9
1 काय मी स्वतंत्र नई शे ? काय मी प्रेरित नई ?काय मी येशू ले जो आमना प्रभू शे नई देख ?काय तुम्ही प्रभू मा बलायेल नै ? 2 जर मी दुसरा साठे प्रेरित नई तरी तुमना साठे तर शे.कारण तुम्ही प्रभू मा प्रेरीताई ना छाप शे, 3 जे माले पारखतस तेसणा साठे हाईच मना उत्तर शे| 4 काय आमले खावा -पिवाना अधिकार नाही. 5 काय आमले हाई अधिकार नई कि कोणती ख्रिस्ती बाईना संगे लग्न करीसन लिसन फिरुत जसा प्रेरीत आणि प्रभू ना भाऊ आणि कैफ कारस ? 6 कि फक्त माले आणि बरनबासले अधिकार नई कि कमाई करान सोडत | 7 कोण कवय आपला घरन खाईसन शिपाई न काम करस ?कोण द्राक्षमळा लावस आणि द्राक्ष नई खास ?कोण ढोरसले चारस आणि तेसणा दुध नई पेस ? 8 काय मी या गोष्टी मनुष्य ना रितीवर बोलस | 9 काय व्यवस्था भी हाई नई सांगस कारण.मुसानी व्यवस्था मा लिखेल शे कि डावखोऱ्या मा चालणारा बैल ना तोंड नई बांधान ?काय देव बैलसना चिंता करस कि विशेष कारीसन आमना साठे सांगस | 10 हा आमना साठेच लिखेल शे. कारण उचित शे कि जोतणारा आशावर जोतस आणि दावणारा भागी होवानी आशाशी.दावणी करस. 11 तर जवय कि तुमना साठे आत्मिक वस्तू पेरणा तर. काय ती मोठी गोष्ट शे. कि शारीरिक वस्तू नि धान्य कापोत. 12 तर दुसाराना तुमनावर हावू अधिकार शे, तर काय आमना येस्नातून जास्त नई होवाव पण सर्व काही सहन करतस. कि आमना द्वारे ख्रिस्त ना सुसमाचर ना काही रोक नई होवो 13 काय तुम्ही नयी जाणतस ?कि ज्या पवित्र वस्तू नी सेवा करतस त्या मंदिर मधून खातस आणि ज्या वेडी नि सेवा करतस त्या वेदि ना संगे भागी होतस 14 या रितीवर प्रभू नि भी ठराव कि ज्या लोक सुसमाचर आयकावतस तेस्नी जीविका सुसमाचार वर हो | 15 पण मी एसना मधून कोणी भी गोष्ट मा नई लयना आणि मी नि तर या गोष्टी एनासाठे नई लिखना कि मनासाठे असा करामा येवो कारन एना पेक्षा मना मराणाच चांगल शे कि कोणी मना घमंड व्यर्थ ठरावस | 16 आणि जर मी सुसमाचार आयकावू तर मना काही घमंड नई कारण हाई तर मना साठे आवश्य शे. आणि मी सुसमाचार नई आयकावू तर मनावर हाय.| 17 कारण जर आपली इच्छा शी हाई करस तर मजुरी माले भेटस आणि जर आपली इच्छा शी.नई करस तरी भी भंडारी पण मालेच सोपेल शे.| 18 तर मनी कोणती मजुरी शे,हाई कि सुसमाचार आयकाळाना मी ख्रिस्त ना सुसमाचार सेंत-मेंत करसू आड्लोंग कि सुसमाचार मा जो मना अधिकार शे.तेले मी पूर्ण रितीवर काम मा आणसु | 19 कारण सर्वास्मा स्वतंत्र होवावर भी मी नि स्वतः ले सर्वाना दास बनाई टाक आणि जास्त लोकसले तानिलयू., 20 मी यहुदियाना साठे यहुदी बनान कि यहुदियाले तानी लयू ज्या लोक व्यवस्था ना आधीन शे.तेसणा साठे मी व्यावस्था ना आधीन नई राहणु तरीबी व्यावस्था आधीन होयना ?तानी लयु 21 व्यावस्था दिन ना साठे मी [ज्या देव ना व्यावस्था तून हीन नई पण ख्रिस्त नि व्यावस्था ना आधीन शे.]व्यावस्था हीन बनान कि व्यावस्था दिनसले तानी लयनु | 22 मी कमजोर ना साठे कमजोर बनणु कि कमजोर ले तानी लयनु मी सर्व मानुसास ना साठे सर्व काही बनेल शे.कि कोणत्यान- कोणत्या रितीवर कोना एक ना उद्धार करू .| 23 आणि मी सर्व काही सुसमाचार ना साठे करस कि दुसराणा संगे भागी होई जाऊ | 24 काय तुम्ह्ले माईत नई ?कि पयामा तर सर्वाच पयतस पण बक्षीस एकच लीजास तुम्ही तसाच पयीसन जिंका | 25 आनि प्रत्येक पेलवान सर्व प्रकार ना धीरज ठेवस ते तर एक सुखनारा मुकुट ले सापडावाना साठे हाई सर्व करतस पण आम्ही तर त्या मुकुट ना साठे करतस जो सुकणार नई, 26 एनासाठे मी तर या रीतवर पयस पण बेठिकानि नई, मी भी या रितीवर बुक्कास वर भांडस, पण तेना सारखा नई हवा पिटता कारीसन भांडस | 27 पण मी आपली देह ले मारस आणि कूटस आणि वश मा लयस आस नई होवाव कि दुसरासले प्रचार कारीसन मी स्वताच कोणताही प्रकारे आळशी ठरू ||