Colossians
कुलुस्सियों
1
1 पौल कळून, जो देव नि ईच्छा कण ख्रिस्त येशू ना प्रेषित शे, आणि भावू तीमथ्य कळून | 2 ख्रिस्त मा त्या पवित्र आणि विश्वासी भाऊ सना नाव जो कलस्से मा राहतस, आमना बाप देव कडून तुमले कुपा आणि शांती भेटत राहो || 3 आमी तुमना साठे नियमित प्रार्थना करीसन आपला प्रभू येशू ख्रिस्त ना बाप मणजे देव ना धन्यवाद करतस | 4 कारण आमनी आयकेल शे,कि ख्रिस्त येशू वर तुमना विश्वास शे,आणि सर्व पवित्र लोकसवर प्रेम ठेवस | 5 ती आशा करेल वस्तू ना कारण जी तुमना साठे स्वर्ग मा ठेवेल शे,जे ना वर्णन तुमी त्या सुसमाचार ना सत्य वचन मा आयकेल शे | 6 जे तुमना जवळ पोहचेल शे आणि तस जग मा भी फय लयता,आणि वाढत जास;मणजे ज्या दिन पासून तुमनी तेले आयक,आणि खरेपणा मा देव नि कृपा ओयखेल शे,तुमना भी असाच करतस | 7 तेनी सिक्षा तुमनी आमना प्रिय सहकर्मी इपफ्रास शी भेटन,जो आमना साठे ख्रिस्त ना विश्वासयोग्य सेवक श | 8 तेनीच तुमना प्रेम ले जो आत्मा मा शे आमना वर प्रकट करणा || 9 एनासाठे त्या दिन पासून हाई आयकेल शे,आमी भी तुमना साठे हाई प्रार्थना कराले आणि विनंती कराले नई चुकतस कि तुमी सर्व आत्मिक ज्ञान समज ना संगे देव नि इच्छा नि ओयख मा परिपूर्ण होई जाओ | 10 कारण तुमना चाल-चलन प्रभू ना योग्य होवो,आणि तो सर्व प्रकारने खुश हो,आणि तुमना मा चांगला प्रकार ना फय लागो,आणि देव नि ओयख मा वाढत चाला | 11 आणि तेनी महिमा नि शक्ती ना नुसार सर्व प्रकार नि सामर्थ्य शी बलवंत होत जावा,आठलोंग कि आनंद ना संगे सर्व प्रकार शी धीरज आणि सहनशीलता दाखाडी शको | 12 आणि बाप ना धन्यवाद करत राहा,जेनी आमले या योग्य बणाव कि उजाया मा पवित्र लोकसना संगे मिरास मा सहभागी हो | 13 तेनीच आमले अंधकार ना वश मधून सोडाईसन आपला प्रिय पुत्र ना राज्य मा प्रवेश करायेल शे | 14 जेना आमले छुटकारा मणजे पाप नि क्षमा प्राप्त होस | 15 तो तर अदृश्य देव ना प्रतिरूप आणि पूर्ण सृष्टी मा पयलाच श | 16 कारण तेनामाच सर्व वस्तू नि सृष्टी होयनी,स्वर्ग नि असो व पृथ्वी नि,देखेल व अनदेखेल,काय सिंहासन, काय प्रभूता,काय प्रधानता,काय अधिकार,सर्व वस्तू तेनाच द्वारे आणि तेनाच साठे रचेल शे | 17 आणि तोच सर्वा वस्तू मा प्रथम शे,आणि सर्व वस्तू तेनामाच स्थिर राहतस | 18 आणि तीच देह,मणजे मंडळी न डोक शे;तेच पयले शे आणि मरेल मधून जिवंत होणारे मा पायला नि सर्व गोष्ट मा तोच प्रधान ठरो | 19 कारण बाप ले हाई चांगल वाटण कि तेनामाच सर्व परीपूर्णता प्रवेश करो | 20 आणि तेना क्रूस वर वाहेल रक्ता ना द्वारे मेल-मिलीप करिसन,सर्व वस्तू ना तेनाच द्वारा शी आपला संगे मेल करी ले समजा ते पृथ्वी वरना हो,समजा स्वर्ग मधली | 21 आणि तेनी आते तेनी शारीरिक देह मृत्यु ना द्वारा तुमना भी मेल करी लिध ज्या पयले काडेल होतात आणि वाईट काम ना कारण मन शी शत्रू होतात | 22 कारण तरी भी तुमले आमना सम्मुख पवित्र आणि निष्कलंक,आणि निर्दोष बनाईसन उपस्थित करो | 23 जर तुमी विश्वास ना पाया वर दृढ बनी राहा,आणि त्या सुसमाचार नि आशा ले जेले तुमनी आयक सोडू नका,जेना प्रचार आकाश ना खाले सर्व सृष्टी वर करामा उना || 24 आते मी त्या दुख ना कारण आनंद करस,जो तुमना साठे उठस,आणि ख्रिस्त ना क्लेश नि कमी तेना देह ना साठे,मणजे मंडळी साठे,आपला शरीर मा पूर्ण करीदेस | 25 जेना मी देव त्या प्रबंध ना नुसार सेवक बनणु, जो तुमना साठेमाले सोपामा उन, कारण मी देव ना वचन ले पूर्ण पूर्ण प्रचार करू | 26 मणजे त्या भेद ले जो काहीकाळ पासून आणि पिढी शी गुप्त राहणा,पण आते तेसणा त्या पवित्र लोकसवर प्रकट होएल शे | 27 देव णी जेसनावर प्रकट करांनी इच्छा होती,कि तेसले ज्ञान हो कि अन्यजातीतून त्या भेद ना मूल्य काय शे ? आणि ते हाई शे,कि ख्रिस्त जो महिमा नि आशा शे तुमना मा राहस | 28 जजे ना प्रचार करीसन आमी प्रत्येक मनुष्य ले जताळी देतस,आणि सर्व ज्ञान शी मनुष्य ले सिखाड्तस,कि आमी प्रत्येक व्यक्ती ले ख्रिस्त मा सिद्ध करीसन उपस्थित करो | 29 आणि एनासाठे मी तेनी ती शक्ती ना नुसार जी मना मा सामर्थ्य ना संगे प्रभाव टाकस तन मन लाईसन मेहनत भी करस ||