6
1 त्या दिनस्मा जव शिष्यस्नी संख्या गैरा वाळाले लागी गी,तव युनानी भाषा बोलनार इब्रानी भाषा बोलणासवर कुळकुळाले लागनात, कि दररोज नि सेवकाई म आम्हण्या विधवास्नी हालचाल नई लेवामा येत. 2 तव त्या बारास्नी शिष्यस्नी मंडळी आपला जोळे लाईसन, सांग, ह्य बर नई की आम्ही देव ना वचन सोळीसन खवाळा-पिवाळा नी सेवा मा राहुत. 3 एणासाठे, ओ भावुस होन आपल्या मधुन सात चांगला नाव ना मानसस्ले ज्या पवित्र आत्मा आणि बुद्धी कन भरेल होत,निवाळी ल्या, कि आम्ही तेस्ले ह्या काम वर ठराई देवुत. 4 पण आम्हीत प्रार्थना मा आणि वचन नि सेवा लागेल राहसुत.” 5 हय गोष्ट पुरी मंडळी ले बरी वाटनी, आणि तेस्नी स्तिफनुस ना नावणा एक मानुस ले जो विश्वास आणि पवित्र आत्मा कन भरेल होता, आणि परमिनास आणि अंताकिया ना रहिवासी निकुलाउस ले जो यहुदी मत मा ई लागेल होता, निवाळी लिधा. 6 एस्ले प्रेषितस समोर उभा करा आणि तेस्नी प्रार्थना करीसन तेस्ना वर हात ठेवा. 7 देव ना वचन पसरत ज्ञ आणि यरूशलेम मा शिष्यस्नी संख्या गैरी बाळतगी: आणि यजक स्ंनी मोठी जाती हय मत ले माननार हुई ग्या. 8 स्तिफनुस अनुग्रह आणि सामर्थ कन परिपुर्ण हुईसन लोकस्मा मोठा-मोठा अद्भुत काम आणि चिन्ह दाखाळत होता. 9 तय त्या प्रार्थना घर मधुन जी लिबीरतीन म्हणावत होती, आणि कुरेंनी आणि सिकंदरिया आणि किलीकिया आणि एशिया ना लोकस मधुन कितलाक उबीसन स्तिफनुस संगे विवाद- कराले लागनात. 10 पण ज्या ज्ञान आणि ज्या आत्मा ना जनाकन तो गोष्टी करत होता, त्या सामना नये करू सकनात. 11 एनावर तेस्नी कितलाक लोकस्ले उभाकरा ज्या सांगाले लागनात, “आम्ही एले मोशे आणि देव ना विरूद्ध मा निंदा नी गोष्टी सांगतांना आयकेल शे.” 12 आणि लोकस्ले आणि प्राचीनस्ले आणि शास्त्रीस्ले चिनग्या भळकाईसन चळी उनात आणि तेले धरीसन महासभा मा लई उनात. 13 आणि खोटा साक्षीस्ले उभा करात, जेस्नी सांग, हवु मानुस हय पवित्र जागा ले आणि व्यवस्था ना विरूद्ध बोलाना नई सोळत. 14 कारण की आम्ही तेले ही सांगतांना आयकाले कि हवुच येशू नासरी ह्या जागाले धसाळी दिन आणि त्या रितीस्ले बदलाई टाकीन ज्या मोशे नी आम्ह्ले सोपेल शेतस.” 15 तव सगळा लोकस्नी ज्या सभा मा बठेल होतात, तेनावर नजर टाकी त तेना तोंड देवदूत सारखा देखनात.