7
1 त्या गोष्टीना विषयमा जे तूमनी लिख हाई चांगल शे. कि माणूस - बाईले हात नई लावो.| 2 पण व्यभिचार ले घाबरीसन प्रत्येक मानुसास नी नवरी आणि प्रत्येक बाई ना नवरा हो.| 3 नवरा आपली नवरी ना हक्क पूर्ण करोत आणि तसाच नवरी भी आपला नवराना.| 4 नवरीले आपला शरीर वर अधिकार नई पण तेना नवराना अधिकार शे.तसाच नवराले भी आपला 5 तुमी एक दुसरा पासून अलग नका राहत पण काही वेळ लोंग आपसी सम्मती तून प्राथना ले वेळ 6 पण मी जे हाई सांगस ती परवानगी ती शे नई कि आज्ञा.| 7 मनी हाई इच्छा शे कि जसा मी शे तसाच सर्व मनुष्य हो पण प्रत्येकले देवकळून विशेष विशेष वरदान भेटेल शे, कोणाले कोणा प्रकारना आणि कोणाला कोणत्या दुसरा प्रकारना.| 8 पण मी अविवाहित आणि विधवासले ना विषय मा सांगस कि एसना साठे असाच राहाना चांगाला 9 पण त्या धीर नई धरूसकस तर लग्न करील्या कारण लग्न करान कामतर राहा पेक्षा चागलं शे.| 10 जेन लग्न होई जाएल शे तेसले मी नई पण प्रभू आज्ञा देस कि नवरी आपला नवरा तून अलग नको होयजो.| 11 आणि जर अलग भी होईन जाईन तर बिना दुसरा लग्न ना राह्जो किव्हा आपला नवराकळे परत 12 दुसरासले प्रभू नई पण मीच सांगस जर कोणता भाऊ नि नवरी वर विश्वास नई ठेवस तर तिले तो सोळी देवो | 13 आणि ज्या बाई ना नवरा विश्वास नई ठेवत असो.आणि तेनाशी राहाले खुश शे.ती नवरा ले नका सोळा | 14 कारण असा नवरा जो विश्वास नई ठेवस तो नवरी ना कारण पवित्र ठरस आणि अशी नवरी जी विश्वास नई ठेवस ती नवरा मुळे पवित्र ठरस नईतर तुमना लेकरू-बाळ अशुद्ध होतस पण आते तर पवित्र शे| 15 पण जो माणूस विश्वास नई ठेवस जर तो वेगळा हो तर वेगळा होवू द्या.असी दशा मा कोणताहि भाऊ-बहिण बंधन मा नई. पण देव नि तर आमले मेल-मिलाप साठे बलाएल शे || 16 कारण हे बाई तुले काय माईत शे ?कि तू आपला नवरा ना उद्धार करायलेस. आणि हे पुरुष तुले काय माहित शे ? कि तू आपली नवरी ना उद्धार करायलेस || 17 पण जसा प्रभू नि प्रत्येक ले वाटेल शे.आणि जसा देव नि प्रत्येक ले बलावेल शे.तसाच तो चाल आणि मी सर्व मंडळी मा असाच ठरावस || 18 जो खतना करेल शे.तो खतना रहित नका बना जो खतना रहित बलावामा शे.खतना नको करावा || 19 नई खतना काही शे. आणि खतना पण देव नि आत्मा मनामा सर्वकाही शे. || 20 प्रत्येक जन ज्या दशा मा बलायेल शे.तेनामाच राहो | 21 जर तू दास ना दशा मा बलावामा एल शे.तर चिंता नको करू जर तू स्वतंत्र होऊ शकस तर असाच काम कर | 22 कारण जो दास दशा प्रभू मा शे तो प्रभू ना स्वतंत्र करेल शे.आणि तसाच स्वतंत्र नि दशा मा ब्लावामा एल शे.तो ख्रिस्त ना दास शे | 23 तुमनी किंमत विकत लीयेल शेतस मानससना दास नका बना | 24 हे भाऊ जो कोणी ज्या दशा मा बलायेल शे.तो तेनामाच देव ना संगे राहो || 25 कुमारीस्ना विषय मा प्रभू नि काही आज्ञा माले नई भेटनी पण विश्वास योग्य होवासाठे जशी दया प्रभू नि मनावर करेल होता तेना नुसार संपत्ती देस | 26 तर मना समज मा हाई चांगल शे.कि आजकाल क्लेश ना कारण मनुष्य जसा शे.तसाच राहो | 27 जर तुनी नवरी शे.तर तेनाशी वेगळा होवाना प्रयत्न करू नको आणि तुनी नवरी नई शे. तर नवरी ना शोध करू नको | 28 पण तू लग्न भी कारस तर पाप नई आणि कुवारीना लग्न होईजास तर आही पाप नई पण असासले शारीरिक दुख होईन आणि मी वाचाळाना देखस || 29 हे भाऊ मी हाई सांगस कि वेळ कमी करेल शे एनासाठे पायजे कि जेसना नवरी शे. त्या आसा असो कि तेस्नी नवरी नई शे | 30 आणि रडणारा आसा असो कि समजा रडत नई आणि आनंद करणारा आसा असो कि समजा आनंद नई करस आणि विकत लेणारा आसा असो कि समजा तेस्ना कळे काही ही नई || 31 आणि या संसारणा उपयोग करणारा आसा असो कि संसार नाच नई असो | 32 ".तर मनी हाई इच्छा शे.कि तुम्ह्ले चिंता नको अविवाहित व्यक्ती प्रभू नि गोष्ट नि चिंता मा राहस कि प्रभू ले कसकाय खुष ठेवू """ 33 पण विवाहित मनुष्य संसार नि गोष्ट नि चिंता मा राहस कि आपली नवरी ले कोणत्या प्रकारे खुश करू | 34 विवाहित आणि अविवाहित मा भी फरक शे.अविवाहिता प्रभू नि चिंता मा राहस कि ती देह आणि आत्मा दोनिस्मा पवित्र असो पण विवाहिता संसार नि चिंता मा राहस कि आपला नवराले खुश ठेवू | 35 हाई गोष्ट तुमनाच लाभ साठे सांगीरायनु.कि तुमले फसाळासाठे नई एनासाठे कि जसा सोह्ता शे तसाच करा मा ईन कि तुम्ही एक चित्त होईसन कि प्रभू नि सेवा मा लागी रावा|| 36 आणि जर कोणी हाई समजस कि मी आपली कुमारी ना हक्क मारी रायनु जेनी जवानी जाई रायनी आनि प्रयोजन भी होयनात तर जसा चाहश्यान तसा कारज्यात एनामा पाप नई तेना लग्न होवू द्या || 37 पण जो मन मा दृढ राहस आणि तेले प्रयोजन नयी शे.पण आपली इच्छा पूर्ण कराले अधिकार ठेवस आणि आपला मन मा हाई गोष्ट पक्की आशीन कि मी आपली कुवारी पोर लेबिना लग्न नि ठेवसू ?तो चांगल करस ? 38 तर जो आपली कुवारी पोर न लग्न करी देस तो चांगल कारीदेस आणि जो लग्न नई करी देस तो आजून भी चांगल करस | 39 जडलोंग कोणत्याही बाई ना नवरा जिवंत राहस तडलोंग ती तेनाशी बांधेल राहस पण जव तेना नवरा मरीजास तर जेनाशी इच्छा होईन तेनाशी लग्न करीन पण फक्त प्रभू मा 40 पण जशी श. तशीच राहो तर मना विचार मा जास्त धन्य शे आणि मी समजस कि देव ना आत्मा मनाना मा भी शे.|