2
1 ओ भावूसहोण, तुमाले माहिती शे कि आमन तुमना जोळे एवान व्यर्थ नई हुईन | 2 पण तुमी स्वता ले माहिती शे, कि पहिले पहिले फिलीपै मा दुख उचाला आणि त्रास सहा वर बी आमना देव नि आमले अशी हिम्मत दिधी, कि आमी देव नि सुवार्ता भारी त्रास होता तरी बी तुमले आयकाळनुत | 3 कारण कि आमना उपदेश नईत भ्रांती कन शे आणि नईत अशुद्धता कन, आणि नईत कपट कण शे | 4 पण जस देव नि आमले योग्य ठराई सन सुवार्ता सोपी, आमी तसाच वर्णन करतस; आणि इनामा मानसस्नि नई, पण देव ले, जो आमना मनस्ले तपासस, खुश करतस | 5 कारण कि तुमले माहिती शे, कि आमी नईत कदी आर्जवास्नि गोष्टी कऱ्या करत होतुत, आणि नईत लोभ साठे कपट करत होतु, देव साक्षी शे | 6 आणि कदाचित आमी ख्रिस्त ना प्रेषित होवा मुळे तुमना वर वजन टाकू सकतुत, तरी बी आमी मानसस कळून आदर नई देखतस, आणि नईत तुमना कळून, नईत आखो कोना पासून | 7 पण ज्या प्रमाणे आपली माय आपला पोरस्ना पायन- पोसण करस, तसाच आमी बी तुमना मधमा राहीसन सौम्यता दाखाळेल शे | 8 आणि तसाच आमी तुमनी लालूस करत, नईत फक्त देव नि सुवार्ता, पण आपला आपला जी बी देवाले तयार होतुत, एनासाठे कि तुमी आमना प्रेमय हुईजायेल होतात| 9 कारण कि, ओ भावूसहोण, तुमी आमना श्रम आणि कष्ट ले याद ठेवतस, कि आमी एनाच साठे रात दिन काम धंदा करत तुमना मा देव नि सुवार्ता प्रचार करा, कि तुमना मधून कोणा वर वजन नई येवो| 10 तुमी स्वता साक्षी शे: आणि देव बी, कि तुमना मधमा ज्या विश्वास ठेवतस आम्ही कशी पवित्रता आणि धार्मिक्ता आणि निर्दोषस्ता कन राहोत | 11 जस तुमले माहिती शे, कि जसा बाप आपला पोरस संगे वागस, तसाच आमी तुमना मधून प्रत्येक ले बी उपदेश करत, आणि शांती देत, आणि समजाळत होतात| 12 कि तुमन वागण देव ना योग्य होवो, जो तुमले आपला राज्य आणि महिमा मा बलावस | 13 एनासाठे आमी बी देव ले धन्यवाद कायम करतस; कि जव आमना व्दारे देव नि सुवार्ता ना वचन तुमना जोळे पोचणा, त तुमी त्या माणूस्ना नई, पण देव ना वचन समजीसन [ आणि खरज हय असच शे] स्वीकार कर: आणि तो तुमना मा जो विश्वास ठेवतस, प्रभावशाली शे| 14 एनासाठे कि तुमी, ओ भावूसहोण, देव ना त्या मंडळीस सारखा वागाले लागनात, जी यहुदिया मा ख्रिस्त येशू मा शे, कारण कि तुमनि बी आपला लोकस पासून तसाच दुख झेलेल शेतस, जस तेस्नी यहूदीया कळून झेलेल होतात| 15 जेस्नी प्रभू येशू ले आणि भविष्यवक्तास्ले बी मारी टाक आणि आमना छळ करा, आणि देव तेस्ना पासून खुश नई; आणि त्या सर्वा मानसस्वर छळ करतस | 16 आणि त्या दुसऱ्या जातीस कळून तेसणा तारक साठे गोष्टी करा पासून रोकतस, कि कायम आपला पापस्ना घळा भरत राहोत; पण तेस्ना वर भयानक राग ईपळेल शे || 17 ओ भावूसहोण, जव आमी थोळा टाईम साठे मन मा नई पण शरीर मा तुमना पासून आल्लग हुई जायेल होतुत, त आमी मोठा आशा कन तुमना चेहरा देखासाठे आखो जास्त प्रयत्न करा | 18 एनासाठे आमी[ म्हणजे- मी पौल नि] एक दार नई, पण दोन सावा तुमना जोळे येवाना देखणु, पण शैतान आमले रोकी ठेवणा | 19 बर आशा, आमनी ख़ुशी, अभिमान ना मुगुट काय शे? काय आमना प्रभू येशू ना समोर तेना येवाना टाईम ले तुमीच शेतस ना? 20 आमना अभिमान आणि ख़ुशी तुमीच शे||