5
1 कोणत्या धल्ला ले नको धमकाऊ, पण तेले बाप जानिसन समजावी दे, आणि जवान ले भाऊ जानिसन;धल्ली बाई ले माय जानीसन | 2 आणि जवान बै ले पूर्ण पवित्रताशी भिन जानिसन समजावी दे | 3 त्या विधवासले ज्या खरोखर विधवा शे आदर कर | 4 आणि कोणती विधवा ना पोर-पार व नातू-पणतू शे, तर त्या पयले आपलाच घराणा ना सांगे भक्ती ना वागणूक करज्या, आणि आपला माय-बापसले तेसणा हक देवाले सिखा, कारण हाई देव ले आवडस | 5 जी खरोखर विधवा शे, आणि तेना कोणीच नई,; ती देव वर आशा ठेवस, आणि रात-दिन विनंती आणि प्रार्थना मा लौलीन राहस | 6 पण जी भोगविलास मा पडेल शे, ती जिवंत राहीसन भी मरेल शे | 7 या गोष्टी नि भी आज्ञा देत राह, कारण त्या निर्दोश राहो | 8 पण जर कोणी आपला ना कडे नीज करीसन आपला घराना नि चिंता नई करस,तर तो विश्वास शी फिरी जाएल शे, आणि अविश्वासी शी भी जास्त वाईट बनी जाएल शे | 9 तीच विधवा न नाव लीखामा येवो, जी साठ वर्षा पेक्षा कमी नई पायजे, आनि एकच नवरा नि नवरी पायजे | 10 आणि चांगला काम मा सुनाव राहेल पायजे, जिने पोरसना पालन पोषण करेल असो; पाहुणासनी सेवा करेल असो,पवित्र लोकसना पाय धोयेल असो, दुखीसनी मदत करेल असो, आणि प्रत्येक चांगला काम मा मन लावेल असो | 11 पण जवान विधवा न नाव नई लिखाण, कारण जव त्या ख्रिस्त ना विरोध करिसन सुख-विलास मा पडी जातस, तर लगन करांनी इच्छा राहस | 12 आणि दोशी ठरस, कारण तेसनी आपला पयला विश्वास ले सोडी दियेल शे | 13 आणि येणा संगे संगे ती घर घर फिरीसन आळशी होवाले सिखास,आणि फक्त आळशी नई, पण बकबक करत राहस आणि दुसरा ना काम मा हात भी टाकस आणि अनुचित गोष्टी भी बोलस | 14 एनासाठे मी हाई इच्छितो, कि जवान विधवा लगन करा,आणि पोरसले जन्म दिसन आणि घर बार सांभाळा, आणि कोणताच विरोधी ले बदनाम कराना मोका नका दया | 15 कारण कोणी एक तर बहकीसन शैतान ना मांगे चालनी जाएल शे | 16 जर कोणती विश्वासनी ना आडे विधवा अशीन, तर तीच तेनी मदत करा, कि मंडळी वर भार नई होवो कारण त्या तेनी मदत करू शकस, जे खरोखर विधवा शे | 17 जे वडील लोक चांगल प्रभंद करतस, विशेष करिसन त्या ज्या वचन आयकावतस आणि सिखाडा मा मेहनत करतस,दोन गुणा आदर ना योग्य मानामा इन | 18 कारण पवित्र शास्त्र सांगस, कि जोतनारा बईल ना तोंड नई बांधान, कारण मजूर आपली मजुरी ना हकदार शे | 19 कोणता दोष कोणी वडील लोक वर लावामा एस तर विना दोन व तीन साक्ष नि तेले नई आयक | 20 पाप करनाराले सर्वा समोर समजवा, कारण आजून लोक घाबरतीन | 21 देव, आणि ख्रिस्त येशू, आणि निवाडेल देवदूत ले उपस्थित जानिसन मी तुले चेतावणी देस कि तू मन उघाडीसन या गोष्टी ले मानत जा, आणि कोणतही काम पक्षपात शी करू नको | 22 कोणावर लवकर हात नको ठेवू आणि दुसरा ना पाप मा भागी नको होयजो : स्वताले पवित्र बनाविसन ठेव | 23 भविष्य मा फक्त पाणीच पेनारा नकोराहू, पण आपला पेट ना आणि आपले घळी-घळी आजारी होवान कारण थोडा थोडा द्राक्ष्यरस भी काम मा अंत जा | 24 कितला मनुष्य ना पाप होई जातस, आणि न्याय ना साठे पयले पोह्ची जातस, आणि कितलाक मांगून येतस | 25 तसाच कितलाक चांगला काम भी प्रकट होतस, आणि ज्या असा नई होतस, त्या भी दपु नई शकतस |