर कारण कि आम्ही बी आपला सगळा अपराधीस्ले माप करतस आणि आम्हले परीक्षा मा नको लयजो || 5 आणि तेनी तेसले सांग तुमना मधून कोण शे कि तेना मित्र हो आणि तो आधी रात ले तेना कळे जाईसन तेले सांगो कि मित्र; मले तीन भाकऱ्या दे | 6 कारण कि एक प्रवासी मित्र मना जोळे एयेल शे आणि तेना पुळे ठेवाले मना जोळे काहीच नई शे | 7 आणि तो मधून उत्तर देवो कि मले दुख नको देवू; आते त दार बंद शे आणि माना पोर मना सांगे बिछाना वर शेतस एनासाठे मी उठीसन तुले देवू नई सकत ? 8 मी तुमले सांगस कदि तेना मित्र हुईसन बी तेले उठीसन नई देत तरी बी तेले लाज सोळीसन मान्गा मुळे तेले जितली गरज शे तितलीच दिन | 9 पण मी तुमले सांगस; कि मांगा त तुमले देवामा इन; झामला त तुमले भेटीन; वाजाळा त तुमना साठे उघाळा मा इन| 10 कारण कि जो कोणी मांगास तेले भेटस; आणि ओ झामलस तेले भेटस; आणि जो वाजाळस तेना साठे उघाळाइन | 11 तुमना मधून असा कोण बाप शे कि जव तेना पुत्र भाकस मांगस त तेले दघळ देस: कि मासा मांगस त मासा सोळीसन तेले साप देस? 12 कि अंडा मागस त तेले विन्चू देस? 13 त तुमी वाईट हुईसन बी आपला पोर-पारीसले चांगल्या वस्तू देवाले माहिती शे त स्वर्ग मधला बाप आपला मांगणार ले पवित्र आत्मा काब नई देवाव|| 14 नंतर तेनी एक मुक्की दृष्टआत्मा ले काळ: जव दृष्टआत्मा निघी गई त मुक्का बोलाले लागणा; आणि लोकस्नी आचार्य कर| 15 पण तेन्सां मधून कितलाक नि सांग हवू त सैतान नाव ना दृष्टआत्मा ना मुख्य नि मदत कण दृष्टआत्मा ले काळस | 16 दुसरास्नि तेनी परीक्षा तेनि लेवा साठे तेना कडून स्वर्गना एक चीन्न मांगा | 17 पण तेनी तेसना मन ना गोष्टीस्ले समजीसन तेस्ले सांग; ज्या -ज्या राज्यमा फुट होस तो राज्य उजळी जास: आणि ज्या घर मा फुट होस ते नाश हुई जास | 18 आणि कडी शैतान आपलाच विरोधी हुई जास त तेना राज्य बनेल ह्राईन ? कारण कि मना बारामा त सांगतस कि हवू त सैतान ना मदत कण दृष्टआत्मा काळस | 19 चांगल हय शे सैतान ना मदत कण दृष्टआत्मा ले काळस त तुमना पोर कोणी मदत कण काळतस ? एनासाठे त्याच तुमना न्याय करतीन | 20 पण कदि मी देव ना सामर्थ कण दृष्टआत्मा ले काळस त देव ना राज्य तुमना जोळे इपाळणा शे | 21 जव ताखातवान माणूस हत्यार लिसन आपला घर नि राखोई कारस त तेनी संपत्ती वाचेल ऱ्हास | 22 पण तेना तून जास्त कोणी आखो ताखातवाला धावा करीसन तेले जिकी लेस त तेना त्या हत्यार जेस्ना वर तेना विश्वास होता हिस्काई लेस आणि तेनी संपत्ती लुटीसन वाटी देस| 23 जो मना सांगे नई तो मना विरुद्ध मा शे आणि जो मना संगे नई आवरत तो नई पसारत | 24 जव दृष्टआत्मा माणूस ना शरीर मधून निघी जास त कोल्ली जागा मा आराम झामलत फिरस ; आणि जव नई भेटत त सांगस; कि मी आपला त्याच घर मा जठून निघेल होती परती जासू | 25 आणि ईसन तेले झाळेल- पोतारेल आणि सजाळेल देखस| 26 तव ती जायसन आपला तून आखो वाईट सात आत्मास्ले आपला संगे लईएस आणि त्या तेना मा घुशिसन वस्ती करतस आणि त्या माणूस नि पहिली दशा तून बी वाईट हुई जास || 27 जव तो ह्या गोष्टी सांगीच राय्नता त गर्दी मधून कोणी स्री नि जोर मा सांग धन्य तो गर्भ जेना मा तू रायन; आणि त्या स्तन ज्या तुनी चुसात| 28 तेनी सांग हा; पण धन्य त्या शेत ज्या देव ना वचन आयकतस आणि मानतस || 29 जव मोठी गर्दी एकत्र होत होती त तो सांगाले लागणा; कि ह्या युग ना लोक वाईट शेत; त्या चीन्न मांगतस; पण इनुस ना चीन्न ले सोळीसन आखो कोणताच चीन्न तेसले नई देवामा येणार | 30 जस इनुस निनवे ना लोकसना साठे चीन्न