2
1 जव पिन्तेकुस्त ना दिन उना, त व्या सगळा एक जागावर एकत्र होतात. 2 अचानक आकाश मधुन मोठी आंधी सारखी आवाज उना, आणि तेना कन पुरा घर जेठे त्या बठेल होतात,आवाज कण भरी ग्या. 3 आणि तेसले आग सारखी जीभ फाटताना दिखनात आणि तेसना मधुन हर एक वर थांबनी. 4 आणि त्या सगळा पवित्र आत्मा कन भरी ग्यात, आणि ज्या प्रकारे पवित्र आत्मा नी तेसले बोलानी सामर्थ दिधा,त्या दुसर्या-दुसर्या भाषा बोलाले लगनात. 5 आणि आकाश खालेना बट्ठा जातीस मधुन भक्त यहुदी यरूशलेम मा राहत होतात. 6 जव तो आवाज आयकु उना गर्दी हुई गी आणि लोक घाबरी ग्यात, कारण कि सगळास ले हईच आयकु येत होत, कि ह्या मनीच भाषामा बोली रायनात. 7 आणि त्या सगळा चकित आणि भेमकाईसन संगाले लगनात; देखा, ह्या ज्या बोली रायनात काय गालील नईत ? 8 तो काब आम्हणा मधुन सगळा आपली आपली मुळ भाषा आयकतस ? 9 आम्ही ज्या पारथी आणि मेदी आणि एलामी लोक आणि मिसुपुतानि आणि यहूदि कप्पदूकिया आणि पुन्तुस आणि आसिया, 10 आणि फ्रूगिया आणि पंफूलिया आणि मिसर आणि लिबुआ प्रान्त जो कुरेने ना आंगे पांगे शे, ह्या सगड्या देशस्ना राहनार आणि रोम प्रवासी, काय यहुदि त काय यहुदी मत धारण करनार, क्रेती आणि अरबी बी शे. 11 पण आपली-आपली भाषा मा तेस्ना कण देव ना मोठा-मोठा कामस्नी गोष्टी आयकतस. 12 आणि त्या सगळा चकित हुयनात, आणि घाबरीसन एक-दुसराले सांगाले लगनात कि ह्य काय हुई राहन. 13 पण दूसरासनी निन्दा करत सांगनात, कि त्या त नवा द्राक्श रस ना धुनंदी माशेतस. 14 पेत्र त्या अकरास संगे उभा रायना आणि जोरमा सांगाले लागना, कि “ओ यहुदीसहोन आणि यरूशलेम ना राहनासहोन, हय समजील्या आणि कान लाईसनं मन्या गोस्टी आयका. 15 जस तुम्ही समझतस, ह्या नशा मा नाईत, कारण कि आतेत माथा वरच दिन चळेल शे. 16 पण हयती गोस्ट शे, जी योएल भविष्यवक्ता द्वारा सांगायेल शे. 17 कि देव सांगस, कि आखरी ना दिनस्मा अस हुईन, कि मी आपली आत्मा सगळा मानसस वर ओती टाकसु आणि तुम्हणा पोर आणि तुम्हणी पोरी भविष्यवाणी करतीन आणि तुम्हणा तरुण दर्शन देखतीन, आणि तुम्हणा वरिष्ठ स्वप्ना देखतीन. 18 आणि मी आपल्या चाकरास आणि दासीस वर त्या दिनस्मा आपली आत्मा मधुन ओतसु, आणि त्या भविष्यवाणी करतीन. 19 आणि मी आकाश मा अद्भुत काम, आणि खाले प्रथ्वी वर चिन्ह म्हणजे रक्त, आणि आग आणि धुकक्य ना ढग दाखळसु. 20 प्रभु ना महान आणि प्रसिद्ध दिन ना येवाना पहिले सूर्य अंधार आणि चाँद रक्ताळ हुई जाईन. 21 आणि जो कोणी प्रभु ना नाव लीन, तेनेच तारण होईन. 22 ओ इस्त्राइलस होण, ह्या गोस्टी आयका: कि येशु नासरी एक मानुस होता जेना देव कडुन होवाना प्रमाण त्या सामर्थ ना कामास आणि आश्चर्य ना कामास आणि चिन्हस कन प्रगट शे, ज्या देवनी तुम्हणा मधमा तेना कडुन करी दाखाळ जेथे तुम्ही स्वता जनतास. 23 तेलेच, जव तो देव नी ठरायेळ मनसा (इच्छा) आणि होनहार ना ज्ञान प्रमाणे बरबरमा उना, त तुम्हणी अधर्मी ना हात मधुन तेले क्रुस वर चढाईसन मारी टाकले. 