3
1 देखा बाप नि आमना संगे कसा प्रेम करेल शे, कि आमी देव ना पोर म्हनावूत, आणि आमी शेतस बी: एनामुळे संसार आमले नई वयखत नई, कारण कि तेनी तेले बी नई वयख | 2 प्रियसहोण, आते आमी देव ना पोर शेतस, आणि आते लागून हय प्रगट नई हुयन, कि आमी काय होसुत! ईतलच माहिती शे, कि जव तो प्रगट हुईन त आमी बी तेना सारखा होसुत, कारण कि तेले तसाच देखसुत जसा तो शे | 3 आणि जो कोणी तेना वर हय आशा ठेवस, तो स्वता ले तसाच पवित्र करस, जसा तो पवित्र शे | 4 जो कोणी पाप करस, तो व्यवस्था ना विरोध करस; आणि पाप त व्यवस्था ना विरोध शे | 5 आणि तुमले माहिती शे, कि तो एनासाठे प्रगट हुईना, कि पापस्ले हरण करी लेवो; आणि तेना स्वभाव मा पाप नई | 6 जो कोणी तेना मा सदा राहास, तो पाप नई करत: जो कोणी पाप करस, तेनी नई त तेले देखेल शे, आणि नईत तेले वयखेल शे | 7 ओ पोरसहोण, कोणाच बयकाळा मा नका एयज्यात; जो धर्म ना काम करस, तोच तेना सारखा धर्मी शे | 8 जो कोणी पाप करस, तो सैतान कळून श, कारण कि सैतान सुरुवात पासून पाप करत एयेल शे: देव ना पुत्र एनासाठे प्रगट हुईना, कि सैतान ना कामस्ले नाश करो | 9 जो कोणी देव पासून जल्मेल शे तो पाप नई करत; कारण कि तेना बीज तेना मा राहास: आणि तो पाप करी नई सकत, कारण कि देव पासून जल्मेल शे | 10 एनासाठे देव ना पोर, आणि सैतान ना पोर समजा मा येतस; जो कोणी धर्म ना काम नई करत, तो देव पासून नई, आणि नई त तो, जो आपला भावू संगे प्रेम नई ठेवस | 11 कारण कि जो संदेश तुमी सुरुवात पासून आयका, तो हवू शे, कि आमी एक दुसरा संगे बैर ठेवोत 12 आणि काईन सारखा नका बना, जो त्या दृष्ट पासून होता, आणि जेनी आपला भावू ले मारी टाकेल होता: आणि तेले कसा साठे मार? ह्या साठे कि तेना काम वाईट होतात, आणि तेना भावू ना काम धर्म ना होतात|| 13 ओ जवान कदी संसार तुमना वर बैर करत हुईन त आश्चर्य नका करज्यात | 14 आमले माहिती शे, कि आमी मोत ले पार हुईसन जीवन मा पौचेल शेतस; कारण कि आमी भावूस संगे प्रेम ठेवतस,: जो प्रेम नई ठेवस, जो मोत नि दशा मा राहास | 15 जो कोणी आपला भावू संगे बैर ठेवस, जो हत्यार शे; आणि तुमले माहिती शे, कि कोणताच हत्यारा मा कायम ना जीवन नई राहास | 16 आमी प्रेम ले एनाच कन वयख, कि तेनी आमना साठे आपला जीव दिटाका; आणि आमले बी भावूस साठे जीव देवाले पाहिजे | 17 पण जेना कोण कळे संसार नि संपत्ती शे आणि तो आपला भावू ले गरीब देखीसन तेना वर दया नई करान देखत, त तेना मा देव ना प्रेम कसा काय राईन? 18 ओ पोरसहोण, आमी वचन आणि जीपच कन नई, पण काम आणि सत्य ना व्दारे बी प्रेम करोत | 19 एनाच कन आमी समजसुत, कि आमी सत्य ना शेतस; आणि ज्या गोष्ट मा आमना मन आमले दोष दिन, त्या विषय मा आमी तेना समोर आपला आपला मन ले धाळस दि सकसुत | 20 कारण कि देव आमना मन पासून मोठा शे; आणि सगळ काही माहिती शे | 21 ओ प्रियसहोण, कदी आमना मन आमले दोष नई देत, त आमले देव समोर धीर राहास | 22 आणि जे काही आमी मांगतस, ते आमले तेना पासून भेटस; कारण कि आमी तेनी आदन्यास्ले मानतस; आणि जे तेले आवळस तेच करतस | 23 आणि तेनी आदन्या हय शे कि अमी तेना पुत्र येशू ख्रिस्त ना नाव वर विश्वास करोत आणि जस तेनी आमले आदन्या दीयेल शे त्याच प्रमाणे आपसा मा प्रेम ठेवोत | 24 आखोत जो तेनी आदन्यास्ले मानस, तो एनामा, आणि हवू तेनामा सदा राहास: आणि एनाच कन, म्हणजे- त्या आत्मा कन जो तेनी आमले दियेल शे, आमले माहिती शे, कि तो आमना मा सदा राहास ||