12
1 ईतला मा जव हजारोस्नी गर्दी लागी गई आठ लागून कि एक दुसरा वर पळी जाई राय्नतातत तो सगलास्तून पहिले आपला शिष्यस्ले संगाले लागणा कि परुशी ना कपट खमीर पासून सावधान रायज्यात | 2 काहीच झाकायेल नई जे उघळाय नार नई; आणि नई त काही लपेल शे जे समजायनार नई | 3 एनासाठे जे काही तुमनी आंधार मा सांगेल शे ते उजाया मा आयकामा इन: आणि जे तुमनी कोठरी मा सांगेल शे ते कोठास स्वर सांगामा इन | 4 पण मी तुमले ज्या मना मित्र शेतस सांगस कि ज्या शरीर ले नाश करतस पण तेना मांगे आखो काय बी नी करी सकतस तेसले नका भ्या | 5 मी तुमले जताळस कि तुमले कोणाशी भ्यावाले पाहिजे मारा नंतर जेले नरक मा टाकाणा अधिकार शे तेले तेलेच भ्या: आणि मी तुमले सांगस तेसले नका भ्या| 6 काय दोन पैसा ना पाच चीळ्या नई विकावतस ? तरी बी देव तेस्ना मधून एक ले बी नई विसरत | 7 पण तुमना पुरा डोका ना बाल मोजायेल शे त भ्यावू नका तुम्ही गैरया पक्षीस पासून मोलवान शेतस | 8 मी तुमले सांगस जो कोणी मानसस समोर मले स्वीकार लीन तेले माणूस ना पुत्र बी देव ना दूत सारखा मानी लीन | 9 पण जो मानसस समोर मले नकारीन तेना देव ना दूत ना समोर नकार हुईन | 10 जो कोणी माणूस ना पुत्र ना विरुध्द मा कोणी गोष्ट सांगस तेना तो अपराध माप करामा इन पण जो कोणी पवित्र आत्मा नि निंदा करीन तेन अपराध माप नई करावनार | 11 जव लोक तुमले सभास्मा आणि सुभेदारस समोर आणि अधिकारीस्ना समोर लीजाय जावोत त चिंता नका करज्यात कि आम्ही कोणत्या प्रकारे आणि काय उत्तर देवूत कि काय सांगसुत | 12 कारण कि पवित्र आत्मा त्याच घळी तुमले शीकाळी दिन कि काय सांगाले पाहिजे|| 13 नंतर गर्दी मधून एक नि तेले सांग ओ गुरुजी मना भावू ले सांग कि बाप नि सामप्ती माले वाटी देवो | 14 तेनी तेले सांग; ओ माणूस कोणी मले तुमना वाटनार आणि न्याय करणार ठरायेल शे? 15 आणि तेनी तेसले सांग; सावधान राहा आणि सगळ्या प्रकार ना लोभ पासून स्वता ले वाचाळी सन ठेवा : कारण कि कोणा जीवन तेनी संपत्ती नि जास्ती कन नई होत | 16 तेनी तेसले एक दाखला सांग कि कोणी एक मालदार नि जमीन मा मोठ पिक उन | 17 तव तो आपला मन मा विचार कराले लागणा कि मी काय करू कारण कि मना आठे जागा नई जठे आपला पिक ठेवू | 18 आणि तेनी सांग; मी हय करीन: मी आपली बखारीया तोळीसन तेसणा तून मोठ्या बनावसु ; 19 आणि तठे आपला सर्व पिक आणि संपती ठेवसू: आणि आपला जीव ले सांगसू कि जीव तुना साठे गैरावर्षस साठे गैरी संपत्ती ठियेल शे; आराम कर खा पीसुख मा रहा| 20 पण देव नि तेले सांग; ओ एळा ह्याच रात ले तुनां जीव तुना पासून लेवाय जाईन: तव जे काही तुनी एकत्र करेल शे ते कोण हुईन ? 21 तसाच तो माणूस बी शे जो आपला साठे धन एकत्र करस पण देव नि दृष्टी मा मालदार नई || 22 नंतर तेनी आपला शिष्यस्ले सांग; एनासाठे मी तुमले सांगस आपला जीव नि चिंता नका करा कि आम्ही काय खासुत; नई त आपला शरीर नि कि काय घालासुत | 23 कारण कि जेवण तून जीव आणि कपळा पासून शरीर मोलवान शे| 24 कावळास्वर ध्यान द्या; त्या नई त परतस नई त कापतस; नई त तेस्ना भांडार आणि नई त खत्ता व्हस; तरी बी देव तेसले पायस; तुमना मोल पक्षीस पासून कितलाक पट जास्त शे | 25 तुमना मधुन असा कोण शे जो चिंता करीसन आपली स्थिती मा एक घळी बी वाळाइ सकस ? 26 एनासाठे कदी तुमी सगळास्तून धाकला काम बी नई करी सकतस त आखो गोष्टीससाठे काब चिंता करतस ? 27 सोसण ना झाळ वर ध्यान द्या कि त्या कसा वळतस; त्या नई त श्रम करतस नई त कापतस; तरी बी मी तुमले सांगस कि सुलेमान बी आपला पुरा वैभव मा तेसणा मधून कोणी एक ना सारखा कपळा घालेल नई होता| 28 एनासाठे कदी मैदान ना गवत ले जो आज शे; आणि काल दिन विस्तो मा टाकाईन अस्सा घालस; त शे अविस्वाशी तो तुमले काब नई घालाव ? 