3
1 ओ मना भावूसहोण, तुमना मधुन जास्त शिक्षक नका बना, कारण कि माहिती शे, कि आमी शिक्षकस्वर आखो बी जास्त दोषी ठरसुत | 2 एनासाठे कि आमी सगळा गैरा सावा चुकी जातस: जो कोणी वचन मा नई चुकत, तो त सिद्ध माणूस शे; आणि पुरा शरीर वर बी नियंत्रण ठेवू सकस | 3 जव आमी आपला नियंत्रण मा करा साठे घोळा ना तोंड मा लगाम लावतस, त आमी तेसणा पुरा शरीर ले बी फिराई सकतस | 4 देखा, जहाज बी कदाचित ईतला मोठा राहातस, आणि गैरी हवा कन चालावा मा एस, तरी बी एक लहान शी सुकाण ना व्दारे सुकानदार ना ईच्छा प्रमाणे फिरावामा एस | 5 जशीच जीप बी एक लहान सा आंग शे आणि मोठ्या मोठ्या हुशारक्या मारस: थोळीच विसतो कन कितला मोठा जंगल मा आग लागी जास | 6 जीप बी एक आग शे: बी आमना आंग मा अधर्म ना एक लोक शे आणि पुरा शरीर वर कलंक लावस आणि भाव चुक्र ना आग लाई देस आणि नरग कुंडा नि आग कन पेटस राहास | 7 कारण कि प्रत्येक प्रकारना वन पशु- पक्षी आणि सरपट नारा जंतू जलस्थर त माणूस जात ना आधीन हुई सकतीन आणि हुई बी जायेल शेतस | 8 पण जीप ले माणूस मधून कोणीच आधीन मा नई करी सकस; ती एक अशी दृष्ट शे जी कदीच थांबतसच नई; ती प्राण घातक आणि विष कन भरेल शे | 9 एनाच कन आमी प्रभू आणि बाप नि स्तुती करतस; आणि एनाच कन मानसस्ले बी ज्या देव ना स्वरूप मा उत्तप्न हुयेल शेतस श्राप देतस | एकच तोंड कन धन्यवाद आणि श्राप दोन्ही निघतस | 10 एकच तोंड कन धन्यवाद आणि श्राप दोन्ही निघतस | 11 ओ मना भावूसहोण, अस नई हुवाले पाहिजे | 12 काय झरा ना एकच तोंड कन गोळ आणि खारा पाणी दोन्ही निघी सकिन? ओ मना भावूसहोन, काय अंजीर ना झाळ वर जैतून, आणि द्राक्ष नि फांदी ले अंजीर लागतीन का? तसाच खारा झरा मा गोळ पाणी नई निघू सकस || 13 तुमना मा न्यांनी आणि समजदार कोण शे? जो असा शे तो आपला कामस्ले चांगला वागीसन त्या नम्रता कन प्रगट करो जी न्यान कन उत्तप्न होस | 14 पण कदी तुमी आपला आपला मन मा काळवी तीव्र मत्सर आणि विरोध ठेवतस, त सत्य ना विरोध मा गर्व नका करज्यात, आणि नई त खोत बोलज्यात | 15 हवू न्यान तो नई, जो वरून एस पण संसारिक, आणि शारीरिक, आणि सैतानी शे | 16 एनासाठे कि जठे मत्सर आणि विरोध राहास, तठे अव्यवस्था आणि प्रत्येक प्रकार ना कुकर्म रहातस | 17 पण जो न्यान वरून एस तो पहिले त पवित्र राहास नंतर शांतीप्रिय, सौम्य, समजूत होवा सारख, दया आणि सत्फले एस्ना कन पुरा भरेल आणि अपक्षपाती आणि निर्दभ असा शेतस | 18 आणि शांतता करा साठे धार्मिकता ना फय शांतपणा मा पेरामा एतस ||