ठरणा तसाच माणूस ना पुत्र बी ह्या युग ना लोकस साठे ठरीन | 31 दाख्खीन नि राणी न्याय ना दिन ह्या टाईम ना माणसस ना संगे उठीसन तेसले अपराधी ठरइन कारण कि ती शलमोन ना न्यान आयकाले पृथ्वी ना त्या बाजू तून उणी आणि देखा आठे तो शे जो शलमोन तून बी मोठा शे| 32 निनवे ना लोक न्याय ना दिन ह्या टाईम ना लोकस संगे उभा ह्रायसन तेसले आरोपी ठरावतीन; कारण कि तेस्नी इनुस ना प्रवचन आयकीसन पश्चताप कर आणि देखा आठे तो शे जो इनुस तून बी मोठा शे || 33 कोणी माणूस दिवा बार ना तयघर मा नई त खात खाले नई ठेवत पण दिवट वर ठेवस कि मधमा येणारसले उजाया भेटो | 34 तुना शरीर ना दिवा तुना डोया शेतस एनासाठे तुना डोया निर्मल शेतस; त तुना पुरा शरीर बी उजाया शे; पण जव ती वाईट शे त तुना शरीर बी अंधार शे| 35 एनासाठे सावधान ह्रायज्यात कि जो उजाया तुमना मा शे तो अंधार नई जावो | 36 एनासाठे तुना पुरा शरीर उजाया हुईन आणि तेना कोनता भाग अंधार नई ह्रावो त सर्व अस उजाय हुईन जस त्या टाईम ले होस जस दिवा आपली चमक पासून तुले उजाया देस|| 37 जव तो गोष्टी करीराय्नाता त कोणी परुशी नि तेले विनंती करी कि मना कळे जेवण कराले बस | 38 परुशी नि हय देखीसन आचार्य कर कि तेनी जेवण कराना पहिले आंघोळ नई कर| 39 प्रभू नि तेले सांग परुशी तुमी प्याला आणि थाट ले वरे वरे त घासतस पण तुमना मधमा अंधार आणि दृष्टता भरेल शे| 40 ओ बुद्धीहीन जेनी बाहेर ना भाग बनाव काय तेनी बाहेना भाग नई बनाव ? 41 पण हा मधली वस्तूस्ले दान करी द्यात देखासर्व काही तुमना साठे शुध्द होई जाईन '' 42 पण ओ परुशीतुमनावर हाय ! तुमी पुदिना आणि सुदाब ना आणि सर्वा प्रकार ना भाजी-पाला ना दहावा भाग देतस पण न्याय ले आणि देव ना प्रेम ले टाइ देतस: पाहिजेल त होता कि येस्ले बी करत राहतात आणि तेसले बी नई सोळतात | 43 ओ परुशी तुमना वर हाय! तुम्ही प्राथनाघर मा मुख्य मुख्य जागा आणि बाजार मा नमस्कार देखतस | 44 हाय तुमना वर ! कारण कि तुमी त्या लपेल करस सारखा शेतस जेस्ना वर लोक चालतस पण नई मालूम | 45 तव एक शास्त्री नि तेले उत्तर दिधा कि गुरुजी ह्या गोष्टी सांगीसन तू आम्ह्नी निंदा करस | 46 तेनी सांग; ओ शास्त्री तुमना वर बी हाय! तुम्ही असा वजन जेसले उचल न कठीण शे मानसस वर टाकतस पण तुमी स्वता त्या वजन ले आपली एक बोट बी नई लावतस | 47 हाय तुमना वर! तुमी त्या भाविष्यवक्ता ना कबर बनावतस जेसले तुमनाच बाप-दादास्नी मारी टाकेल होता| 48 त तुम्ही साक्षी शेतस आणि आपला बाप-दादास्ना कामस्मा भागी शेतस; कारण कि तेस्नी त तेसले मारी टाक आणि तुमी तेस्नी कबर बनावतस | 49 एनासाठे देव नि बुद्धी नि बी सांगेल शे कि मी तेसणा कळे भविष्यवक्तास्ले आणि प्रेषितस्ले धाळसू : आणि त्या तेसणा मधून कितलाकस्ले मारी ताकतीन आणि कितलाकस्ले त्रासदेतीन | 50 एनासाठे कि जीतला भविष्यवक्तास्ना खून जग नि निर्मिती पासून व्हावाळा येल शे सर्वास्ना लेख ह्या युग ना लोकस पासून लेवामा येवो | 51 हाबेल नि हत्या पासून त जखरया नि हत्या लगून जो वेडी आणि मंदिर ना मधमा घात करामा उना: मी तुमले खरज सांगस; तेसणा लेख ह्याच टाईम ना लोकस पासून लेवामा इन | 52 हाय शास्त्रीस्वर ! कि तुम्नी न्यान नि चाबी त लीलीधी पण स्वता नई प्रवेश नई करणात आणि प्रवेश करणास्ले बी रोकी लिध|| 53 जव तो तठून निघणा त शास्त्री आणि परुशी गैरा मांगे लागी ग्यात आणि द्वेष कराले लागनात कि तो गैरया गोष्टीस्नि चर्चा करो | 54 आणि तेनी घात मा लागी राय्नात कि तेना तोंड नि कोणती गोष्ट धरुत ||