24 पण तेलेच देव नी मृत्यु ना बंधन मधुन सोळाईसन जिन्दा कर : कारण की हय अशक्य होत की तो तेनामा बांधायेल राहात. 25 कारण की दाविद तेना बारामा सांगस, कि मी प्रभु ले कायम आपल्या समोर देखत रायनु कारण की तो मना उजबी कडे शे, एनासाठे कि मी पळी नई जावो. 26 एनासाठे मना मन खुस हुयना,आणि मनी जीप मग्न हुईनी; आखो मना शरीर (अंग) बी आशा मा बसेल राहीन. 27 कारण की तू मना जीवले नरक मा नई सोडाब: आणि नई त आपल्या पवित्र जन ले सळुच दिन. 28 तुनी मले जीवन ना रस्ता दाखवेल शे; तू मले आपल्या दर्शन द्वारे खुशी ना करेल भरी देशीन. 29 ओ भावसहोण, मी या कुलपति दाविद ना बारामा तुमना संगे साहस कन सांगी सकस की तोत मरी ग्या आणि गाढाई बी ग्या आणि तेनी कबर आज लगुन आम्हणा आठे वर्तमान शे. 30 त भविष्यवक्ता हुईसन आणि हय समजीस कि देव नी मना संगे शपत लियेल शे, कि मी तुना वंश मधुन एक व्यक्ति ले मना स्थान वर बसळ्सु. 31 तेणी (होनहार) ले पहिलेच पासुन देखीसन ख्रिस्त ना जिन्दा हुई जाबना बारामा भविष्यवाणी करी की नई तेना जिब नरक (अंधलोक) सोळायना, आणि नाईत तेना शरीर (अंग) सलणी. 32 ह्याच येशूले देव नी जिन्दा कर,जेना आम्ही सगळ्या साक्षी सेतस. 33 ह्याच प्रकारे देव ना हतकन सर्वोच पद बिसन, आणि बापकन तो पवित्र आत्मा बिसन जेनी शेपथ लियेल होती, तेनी हय ओती टाकले शे जे तुम्ही देखतस आणि आयकतस. 34 कारण की दाविद त स्वर्ग मा नई चळना; पण तो स्वता सांगस, कि प्रभू नी मा प्रभू ले संग: 35 मना उजवी कडे बठ, जव लगुण कि मी तूना विरोधी ले तुमा पायस खाली (चौकी) नई करी टाकु. 36 त आते इस्त्राइल ना पुरा परिवार निश्चय समजी लेवो की देव नी त्याच येशू ले जेले तुम्ही क्रूस वर चळाव, प्रभू ठराव आणि ख्रिस्त बी. 37 तव आयकना सना हृद्य भेवाई ग्यात, आणि त्या पैत्र आणि बाकी प्रेषितसले विचारले लागणात की ओ भावु, आम्ही काय करुत ? 38 पैत्र नि तेस्ले सांग, पश्चताप करा, आणि तुम्हणा मधुन प्रत्येक आपल्या-आपल्या पापस्नी मापी साठे येशु ख्रिस्त ना नाव कन बाप्तिस्मा ल्या: त तुम्ही पवित्र आत्मा ना दान लेशात. 39 कारण की हई शपथ तुम्ही, आणि तुम्हणी वंश, आणि त्या सगळा दुर-दुर ना लोकस साठे बी शे जेस्ले प्रभू आम्हणा देव आपला जोळे बलाईन. 40 तेनी गैर्या गोस्टीस्मा बी साक्षी दी-दीसण समजाळ कि स्वताले ह्या वाकली, जात पासुन वाचाळा. 41 त जेस्नी तेना वचन ग्रहण कर तेस्नी बाप्तिस्मा लिधा; आणि त्याच दिन तीन हजार मनसस्मा आंगे-पांगे तेस्ना इग्यात. 42 आणि त्या प्रेषितस पासुन शिक्षण लेवाले, आणि संगति ठेयामा आणि भाकर मोळा मा आणि प्रार्थना करामा मग्न (लीन) रायनात. 43 आणि सगळा लोकस्मा भिती घुसी गई,आणि कितलाक अद्भुत काम आणि चिन्ह प्रेषितस द्वारे प्रगत होत होतात. 44 आणि त्या सगळा विश्वास करणार एकत्र राहत होतात, आणि तेस्नि सगळी वस्तु बटाई नी होती. 45 आणि त्या आपली संपती आणि सामान विकिसन जसी जेनी गरज होती वाटी टाकत होतात. 46 आणि दररोज एक मन हुईसन मंदिर मा एकत्र होत होतात, आणि घर-घर भाकरी मोडत सुखी आणि मन नी सरळता कन जेवण कर्या करत होतात. 47 आणि देव नी स्तुति करत होतात, आणि सगळा लोक तेस्ला कन प्रसन्न होतात: आणि जेले तारण भेटीजात होत, तेस्ले दररोज खुस मा भेटाळी रेत होता,