3
1 एनासाठे आमले आखो बी नई रावायण, त आमी हय ठरावनुत कि अथेनैमा एखटाचथांबी जावूत | 2 आणि आमी तिमुथ्य ले जो ख्रिस्त नि सुवार्ता मा आमना भावू, आणि देव ना सेवक शे, एनासाठे धाळ, कि तो तुमले सरळ करो; आणि तुमना विश्वास ना बारामा तुमले समजाळो | 3 कि कोणी ह्या क्लेशस मुळे घाबरी नई जावो; कारण कि तुमले त माहिती शे, कि आमी एस्नाच साठे ठरावा मा एयेल शेतस | 4 कारण कि पहिले बी, जव आमी तुमना आठे होतुत, त तुमले सांग्या करत होतुत, कि आमले क्लेश उचना पळतीन, आणि असच हुईन, आणि तुमले माहिती बी शे | 5 एनामुळे जव मले आखो नई रावायन, त तुमना विश्वास नि हाल आयका साठे धाळ, कि कदी अस नई होवो, कि परीक्षा कारनारस्नि तुमनी परीक्षा लिधी हो, आणि आमना श्रम व्यर्थ हुईग्या हो | 6 पण आते तिमुथ्य नि जी तुमना जोळून आमना आठे ईसन तुमना विश्वास आणि प्रेम नि सुवार्ता आयकाळी आणि ह्या गोष्ट ले बी आयकाळ, कि तुमी कायम प्रेम मा आमले आठवण करतस, आणि आमले देखानी अशा करतस, जस आमी बी तुमले देखानी | 7 एनासाठे ओ भवूसहोण, आमी आपली पुरी आळचन मा आणि संकट मा तुमना विश्वास कन तुमना बारामा शांती भेटणी | 8 कारण कि आते तुमी प्रभू मा सीधा राहाश्यात त आमी जिंदा शेतस | 9 आणि जशी ख़ुशी आमले तुमना मुळे आपला देव समोर शे, तेना बदला मा तुमना बारामा आमी कोणत्या प्रकारे देव ना धन्यवाद करूत? 10 आमी रात दिन गैरी प्रार्थना करत राहातस, कि तुमना तोंड देखुत, आणि तुमना विश्वास नि कमी ले पुरी करुत || 11 आते आमना देव आणि बाप स्वताच आणि आमना प्रभू येशू, तुमना आठे येवासाठे आमनी निर्विघ्न करो | 12 आणि प्रभू असा करो, कि जसा आमी तुमना वर प्रेम करतस; तसाच तुमना प्रेम बी आपसा मा, आणि सर्वा मानसस संगे वाळो, आणि प्रगती करत जावो | 13 एनासाठे कि तो तुमना मनस्ले असा सरळ करो, कि जव आमना प्रभू येशू आपला पुरा पवित्र लोकस संगे ईन, त त्या आमना देव आणि बाप ना समोर पवित्रता मा निर्दोष ठरोत||