10
1 कारण व्यवस्था जेनामा येणारी चांगली वस्तूंनी प्रतिरूप शे, पण तेसणा असली रूप नई, एनासाठे त्या एकच प्रकार ना बलिदान ना द्वारा, जी दर वर्षी अचूक चढावा मा एस, जवळ येनाराले कधीच सिद्ध नई करु शकस | 2 नई तर तेसणा चढवाना बंद काबर नई होस ? एनासाठे कि जव सेवा करणारा एकच सावा मा होई जातस, तर मंग तेसणा विवेक तेसले पापी नई ठरावता | 3 पण तेसणा द्वारा दर वर्षी पाप ना स्मरण होत राहस | 4 कारण आवघळ शे, कि बईल आणि बकरा ना रक्त पाप ले दूर करो | 5 या कारन तो जग मा येवाना वेळी सांगस, कि बलिदान आणि अर्पण तनी नई लिध, पण मना साठे एक देह तयार रणा | 6 होम-बली आणि पाप-बली शी तू खुश नई होयना | 7 तव मनी सांग, देख, मी इजायेल शे, ( पवित्र शास्त्र मा मना विषय मा लिखेल शे )कारण हे देव तुनी इच्छा पूर्ण करू | 8 वरे तर तो सांगस, कि नई तुनी बलीदान आणि अर्पण आणि होम-बली आणि पाप-बली ले चाह,आणि नई तेसनाशी खुश होयना; कदाचित या बलिदान तर व्यवस्था ना नुसार चढावा मा एस | 9 मंग हाई भी सांगस, कि देख, मी इजाएल शे, कारण तुनी इच्छा पूर्ण करू; पण तो पयलाले उचली लेस, कारण दुसराले नियुक्त करोत | 10 तीच इच्छा शी आमी येशू ख्रिस्त नि देह ना एकच सावा बलिदान चढावा जावाना द्वारे पवित्र करेल शे | 11 आणि हरेक याजक तर उभा राहीसन दर रोज सेवा करस, आणि एकच प्रकार ना बलिदान ले जो पाप ले भी दूर नई करू शकत; घळी घळी चढावतस | 12 पण हाऊ मानुस तर पाप ना बदला मा एकच बलिदान सर्वदा ना साठे चढावीसन देव ना उजवा बाजू जाइबसना | 13 आणि त्याच वेळी पासून तेना रस्ता देखी रायनु, कि तेना शत्रू तेना पाय ना खालनि पिढी बनो | 14 कारण तेनी एकच चढावा ना द्वारे तेसले ज्या पवित्र करामा येतस, सर्वदा साठे शुद्ध करी दियेल शे | 15 आणि पवित्र आत्मा भी आमले हाई साक्ष देस; कारण तेनीच पयले सांगेल होता 16 कि प्रभू सांगस; कि जो करार मी त्या दिन नंतर तेसणा शी बांधसू ती हाई शे कि मी आपली व्यव्स्थाले तेसणा हृद्य वर लिखसू आणि मी तेसणा विवेक मा टाकसू | 17 ( मंग तो हाई सांगस, कि )मी तेसणा पाप ले, आणि तेसणा अधर्म ना काम ले मंग कधी स्मरण नई कराव | 18 आणि मंग एसनी क्षमा होई जाएल शे, तर मंग पाप ना बलिदान नई रायना || 19 तर हे भाउसाहोन, जव कि आमले, येशू ना रक्ता ना द्वारा त्या नवीन आणि जीवित रस्ता शी पवित्र जागा मा प्रवेश करानि हिम्मत होई जाएल शे | 20 जो तेनी परदा मणजे आपला शरीर मधून, आमना साठे अभिषेक करेल शे | 21 आणि एनासाठे कि आमना असा महान याजक शे, जो देव ना घर ना अधिकारी शे | 22 तर या; आमी खरा मन,आणि पूर्ण विश्वास शी,आणि विवेक ना दोष दूर करा साठे हृद्य वर छीडकाव लिसन, आनि देह ले शुद्ध न पाणी शी धुइसन देव ना समोर जावूत | 23 आणि आपला आशा ना अंगीकार ले ताकत शी धरी ठेवू; कारण जेनी शेप्पत लीएल शे,तो खरा शे | 24 आणि प्रेम, आणि चांगला काम मा उत्साहित करा साठे एक दुसराणी चिंता करत राहा | 25 आणि एक दुसाराना संगे एकत्र होवान सोडू नका, जसा कि कितलाक ना प्रकार शे, पण एक दुसाराले समजत राहा, आणि ज्या ज्या त्या दिन ले जवळ येत देखतीन तर तर आजून भी हाई करत राहा | 26 कारण खरापनानि ओयख प्राप्त कराना नंतर जर आमी जानी बुजीसन पाप करत रायनत, तर पाप ना साठे मंग किताच बलिदान बाकी नई | 27 हा, दंड ना एक भयानक वाट देखज्यात आणि आग ना ज्वलन बाकी शे, जो विरोधिले भस्म करिदिन | 28 जव कि मोशे नि व्यवस्थाले नई मानणारा दोन व तीन जनसनी साक्ष वर, बिगर दया कराना मारी टाका मा एस | 29 तर विचार करील्या कि तो कितला आजून भी भारी दंड ना योग्य ठरीन, जेनी देव पुत्र ले पाय वर कुचर,आणि करार ना रक्त ले जेना द्वारा तो पवित्र ठरेल होता, अपवित्र आणेल शे, आणि कृपानि आत्मा ना अपमान करेल शे | 30 कारण आमले तो माहित शे, जेनी सांग, कि बदला लेवाना मना काम शे मीच बदला दिसू:आणि आणि मंग हाई, कि प्रभू आपला लोकस ना न्याय करीन | 31 जिवंत देव ना हात मा पडान भयानक गोष्ट शे | 32 पण त्या पयला दिनसले स्मरण करा, जेना मा तुमी उजाय लिसन दुखना मोठा झमेला मा स्थिर राहणत | 33 काही तर असा, कि तुमी निंदा, आणि ल्केश सहन करतांना तमाशा बननात,आणि काही असा कि तुमी तेसणा भागी होयनात जेसनी दुर्दशा करामा येत होती | 34 कारण तुमी कैदी ना दुख मा भी दुखी होयनत, आणि आपली संपत्ती भी ख़ुशी मा लुटू दिधी; हाई जानिसन कि तुमना कडे एक आजून भी उत्तम आणि सर्वदा थांबणारी संपत्ती शे | 35 तर आपली हिमंत सोडू नका,कारण तेना प्रतीफय मोठा शे | 36 कारण तुमले धीरज धरान आवश्य शे, कारण देव नि इच्छा पूर्ण करीसन तुमले प्रतिज्ञा ना फय भेटो | 37 कारण आते गैरा कमी वेळ बाकी शे जव कि येणारा येयीन, आणि उशिरा नई होवाव | 38 आनि मना धर्मी जन विश्वास शी जिवंत राहीन, आणि जर तो मांगे वसरी जास तर मना मन तेना शी खुश नई होवाव | 39 पण आमी हालणारा नई शे, कि नाश होई जाऊ पण विश्वास करणारा शे, कि जीव ले वाचाळू ||