5
1 आड्लोंग आयकामा एल शे.कि तुमना मा व्यभिचार होस पण असा व्यभिचार जो अन्यजाती मा भी नई होस कि एक मनुष्य आपला बाप नि बायको ले ठेवस || 2 आणि तुम्ही शोक तर नई करतस जेनावर असा काम करणारा तुमना मधून निघी जास पण घमंड करतस || 3 मी तर शरीर ना भाव वर दूर होतु पण आत्मा ना भाव वर तुमना संगे होईसन समजा उपस्थिती नि दशा मा असा काम करणारा ना विषय मा हाई आज्ञा दियेल शे || 4 कि तव तुनि आणि मनी आत्मा आमना प्रभू येशू नि सामर्थ्य ना संगे एकत्र हो वो तर असा मनुष्य आमना प्रभू येशु ख्रिस्त ना नाव वर ! 5 शरीर ना नाश साठे शैतान ले सोपामा येवो कारण तेनी आत्मा प्रभू येशू ना दिन मा उद्धार भेटोत | 6 तुमना घमंड कराना चांगला नई काय तुमले माईत नई कि थोडासा खमीर पूर्ण कालाएल पीठ ले खमीर करी देस || 7 जुना खमीर काडीसन स्वताले शुद्ध करा कि.नवीन कालाएल पीठ बनी जावा कारण तुम्ही अखमिरी होवोत कारण आमना भी पिक जो ख्रिस्त शे.बलिदान होएल शे || 8 तर या आम्ही उत्सव मा आनंद करूत नई तर जुना खमीर वर आणि नई वाईट आणि दृष्ट्तानी खमीर वर पण सिधाई आणि खरेपणा नि अखमिरी भाकर वर || 9 मी नि आपली पत्री मा तुमले लिखेल शे.कि व्याभिचारी नि संगती मा नका राह्ज्यात || 10 हाई नई कि तुमी बिलकुल या जग ना व्याभिचारी किंव्हा लोभी कि अंधार करणारा कि मूर्ती-पूजक नि संगती नका करा कारण या दशा मा तर तुमले जगत मधून निघी जावान पडस || 11 मन सांगान हाई शे.कि जर कोनि भावू सांगीसन व्यभीचारी कि लोभी कि मूर्ती-पूजक कि गाई देणारा कि बेवडा कि अंधार करणारा राहस तर तेसणा संगती नका कारज्यात पण असा लोकस संगे जेवण भी नका कारज्यात || 12 कारण माले बाहेरनासना ज्ञाय करावर काय काम काय तुम्ही मधलास्ना ज्ञाय नई करतस || 13 पण बाहेरनासणा ज्ञाय देव करीन एनासाठे त्या कुकर्मी ले तेनामधुन काळी टाका !!