3
1 पण हाई समजीले,कि शेवट ना दिन मा कठीण दिन येतीन | 2 कारण मनुष्य अपस्वार्थी, लोभी, डिंगमार, अभिमानी, निंदक, माय-बाप नि आज्ञा न मानणार, कृतघ्न, अपवित्र | 3 मयारहीत, क्षमारहित, दोष लावणारा, असंयमी, कठोर, चांगला ना शत्रू | 4 विश्वासघाती, ढीठ, घमंडी, आणि देव ना नई पण सुखविलास लेच पसंद करणारा होतीन | 5 त्या भक्ती ना वेस तर धरतीन, पण तेनी शक्ती ले नई मानाव;असा तून दूर राहज्यात | 6 एसना मधूनच त्या लोक शे,ज्या घर मा चोरीकन घुसी एस आणि त्या छीछोऱ्या बाईसले वश मा करी लेतस, ज्या पाप शी दाबाएल आणि सर्व प्रकार नि अभिलाषा नि वश मा शे | 7 आणि सदर सिखत तर राहस पण सत्य नि ओयख लोंग नई भिळस | 8 आणि जसा यन्नेस आणि यम्ब्रेस नि मुसा ना विरोध करेल होतात तसाच याभी सत्य ना विरोध करतस: या तर असा मनुष्य शे, जेसनी बुद्धी भ्रष्ट होइजाएल शे आणि त्या विश्वास ना विषय मा आळशी शे | 9 पण त्या एना पुढे नई जावू शकत, कारण जशी तेसनी अज्ञांनता सर्व मनुष्य वर प्रकट होई जाएल होती, तशीच एसनी भी होइजाइन | 10 पण तुनी उपदेश, चाल- चलन, मनसा, विश्वास, सहनशीलता, प्रेम, धीरज, आणि त्रास होएल, आणि दुख उचलाले मना साथ दिधा | 11 आणि असा दुख मा भी जे अन्ताकीया आणि इकुनियुम आणि लुस्र्ता मा मनावर पडेल होतात आणि आजून दुख मा भी, जे मिनी उचलेल शे; पण प्रभू नि माले तेना मधून सोडवी लिध | 12 पण जीतला ख्रिस्त येशू मा भक्ती मा जीवन जीवाना चाहतस त्या सर्वा वर त्रास होईन | 13 आणि दृष्ट, आणि बहकावनारा धोका देत जाईन, आणि धोका खात जाईन,बिगडत चालना जाईन | 14 पण तू या गोष्टी वर जे तुनि सिखेल शे आणि विश्वास करेल होतात, हाई जानिसन दृढ बनी रायना :कि तुनी तेसले कोणता लोकसवर सिखेल होता ? 15 आणि धाकला पणापासून पवित्र शास्त्र तू न जाणेल शे,जो तुले ख्रिस्त वर विश्वास करावर उद्धार प्राप्त करासाठे बुद्धिमान बनावू शकस | 16 सर्व पवित्र शास्त्र देव नि प्रेरना शी रचेल शे आणि उपदेश, आणि समजावान,आणि सुधाराण, आणि धर्म नि शिक्षा ना साठे लाभदायक शे | 17 कारण देव ना जन सिद्ध बनोत, आणि सर्व चांगला काम साठे तप्तर राहो ||