2
1 ओ भावूसहोण, तुमी आपला प्रभू येशू ख्रिस्त ना येवा, आणि तेना जोळे एकत्र होवाना बारामा तुमले विनंती करतस | 2 कि कोणती आत्मा, आणि वचन, आणि पत्र व्दारे जे कि आमना कळून, हय समजी सन कि प्रभू ना दिन ईजायेल शे, तुमना मन अचानक चित्तस्थैर्य नका व्हा; आणि नईत तुमी घाबरा | 3 कोण्या प्रमाणे धोकामा नका एयज्यात कारण कि तो दिन नई येवाव, जठ लगून धर्म ना त्याग नई हुईजास, आणि तो पाप ना माणूस म्हणजे- विनाश ना पोऱ्या समोर नई ईजास | 4 जो विरोध करस, आणि प्रत्येक ले जो देव वर, आणि पूज्य म्हणावस, स्वता ले मोठा ठरावास, आठ लगून कि तो देव ना मंदिर मा बठीसन स्वता ले देव म्हनुसन प्रगट करस | 5 काय तुमले आठवण नई, कि जव मी तुमना आठे होतु, त तुमले ह्या गोष्टी सांग्या करत होता? 6 आणि आते तुमी त्या वस्तुसले वयखतस, जी तेले रॉकी रायनी, कि तो आपलाच टाईम मा प्रगट होवो | 7 कारण कि अधर्म नि गुज[ भेद] आते लगून काम करत करीरायना, पण आते एक रोकणार शे, आणि जठ लगून तो दूर नई हुईजास, तो रोकेल राहीन | 8 तव तो अधर्मी प्रगट हुईन, जेले प्रभू येशू आपला तोंडणी फुक कन मारी टाकीन, आणि आपला येवाना तेज कन राक करी टाकीन | 9 त्या अधर्मी न येन शैतान ना काम ना प्रमाणे सगळ्या प्रकार नि खोटी सामर्थ, आणि चिन्ह, आणि अध-भूत कामस कन हुईन | 10 आणि नाश होणारस साठे अधर्म ना सगळा प्रकारना धोकास संगे हुईन; कारन कि तेस्नी सत्य ना प्रेम ले नई स्वीकार जेना कन तेसणा तारण होस | 11 आणि ह्याच मुळे देव तेस्ना मा एक भ्रांती नि सामर्थ ले धाळीन एना साठे कि त्या असत्य वर विश्वास ठेवोत | 12 आणि जीतला लोक सत्य वर विश्वास नई ठेवतस, आणि अधर्म वर खुश होतस, सर्वासले दंड भेटीन | 13 पण ओ भवूसहोण, आणि प्रभू ना प्रेमय लोकसहोण अस होवो कि आमी कायम तुमना बारामा देव ले धन्यवाद करत राहो, कि देव नि पहिले पासून तुमले निवाळी लेयेल शे; कि आत्मा नां व्दारे पवित्र बनिसन, आणि सत्य वर विश्वास ठेविसन तारण लीलेवोत| 14 जेनासाठे तेनी तुमले आमनि सुवार्ता व्दारे बलाव, कि तुमी आमना प्रभू येशू ख्रिस्त नि माहिमा ले लीलेवोत | 15 एनासाठे, ओ भावूसहोण, सरळ, आणि ज्या ज्या गोष्टी तुमनि काय वचन, काही पत्र व्दारे आमना पासून शिकेल शेतस, तेसले धरी टेवा | 16 आमना प्रभू येशू ख्रिस्त स्वता, आणि आमना बाप देव जेनी आमना संगे प्रेम ठेव, आणि कृपा कन कायम नि शांती आणि चांगली आशा दियेल शे | 17 तुमना मनस्मा शांती देवो, आणि तुमले प्रत्येक चांगला काम, आणि वचन मा पक्का करो ||