29 आणि तुमी ह्या गोष्ट नि शोध मा नका राहा कि काय खासुत आणि काय पिसुत आणि संशय नका करा| 30 कारण कि संसार नि जात ह्या सगळ्या गोष्टीस्ना शोध मा रहातस: आणि तुमना बाप ले माहिती शे कि तुमले ह्या गोष्टीनी गरज शे | 31 पण तेना राज्य ना शोध मा राहा त त्या वस्तू बी तुमले भेटी जातीन | 32 ओ धाकला टोया भ्यावू नको; कारण कि तुमना बाप ले हाय आवळन शे कि तुमले राज्य देवो| 33 आपली संपत्ती विकीसन दान करी द्या; आणि आपला साठे असा बटवा बनावा ज्या जुना नई होतस म्हणजे स्वर्ग मा असा धन एकत्र करा जो कमी होत नई आणि जेना जोळे चोर नई जात आणि किळा नई बिगाळत | 34 कारण कि जठे तुमना धन शे तठेच तुमना मन बी लागेल राहीन|| 35 तुमना कमर बांधेल शे आणि तुमना दिवा पेटत राहो| 36 आणि तुमी त्या मानसस सारखा बना जो आपला मालक ना रस्ता देखी राय्ना हो कि तो लगन मधून कव परतीन; कि जव तो इसन दार वाजाळो त लगेच तेना साठे उघाळी देवूत| 37 धन्य शे त्या दास जेसले मालक इसन जागता देखीन; मी तुमले खरज सांगस कि तो कमर बांधीसन तेसले जेवण कराले बसाळो आणि जोळे ईसन तेस्नी सेवा करीन | 38 कडी तो रात ना दुसरा पहर ले नई त तिसरा पहर वर ईसन तेसले जागता देखो त त्या दास धन्य शेतस | 39 पण तुमी हय समजी ल्या कि कदी घर ना मालक ले माहिती रहात कि चोर कोणता घळी इन त जागेल रहाता आणि आपला घर मा चोरी होवू नई देता | 40 तुमी बी तयार राहा; कारण कि ज्या घळी तुमी विचार बी नई करतस त्याच घळी माणूस ना पुत्र इजाईन || 41 तेव्हा पेत्र नि सांग प्रभू कि हवू दाखला तू आमलेच कि बठ्ठासले सांगस | 42 प्रभू नि सांग; जो विश्वास योग्य आणि बुद्धिमान भंडारी कोण शे जेना मालक तेले नोकर-चाकरस वर अधिकारी ठराइन कि तेसले वेळेवर शिधासामग्री देवो | 43 धन्य शे जो शिष्य जे ले तेना मालक इसन साज करतांना देखो 44 मी तुमले खरज सांगस तो तेले आपली सर्व संपती वर अधिकारी ठराईन | 45 पण तो शिष्य विचार कारले लागो कि मना मालक येवामा उशिर करी रायना शे आणि शिष्यसले मारा-ठोकाले आणि खावा-पिवा ना आणि बेवळा होवाले लागो| 46 त त्या शिष्य ना मालक आसा रोज ना तो तेना रस्ता नई देखत राहावआणि असा वेळेवर जो तेले मायीत नयी तो ईजायीनआणि तेल भारी दंड दिसन तेना वाट अविश्वासी ना संगे ठराइन| 47 आणि तो शिष्य जो आपला मालक नि इच्छा समजत होताआणि तयार नई होता आणि तेना इच्छा वर नई चालना गैर मार खाईन | 48 पण जो नई समजीसन मार खावान योग्य काम करस तो कमी मार खाईन एनासाठे जेले सावट दियेल शे तेना कडून जास्त मांगामाईन आणि जेले जास्त सोपेल शेतेनावर गैर मांगतीन || 49 मी पृथ्वी वर आग लावले एएल शे; आणि काय देखस फक्त हीच कि आतेच सिल्गी जाती ! 50 मले त एक बाप्तिस्मा लेना शे आणि जठ लगून ते नई हुई जास तठ लगून मी कशी सकेती मा रहासू ? 51 काय तुमी समजतस कि मी पृथ्वी वर मेयखावाळा ले एयेल शे ? मी तुमले सांगस ; नई पण आल्लग कराले एयेल शे | 52 कारण कि आते पासून एक घर मा पाच झन आपसा मा विरोध ठेवतीन तीन दोन संगे आणि दोन तीन संगे | 53 बाप पुत्र संगे पुत्र बाप संगे वीरोध ठेवीन; माय पोर संगे आणि पोर माय संगे सासू सून संगे आणि सून सासू संगे विरोध ठेवीन || 54 आणि तेनी गर्दी ले बी सांग जव ढग ले पश्चिम पासून उठतांना देखतस त त लगेच सांगतस कि पाणी पळीन; आणि तसाच होस 55 आणि जेव्हा दक्षिण चालतांना देखतस आणि संगतास उष्णता चालीन आणि आसच होस 56 हे कपटी तुम्ही आकाश आणि पृथ्वी रूप मा फरक करू शकतास पण या जग न विषय मा फरक कराना माहित नयी शे ? 57 आणि तुमी स्वतःह निर्णय काबर करत नाहीकि योग्य काय शे ? 58 जेव्हा तू आपला मुद्दाई बरोबर अधिकारी कडे जाशीन त रस्तावर तेन कडून सुटाना प्रयत्न कर आस नई होवाव कि त्या तुले न्यायी कडे तानिसन लीजातीन आणि न्यायी तुले शिष्य ले सोपीन आणि शिष्य तुले बंदीगृह मा टाकतीन | 59 मी तुले सांगसकि जडलोंग तू पाई -पाई चुकाडाव नई तड लोंग तू तडून सुटाव नई ||