2
1 एनासाठे हे मना पुत्र, तू त्या कृपाशी जो ख्रिस्त येशू मा शे,बलवंत होई जा | 2 आणि ज्या गोष्टी तुनी गैरा साक्ष ना समोर मना कडून आयक,तेसले विश्वासी लोकसले सोपी दे; जे दुसरा ले भी सिखाडा ना योग्य असो | 3 ख्रिस्त येशू ना चांगला योद्धाना सारखा मना संगे दुख उचल | 4 जव कोणी योद्धा लढाई वर जास,तर एनासाठे कि आपला भरती करनाराले खुश करो,स्वताले संसार ना काम नई फसावस | 5 मंग आखाडा मा लढाई करणारा जर विधी ना नुसार नई लढायस तर मुकुट नई भेटस | 6 जो घर मा मेहनत करस,फय ना अंश पयले तेलेच भेटाले पायजे | 7 जे मी सांगस तेना वर ध्यान दे आणि प्रभू तुले सर्व गोष्ट नि समज दिन | 8 येशू ख्रिस्त ले स्मरण ठेव,जो दाऊद ना वंश तून होयना,आणि मरेल मधून जिवंत होयना; आणि हाई मना सुसमाचार ना नुसार शे | 9 जेना साठे मी कुकर्मी सारखा दुख उचलणू, आठ लोंग कि कैद भी शे;पण देव ना वचन कैद नई | 10 या कारण मी निवाळेल लोकस्ले साठे सर्व काही सहन करीलेस,कि त्या भी त्या उद्धारले जो ख्रिस्त येशू मा शे अनंत जीवन ना संगे ल्या | 11 है गोष्ट खरी शे, कि जर आमी तेना संगे मरी जाएल शे तर तेना संगे जिवंत होयसू | 12 जर आमी धीरज शी शन करत राह्सू,तर तेना संगे राज्य भी करसू: जर आमी तेना नकार देसू तर तोभी आमना नकार दिन | 13 जर आमी अविश्वासी भी शे तरी भी तो विश्वासयोग्य बनेल राहस,कारण तो स्वताना नकार नई देवू शकस || 14 या गोष्टी नि स्मरण तेसले दे,आणि प्रभू ना समोर चेतावणी दे,कि शब्द वर तर्क-वितर्क करू नका,जेनाशी काही लाभ नई होत;पण आयकनारा बिगडी जास | 15 स्वताले देव ना ग्रहणयोग्य आणि असा काम करणारा ठरावाना प्रयत्न करा,जो लज्जित नको होवाले पायजे,आणि जो सत्य ना वचन ले चांगल्या प्रकारे काम मा लयस | 16 पण अशुद्ध बोलावर वाचीसन राह;कारण असा लोक आजून भी अभक्ति मा वाढत जातीन | 17 आनि तेसन वचन सळेल घाव ना सारख पसरत जाईन: हुमीनयुस आणि फिलेतूस तेसणा मधूनच शे | 18 जो हाई सांगीसन कि पुनरुत्थान होई जाएल शे सत्य शी भटकी जाएल शे,आणि कितलाक ना विश्वास ले उलट पलट करी देतस | 19 तरी भी देव ना पक्का पाया राहस,आणि तेना वर हाई छाप लागेल शे,कि देव आपलासले ओयखस;आणि जोकोनी प्रभू न नाव लेस,तो अधर्म शी वाचीसन राहो | 20 मोठा घर मा नई फक्त सोन-चांदीच ना,पण काठ आणि माती नाभी भांडा राहतस; कोणता कोणता आदर कोनता कोणता अनादर नासाठे | 21 जर कोणी स्वताले येसणा शी शुद्ध करीन,तर तो आदर ना भांड,आजून पवित्र ठरीन;आणि स्वामी ना काम मा ईन,आणि प्रत्येक चांगला काम ना साठे तयार होईन | 22 जवानी नि अभिलाशाशी पय;आणि शुद्ध मन शी प्रभू न नाव लेस,तेसणा संगे धर्म आणि विश्वास,आणि प्रेम,आणि मेल मिलाप ना मांगे चाल | 23 पण मूर्खता आणि अविध्या ना विवाद शी अलग राहा; कारण तुले माहित शे,कि तेसणा शी झगळा होतस | 24 आणि प्रभू ना दसले लडाकू नको पायजे,पण सर्वा ना संगे कोमल आणि शिक्षा मा निपुण,आणि सहनशील हो | 25 आणि विरोधीयाले नम्रता शी समजाळा, काय माहित देव तेसले मन फिराव ना मन दिन कि, त्या भी सत्य ले ओयखे | 26 आणि एना द्वारे एनी इच्छा पूर्ण करासाठे सावधान होईसन शैतान ना फंदा मधून सुटी जावा ||