2
1 एनासाठे सर्वा प्रकार ना दुष्टभाव आणि कपट, ढोंग आणि हेवा आणि दुरभाषणस्ले दूर करीसन | 2 नवा जल्मेल पोऱ्या सारखा निर्मय आत्मिक दुध नि ईच्छा कर, एनासाठे कि तेना व्दारे तारण भेटा मुळे वाळत जावा | 3 कदी तुमी प्रभू नि कृपा ना सवाद चाखी लीयेल शे | 4 तेना जोळे ईसन, जेले मानसस्नि त बिगर काम ना ठरावा, पण देव ना जोळे निवाळेल, आणि मूल्यवान जित्ता दघळ शे| 5 तुमी बी स्वता जित्ता दघळ सारखा आत्मिक घर बनत जातस, जेना कन याजकस्नापवित्र समाज बनिसन, असा आत्मिक यज्ञ करा, जो येशू खिस्त व्दारे देव ले स्वीकार होवो| 6 एना मुळे पवित्र शास्त्र मा बी एयेल शे, कि देखा, मी सियोन ना मूल्यवान कोनशीला शे; आणि जो कोणी त्या कोनशीला वर विश्वास ठेईन, तो कोणत्याच प्रकारे फजित नई हुवाव | 7 त तुमना साठे ज्या विश्वास करतस, तो त मोल्यवान शे, पण ज्या विश्वास नई करतस तेसणा साठे ज्या दघळ ले राज मिस्त्रीस्नि बिगर काम ना ठरायेल होतात, तोच कोनशीला हुईग्या | 8 आणि ठेस लागणा दघळ आणि धोंडा आणि अळखळाना खळक हुईग्या: कारण कि त्या त वचन ले नई मानी सन ठोकर खातस आणि ह्याच साठे त्या ठरावामा बी एयेल होतात| 9 पण तुमी एक निवाळेल वंश, आणि राज-पद धारी, याजकस्ना समाज, आणि पवित्र लोक, आणि [देव ना ] स्वता ना लोक शेतस, एनासाठे की जेनी तुमले अंधार मधून आपली अतभूत- उजाया मा बलायेल शे, तेना गुण प्रगट करोत| 10 तुमी पहिले त काहीच नई होतात, पण आते देव ना लोक शेतस: तुमना वर दया नई हुयेल होती पण आते तुमना वर दया हुयेल शे || 11 प्रियसहोण मी तुमले विनंती करस, कि तुमी स्वता ले बाहेर देश ना आणि प्रवासी समजी सन त्या संसारिक ईच्छास पासून जी आत्मा संगे युद्ध करस, वाचेल राहा| 12 दुसऱ्या जातीस्मा तुमन वागण चांगल राहा; एनासाठे कि ज्या ज्या गोष्टीस्मा त्या तुमले वाईट समजीसन तुमना बारामा वाईट बोलतस, त्या तुमना चांगला कामस्ले देखीसन; तेसणाच मुळे कृपा दृष्टी ना दिन देव नि महिमा करोत | 13 प्रभू ना साठे माणूस ना ठरायेल प्रत्येक नियम ना आधीन राहा, राजा ना एनासाठे कि तो सर्वास्वर श्रेष्ठ शेतस | 14 आणि अधिकारीस्ना, कारण कि त्या वाईटस्ले दंड देवाले आणि चांगल करणारस्नि स्तुती करा साठे तेना धाळेल शेतस | 15 कारण कि देव नि ईच्छा हय शे, कि तुमी चांगला काम करा मुळे बिगर बुद्धी ना लोकस्नी अन्यान न्या गोष्टीसले बंद करी देवोत| 16 आणि स्वता ले मुक्त समजोत पण आपली हय स्वतंत्रता ले वाईट साठे आळ नका बनावज्यात, पण स्वता ले देव ना दास समजीसन वागा | 17 सर्वास्ना आदर करा, भावूस कण प्रेम ठेवा, देव ले भ्या, राजा ना मान ठेवा|| 18 सेवकसहोण, हर प्रकार नि भीती कन आपला मालकस्ना आधीन राहा, नईत फक्त चांगल्या सनी नम्र ना, कठोर ना बी | 19 कारण कि कदी कोणी देव ना विचार करीसन अन्याय कन दुख भोगीत क्लेश सहस, त हय सौम्य शे | 20 कारण कि कदी तुमना अपराध करीसन घुसा खास आणि धीर धरा, त तेना मा काय चांगली गोष्ट शे? पण कदी चांगल काम करीसन दुख भोगतस आणि धीर धरतस, त हय देव ले आवळस | 21 आणि तुमी एनाच साठे बलावामा बी एयेल शेतस कारण कि ख्रिस्त बी तुमना साठे दुख भोगीसन, तुमले एक उदाहरण दि जायेल शे, कि तुमी बी तेनाच चिन्ह वर चालोत| 22 नईत तेनी पाप करा, आणि नईत तेना तोंड कन कपट ना गोष्टी निघनात | 23 तो गाया आयकीसन गाया नई देत होता, आणि दुख झेलीसन कोले बी नई देत होता, पण स्वता ले खरा न्यायी ना हात मा सोपत होता| 24 तो स्वता आमना पापस्ले आपला शरीर वर लीसन ख्रूस वर चळी ग्या जेना कन आमी पापसाठे मरीसन धार्मिकता ना साठे जीवन जगोत: तेनाच मार खावा मुळे तुमी बरा हुईनात | 25 कारण कि तुमी त पहिले दवळेल मेंढी सारखा होतात, पण आते आपला जीव ना राखोया आणि अध्यक्ष ना जोळे परती एयेल शेतस |