4
1 मग जेंव्हा प्रभू ले माहीत होयन की पारुशींनी आयके ले शे की येशू योहान पेक्षा जास्त शिष्य बनावना आणी तेसले बाप्तिस्मा देस. 2 (तरी येशू स्वतः नयी परंतु तेना शिष्य बाप्तिस्मा देत होता) 3 तेंव्हा तो येहुदियाले सोडीसन आजून गलील मा चाल ना गया. 4 तेले सामरीया कडून जावाना आवश्य होत. 5 तर तो सुखार नावांना सामरीयाना एक नगर लोंग उना जे त्या जमीन ना जोळे शे जेले याकुबानी आपला पुत्र युसुफ ले दियल होता. 6 आणी याकुब ना कुंवा भी तडे होता. तर येशू रस्ता ना थकेल त्या कुंवा वर असाच बठी गया. आणी हाई गोष्ट सहावा तासणा आसपास होती. 7 इतला मा एक सामरी बाई पाणी भराले उणी येशू नी तिले सांग माले पाणी पाज. 8 कारण तेना शिष्य तर नगर मा जेवण विकत लेवा साठे जाएल होतात. 9 ती सामरी बाईंनी तेले सांग. तू येहुदी होयसन मी सामरी बाई कडून पाणी काबर मांगस (कारण यहुदी सामरी ना सांगे कोणत्याही प्रकारे व्यवहार नई करू शकत) 10 येशू नी उत्तर दिघा जर तू देव ना वरदान ले समजती आणी हाई भी माहीत होत. की तो कौन शेजो थुले सांगस माले पाणी पाज तर तू तेना कडून मांगती आणी तो थुले जीवन ना पाणी देता. 11 बाईंनी तेले सांग हे प्रभू तुना कदए पाणी भरा साठे काही भी नई शे आणी कुंवा खोल शे तर मग ते जीवन ना पाणी तुना कडून कथाईन उना. 12 काय तो आभाना बाप याकुब तून मोठा शे. जेनी हावू कुंवा आमले दियेल शे आणी आपला पोर आणी आपला ठोर सबोट तेना मधून पिनत. 13 येशूनी तेले उत्तर दिध जो कोणी हाय पाणी पियीन तेले परत तहान लागीन. 14 परंतु जो कोणी या पाणी मधून पिन जे मी तेले देसू तो मग अनंतकाळलोंग कधी तहान लागाव नई परंतु जे पाणी जेले मी दिसू तो तेना मा एक सोता बन जाईन जे सर्व काळ पर्यंत जिवण ना झरा बाणी जाईन. 15 बाईने तेले सांग हे गुरु ते पाणी माले दे की मी कधीच तहानेल नई होवू आणीनई इतला दूर पाणी भराले येवू. 16 येशूनी तेले सांग जा आपला नावराले बलायी लय. 17 बाईंनी उत्तर दिघा की मी बिगर नवरांनी शे एषू नी तले सांग तू चांगला खरे सांगस की मी बिगर नवरांनी शे. 18 कारण तू पाच नवरा करेल शे. आते जेणा कडे तू शे. तो भी तुना नवरा नई शे हाई तू खर सांगेल शे. 19 बाईंनी तेले सांग. हे प्रभू मना समझ मा इरायन की तू संदेष्टा शे. 20 आमना वडील लोकसणी याच डोंगर वर उपासना करणत आणी तुमी सांगतास की ती जागा जाडे उपासना कराले पाइजे ते येरुशलेम मा शे. 21 येशू नी तेसले सांग हे बाई मना गोष्ट वर विश्वास कर की ती वेळ यस की तुमी त या डोंगरवर पितानी उपासना करशान नई त येरुशलेम. 22 तुमी जेले नई ओळखत. तेंनी उपासना करतस. आणी अमि जेले ओयखतस तेंनी उपासना करतस. कारण उद्धार यहुदीसमा शे. 23 परंतु तो वेळ येस आणी आते भी शे जे नामा खरा भक्त पिता नी उपासना आत्मा आणी खरेपण तून करीन कारण पिता आपला असाच उपासना करणारासले झामलस. 24 देव आत्मा शे आणी आवश्य शे की तेंनी उपासना करणारा आत्मा आणी खरेपणातून उपासना करा. 25 बाईंनी तेले सांग माले माहीत शे. की मशीह जेले ख्रिस्त म्हणतस येणारा शेजेंव्हा तो ईन तेंव्हा सर्व गोष्टी आमले सांगी दिन. 26 येशूनी तेले सांग मी जे तुले सांगस तोच शे. 27 इतलामा तेना शिष्य इग्यात. आणी आश्चर्य करू लागणत की तो बाई शी बोली रायना. की तुणी काय इच्छा शे. मंग कसा साठे ईना बरोबर बोलस. 28 तेंव्हा बाई आपला घडा सोडीसन नगर मा पयी गाई आणी लोकसले सांगू लागणी. 