2
1 त कदी ख्रिस्त मा काही शांती आणि प्रेम कन धाळस आणि आत्मा नि सहभागीता, आणि काही करुणा आणि दया शे| 2 त मनि हय ख़ुशी पुरी करा कि मन राहा आणि एकच प्रेम, एकच चित्त, आणि एकच विचार ठेवा| 3 विरोध नईत खोटी बळायखी साठे काहीच नका करा पण नम्रपने एक दुसरा ले आपला तून चांगला समजा | 4 हरेक आपलीच हित नि नई, पण दुसरास्नि हित नि बी चिंता करा | 5 जसा ख्रिस्त येशू स्वभाव होता जसाच तुमना बी होवो | 6 जेनी देव ना स्वरूप मा हुईसन बी देव ना बराबर होवा साठे आपला वश मा ठेवानी वस्तू नई समजणा | 7 पण स्वता ले एक असा शून्य करी टाक, आणि दास ना स्वरूप धारण कर, आणि माणूस नि समानता मा हुईग्या | 8 आणि माणूस ना रूप मा प्रगट हुईसन स्वता ले लीन कर, आणि आठ लगून आदन्या कारी रायना, कि मोत, हा, ख्रूस नि मोत बी सइ लिधी | 9 एनामुळे देव नि तेले अति माहान बी कर, आणि तेले तो नाव दिधा जो सर्वा नावस्मा श्रेष्ट शे | 10 कि जो स्वर्ग मा आणि पृथ्वी वर आणि जो पृथ्वी ना खाले शे; त्या सर्वा येशू ना वर गुळघा टेकोत | 11 आणि देव बाप नि महिमा साठे हरेक जीप मानी लेवो कि येशू ख्रिस्तच प्रभू शे|| 12 त ओ मना प्रियसहोण, ज्या प्रकारे तुमी कायमना आदन्या पायत एयेल शेतस, तसाच आते बी नईत फक्त मना संगे राहतांना पण विशेष करीसन आते मना दूर राहावर बी भ्यात आणि कापत आपला आपला तारण ना कार्य पुरा करत जावा | 13 कारण कि देवच शे, जेनी आपली सुईच्छा प्रमाणे तुमना मन मा ईच्छा आणि काम, दोनी गोष्टीस्ना कराना प्रभाव टाकेल शे | 14 सर्वा काम बिगर कुळकुळाना आणि बिगर विवाद कण कऱ्या करा | 15 एनासाठे कि तुमी निर्दोष आणि भोय हुईसन वाकळा आणि वाईट लोकस्ना मधमा देव ना बिगर दाग ना पोर बनेल राहा, [ जेस्ना मधमा तुमी जीवन ना वचन लिसन जग मा पेटत दिवा सारखा दिखतस] | 16 कि ख्रिस्त ना दिन मले गर्व कराना होवोत, कि नईत मन पयन आणि नईत मना कष्ट करण व्यर्थ हुईन | 17 आणि कदीचीत मले तुमना विश्वास ना अर्पण आणि सेवा ना साथ संगे आपला रक्त बी व्हावाळ पळस तरी बी मी खुश शे, आणि तुमी सगळास संगे ख़ुशी करस | 18 तसाच तुमी बी खुश व्हा, आणि मना संगे ख़ुशी करा|| 19 मले प्रभू येशू मा आशा शे, कि मी तीमथ्य ले तुमना जोळे लगेच धाळसू, एनासाठे कि तुमनी स्थिती आयकीसन मले शांती भेटो | 20 कारण कि मना जोळे असा स्वभाव ना कोणीच नई, जो शुध्द मन कन तुमनी चिंता करो | 21 कारण कि सर्वा आपला स्वार्थ ना शोध मा राहतस, नई कि येशू ख्रिस्त नि | 22 पण तेले त तुमनी पारखी आणि वयखी बी लीयेल शे, कि जसा पोऱ्या बाप संगे करस, तसच तेनी सुवार्ता पसरावा मा मना संगे कष्ट करेल शे | 23 त मले आशा शे, कि जस मले माहिती पळीन कि मनी काय स्थिती हुईन, तसाच मी तेले लगेच धाळी दिसू| 24 आणि मले प्रभू मा विश्वास शे, कि मी स्वता लवकर एसू | 25 पण मी इपफ्रदित ले जो मना भावू शे, आणि सहकारी आणि संगी योद्धा आणि तुमना दूत, आणि गरजन्या गोष्टीस्मा मनी सेवा कायम करणार शे, तुमना जोळे धाळण अवश्य समज | 26 कारण कि तेना मन तुमी सगळास्मा लागेल होता, एनामुळे तो चिंतामा राहत होता कारण कि तुमनी तेना आजार ना बारामा आयकेल होतात| 27 आणि खरज तो आजारी त हुईजायेल होता, आठ लगून कि मरावर होता, पण देव नि तेना वर दया करी; आणि फक्त तेनाच वर नई, ओं मना वर बी, कि मले दुख वर दुख नई होवोत| 28 एनाचसाठे नि तेले धाळाना आखो बी त्वरा करा कि तुमी तेले परत भेटीसन खुश हुईजावोत आणि मना दुख कमी हुईजावो | 29 एनासाठे तुमी प्रभूमा तेना संगे गैरा ख़ुशी मा भेट करज्यात, आणि असास्ना आदर कऱ्या करज्यात | 30 कारण कि तोच ख्रिस्त ना काम साठे आपला जीव धोकामा टाकीसन मरा जोक्ता हुईजायेल होता, एनासाठे कि जी कमी तुमना कळून मनी सेवा मा हुईनी, तिले पुरी करो ||