4
1 त जव कि ख्रिस्त ना शरीर मा हुईसन दुख उचलात त तुमी बी तेनीच ईच्छा ले धारण करीसन करीसन हत्यार बांधी ल्या कारण कि ज्या शरीर मा दुख झेल, तो पाप पासून सुटी ग्या | 2 तेस्ना साठे कि भविष्य मा आपला बाकी शारीरिक जीवन मानसस्नि वासनास्ना प्रमाणे नई पण देव ना ईच्छा प्रमाणे जगो | 3 कारण कि दुसऱ्या जातीस्नी ईच्छा ना प्रमाणे काम कराले, आणि कामासक्ती, विषयवासना, मद्यासक्ती, रंगेलपण,बदफैल आणि अमंगळ मूर्ती पूजा मा जठ लगून आमी पहिले पासून टाईम जावाळ तोच गैर हुईन | 4 तेस्ना कन त्या चकित होतस, कि तुमी असा भारी दंगल मा तेस्ना साथ नई देतस, आणि एनासाठे त्या बर वाईट सांगतस | 5 पण त्या तेले जो जीत्तास्ना आणि मरेल ना न्याय कराले तयार शे, लेख देतीन | 6 कारण कि मरेल लेबी सुवार्ता एनाच साठे आयकाळामा उना, कि शरीर मा त माणूस ना प्रमाणे तेसणा न्याय हुईन,पण आत्मा मा त्या देव ना प्रमाणे जित्ता राहोत|| 7 सर्वां गोष्टीस्ना समापन लगेच होणार शे; एनासाठे समजदार बनिसन प्रार्थना मा तत्पर राहा| 8 आणि सर्वास्मा पहिली गोष्ट हय शे कि एक दुसरा वर जास्त प्रेम ठेवा; कारण कि प्रेम गैरा पापस्ले झाकी देस | 9 बिगर कुरूकुरू करीसन एक दुसरा नि पौन्चारी करा| 10 जेले जो वरदान भेटेल शे, तो तेले देव ना नाना प्रकार ना कृपा ना कारभारी सारखा एक दुसरा ना सेवा मा लावा | 11 कदी कोनि बोलो, त असा बोलो, समजा कि देव ना वचन शे; कदी कोणी सेवा करो; त त्या शक्ती कन करो जी देव देस; जेना कन सर्व्या गोष्टीस्मा येशू ख्रिस्त व्दारे देव नि महिमा प्रगट होवो : महिमा आणि साम्राज्य युगनयुग तेनीच शे | आमेन|| 12 प्रियसहोण, जी दुख रुपी आग तुमले परखा साठे तुमना मा भळकेल शे, एले हय समजी सन आश्चर्य नका करा कि कोणी दुसरीच गोष्ट तुमना वर बितेल शे | 13 पण जसा जसा ख्रिस्त ना दुख मा भागीदार होयीजावा, ख़ुशी करा, जेना कन तेनि महिमा ना प्रगट होता टाईम ले बी तुमी ख़ुशी आणि मग्न होवोत | 14 परत कदी ख्रिस्त ना नाव ना साठे तुमनी निंदा करामा एस, त धन्य शे; कारण कि महिमा ना आत्मा, जो देव ना आत्मा शे, तुमना मा वास करस | 15 तुमना मधून कोनि माणूस हत्यार नईत चोर, नईत दृष्टताना काम करणार, नईत परका काम मा हात टाका मुळे दुख नई उचलो | 16 पण कदी ख्रिस्ती होवा मुळे दुख भेटस, त फज्जीत नका व्हा, पण ह्या गोष्ट साठे देव नि महिमा करा | 17 कारण कि तो टाईम ईजायेल शे, कि पहिले देव ना लोकस्ना न्याय करा मा येवो, आणि जव कि न्याय नि सुरुवात आमनाच पासून हुईन त तेसण काय अन्त हुईन ज्या देव नि सुवार्ता ले नई मानतस? 18 आणि कदी धर्मी माणूसलेच कठीणता कन तारण भेटीन, त भक्तिहीन आणि पापिस्न काय ठिकाण ? 19 एनासाठे ज्या देव नि ईच्छा प्रमाणे दुख उचलतस, त्या चांगल करत, आपला आपला जीव ले विश्वास योग्य सृष्टी करता ना हात मा सोपी द्या ||