8
1 आते ज्या गोष्टी आमी करी रायनुत, तेनामा मोठी मोठी गोष्ट हाई शे, कि आमना असा महायाजक शे, जो स्वर्ग वर महामंमहीमन ना सिंहासन ना उजवा बाजू जाई बसणा | 2 आंनी पवित्र स्थान आणि त्या खरा तंबू ना सेक होयना, जेले कोणी मनुष्य नि नई, पण प्रभू नि उभा करेल होता | 3 ,कारण प्रत्येक महायाजक भेंट,आणि बलिदान चढावाना साठे ठरावा मा एस, या कारण आवश्य शे कि येणा कडे भी काही चढावा साठे राहो | 4 आणि जर पृथ्वीवर रायता तर कधी याजक नई बनता, एनासाठे कि व्यवस्था ना नुसार भेंट चढाव नारा तर शे | 5 ज्या स्वर्ग मधली वस्तू ना प्रतिरूप आणि प्रतिबिम्ब नि सेवा करतस, जसा जव मोशे तंबू बनावा वर होता, तर तेले है चेतावणी भेटनी, कि देख जो नमुना तुले पहाड वर दाखाडा मा एल होत, तेना नुसार सर्व काही बनाव | 6 पण तेले तेना सेवकाई पेक्षा जास्त भेटनी, कारण तो आजून भी उत्तम करार ना मध्यस्थ ठरणा, जी आजून भी उत्तम प्रतिज्ञा ना सहाराशी बांधामा एल शे | 7 कारण जर ती पयला करार निर्दोष रायता, तर दुसरा साठे वेळ नई झामलामा येत | 8 पण तो तेसणा वर दोष लाईसन सांगस, कि प्रभू सांगस, देखा त्या दिन येतस, कि मी इस्र्ताइल ना घराना ना संगे, आणि यहूदा ना घराणा ना संगे नवीन करार करसू | 9 हाऊ त्या करार ना सारखा नई शे, जी मिनी तेसणा बाप लोक ना बरोबर त्यावेळी बांधेल होता,जव मी तेना हात धरीसन तेसले मिसर देश मधुन काळी लयणा, कारण त्या मना करार वर स्थिर नई रायनत, आणि मिनी तेसले स्मरण नई कर, प्रभू हाईच सांगस | 10 मंग प्रभू सांगस, कि जो करार मी त्या दिन ना नंतर इस्र्ताइल ना घराना ना सांगे बांधसू हाई ते शे, कि मी आपली व्यवस्था ले तेसणा मन मा टाकसू, आणि तेले तेसणा हृद्य वर लिखसू, आणि मी तेस्ना देव ठरसू, आणि त्या मना लोक ठरतीन | 11 आणि प्रत्येक आपला देश ना आणि आपला भाऊ ले हाई शिक्षा नई देवाव, कि तू प्रभू ले ओयख कारण धाकला पासून तर मोठा लोंग सर्वा माले ओयखी लेतीन | 12 कारण मिनी तेसणा अधर्म ना विषय मा कृपाळू होयसू, आणि तेसणा पाप ले परत स्मरण नई कराव | 13 नव करार ना स्थापना शी तेनी पयला करार ले जुना ठराव आणि जी वस्तू जुनी आणि जीर्ण होई जास तेन नष्ट होई जावान पक्क शे ||