3
1 ओ बायकासहोण, तुमी बी आपला नावरास्ना आधीन मा राहा || 2 एनासाठे कि कदी एस्ना मधून कोणी असा राहोत जो वचन ले नई मानत हो, तरी बी तुमनी भीती नि पवित्र वागणूक देखीसन बिगर वचन सांगान आपली आपली बायको ना वागणूक व्दारे वळाईजावो | 3 आणि तुमना सिंगार, देखाळा पुरता नई पाहिजे, म्हणजे- केस गुथन, आणि सोना ना वजन, आणि नवा नवा कपळा घालन | 4 पण तुमना लपेल आणि गुप्त मानुसत्व, नम्रता आणि मन नि दीनता नि अविनाशी शोभा कन सुशोभित राहा, कारण कि देव नि नजर मा एना मूल्य मोठा शे | 5 आणि पहिला काय मा पवित्र बाया बी, ज्या देव वर आशा ठेवत होत्यात, स्वता ले ह्याच प्रमाणे सजाळत आणि आपला आपला नवरा ना आधीन मा राहात होत्यात | 6 जशी सारा अब्राहाम नि आधीन मा राहत होती आणि तेले धनी सांगत होती: त तुमी बी कदी चांगल करशात, आणि कोणत्या प्रकार नि भीती कन भयभीत नका व्हा त तेन्या पोरी ठरश्यात | 7 तसाच ओ नवरासहोण, तुमी बी बुद्धीमानी कन बायकास संगे जीवन जगा आणि बायास्ले नाजूक पात्र समजी सन तेसणा आदर करा, हय समजी सन कि आमी दोनी जीवन ना वरदान ना वारीस शेतस, जेना कन तुमन्या प्रार्थना थांबी नई जावोत | 8 आणि सगळा न सगळा एक मन आणि कृपामय आणि बंधुप्रिती ठेवणार, आणि कनवाळू, आणि नम्र बना | 9 वाईट ना बदला मा वाईट नका करा; आणि नईत गाई ना बदला मा गाई द्या; पण एना बदला मा आशीर्वाद द्या: कारण कि तुमी आशीर्वाद ना वारस होवा साठे बलावामा एयेल शेतस | 10 कारण कि जो कोणी जीवन नि ईच्छा ठेवस, आणि चांगला दिन देखाना देखस, तो आपली जीप ले वाईट पासून, आणि आपला होटसले कपट न्या गोष्टीस करा पासून रोकी ठेव | 11 तो वाईट ना साथ सोळो, आणि चांगलाच करो; तो शांततेले शोधो, आणि प्रभू ना शोध मा राहत | 12 कारण कि प्रभू ना डोया धर्मिस्वर लागेल राहातस, आणि तेना कान तेनी विनंतीस कळे लागेल राहातस, पण प्रभू वाईट करणारस्ना विमुख राहास | 13 आणि कदी तुमी चांगल करा मा उत्तेजित राहाश्यात त तुमन वाईट करणार कोण शे? 14 आणि कदी तुमी धर्म मुळे दुख बी झेलश्यात, त धन्य शेतस; पण तेसणा भ्यावाळाकन नका भ्यावा, आणि घाबरा नका| 15 पण ख्रिस्त ले प्रभू समजीसन आपला आपला मन मा पवित्र समजा, आणि जो कोणी तुमले तुमनी आशा ना बारामा काही विचारस त तेले उत्तर देवा साठे कायम तयार राहा, पण नम्रता आणि भीती कण | 16 आणि विवेक बी शुद्ध ठेवा, एनासाठे कि ज्या गोष्टी ना बारमा त्या ज्या तुमना ख्रिस्ती चांगला वागणूक ना अपमान करतस फजित होवो| 17 कारण कि कदी देव नि हय ईच्छा राहो, कि तुमी चांगल करा मुळे दुख उचलोत, त हय वाईट करा मुळे दुख उचला पासून बर शे | 18 एनासाठे कि ख्रिस्त नि बी, म्हणजे- अधर्मीस साठे धर्मी नि पापस मुळे एक सावा दुख उचला, एना साठे कि आमले देव जोळे पौचाळो: तो शरीर ना भाव कन मारा मा उना, पण आत्मा ना भाव कन जीवाळा मा उना | 19 तेनाच मा तो जाईसन कयदी आत्मास्ले बी प्रवचन सांग | 20 जेस्नी त्या बितेल टाईम मा आदन्या नई मानी जव देव नोहा ना दिनस्मा धीर धरीसन थांबी रायना, आणि तो जहाज बनी रायनता, जेना मा बठीसन थोळा लोक म्हणजे- आठ प्राणी पाणी व्दारे वाचीग्यात | 21 आणि त्याच पाणी ना दाखला बी, म्हणजे- बाप्तिस्मा,येशू ख्रिस्त जो उठाना व्दारे, आते तुमले वाचाळस;[ तेना कन शरीर ना मय दूर कराना अर्थ नई शे, पण शुद्ध विवेक कन देव ना वंश मा मीई जावाना अर्थ श] | 22 तो स्वर्ग वर जाईसन देव नि उजवी कळे बठी ग्या; आणि देवदूत आणि अधिकारी आणि सामार्थी तेना आधीन करा मा एयेल शेतस ||