29 या एक मनुष्य के देखाजेनी सर्व काही जे मी करेल होत सांगी दिघा हावू ख्रिस्त शे. 30 नंतर त्या नगर मधून निगीसन तेना कडे येवू लागनत. 31 इतलामा तेना शिष्य येशूले विनंती करू लागणत. की हे गुरु काही खाई ल्या. 32 परंतु तेंनी तेसले सांग. मना कदए खावले असा जेवण शे जे तुमले माहीत नई शे. 33 तेंव्हा शिष्यासनी आपस मा सांगनत काय कोणी तेना साठे खावले आनेल शे. 34 येशूनी तेसले सांग मना जेवण हाई शे. की माले धाडणाराना इच्छा वर चालू आणी तेना काम पूर्ण करू. 35 काय तुमी नई सांगतस की कापणी करासाठे आजून चार मयना बाकी शे. देखा मी तुमले सांगस आपला डोख उघाडीसन वावर समा नजर टाका की त्या कापणी साठे पिकेल शे. 36 आणी कापणाले रोज भेटस आणी अनंत जिवण साठे धान्य एकत्र करस. कारण पेरणारा नई कापणारा दोणी एकत्र होईसन आनंद करतस. 37 कारण येनावर एक गोष्ट चांगली बसस की पेरणारा आणी कापणारा आणी. 38 मिनी तुमले ते वावर कापले धाडणू जेनावर तुमी काम नई करणत. दूसरासनी मेहनत करणत. आणी तुमी तेसना मेहनत ना नफ्या मा भागेदारी होयग्यात. 39 आणी त्या नगरमा ना गैरा सामरिया नी त्या बाई ना सांगावरुन. जेनी हाई साक्ष दिएल होता. की तेंनी सर्व काही जे मिनी करेल शे. माले दाखाडी टाक विश्वास करणात. 40 तेंव्हा जवय त्या सामरी तेना कदए ऊनत तर तेले विनंती करू लागणात की आमना कदए राहीजाय मग तो तडे दोन दिन रायना. 41 आणी तेना वचन ना कारण आणी गैरा सनी विश्वास करणत. 42 आणी त्या बाई ले सांगना आते अमि तुमणा सांगावर नई विश्वास नई कराव. कारण मी स्वताही आएकेल शे. आणी समजी ग्यात की हावू खरोखर तो जगत ना उद्धार कर्ता शे. 43 मग तो त्या दोन दिन नंतर तो तडुन काही करीसन गलील मा चालना गया. 44 कारण येशूनी स्वतःह साक्ष दियेल होता. की संदेष्टा आपला देश मा आदर नई भेटस. 45 जेंव्हा तो गलील मा उना तर गालिली आनंद मा तले भेटनत कारण जीतला काम. तेंनी येरुशेलम मा वाल्हांडण सणना वेळी करेल होता. तेसनी ते सर्व देख होत. कारण त्याभी सन माजाएल होता. 46 तेंव्हा आखो तो गलील ना कामा मा उना जाडे तेंनी पाणीले दाखरस बनवा होता. आणी राजा ना एक कर्मचारी होता. जेणा पोरगा कफरनहूम मा आजारी होता. 47 तो हाई आयकीसन की यीशू यहुदीया मधून गलील मा इजाएल शे.तेना कडे गया आणी तेले विनंती करू लागना की मना पोरगा ले बरा करी दे कारण तो मरण वर होता. 48 येशूनी तेले संग जड लोंग तुमी चिन्ह आणि चमत्कार कार्य नये देखतस दडलोंग कधीच विश्वास नई कराव. 49 राजा ना कर्मचारीनी तेले सांग. हे प्रभू मना पोरगा ना पयले चाल. 50 येशूनी तेले सांग जा तुना पोरगा जीवंत शे त्या मनुष्यानी येशू नी सांगेल गोष्टीवर विश्वास करणा आणि चालना ग्या. 51 तो रस्तावर चालत होता तेना दास इसन भेटनत आणि सांगू लागणत की तुना पोरगा जीवंत शे. 52 तेंनी तेसले विचार की त्याच वेळी तो चांगला होवू लागना तेसनी तेसले सांगना कालदिन सातवा घंटाले तेना ज्वर उतरी जाईन. 53 तेंव्हा पिलाले माहीत पडण की हाई त्या वेळी होयन की ज्या वेळी येशूनी त्या वेळी सांग तुना पुत्र जीवंत शे. आणी त्याने आणी तेना पूर्ण घरणानी विश्वास करणत. 54 हाई दूसरा आश्चर्य काम होत. जे येशूनी यहुदीया तुन गलील मा ईसन दाखळणा.